Passport: आता एयरपोर्टवर लागणार नाही फार वेळ, सरकार E-Passport आणण्याच्या तयारीत, काय होईल बदल जाणून घ्या

नवी दिल्ली: आज पासपोर्ट हे महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. त्यामुळेच सरकारने पासपोर्ट बनवण्याचे नियम देखील सोपे केले आहेत. आता तुम्ही घरबसल्या पासपोर्टसाठी अर्ज करू शकता आणि पासपोर्ट ऑफिसला भेट देण्यासाठी अपॉइंटमेंट घेऊ शकता. अशा प्रकारे, एका सोप्या प्रक्रियेनंतर, पासपोर्ट तयार होतो आणि तुमच्या घरी येतो. अलीकडेच, परराष्ट्र मंत्रालयातील भारत सरकारचे सचिव संजय भट्टाचार्य यांनी जाहीर केले आहे की, देशात लवकरच नागरिकांसाठी ई-पासपोर्ट सुरू करण्यात येणार आहे. वाचा: एका ट्विटर पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पुढील पिढीचे पासपोर्ट बायोमेट्रिक डेटाची सुरक्षा सुनिश्चित करतील आणि विमानतळावर इमिग्रेशन तपासणीसाठी लागणारा वेळ देखील कमी करेल. ई-पासपोर्टची कल्पना नवीन नसून काही काळापूर्वी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी याची घोषणा केली होती. बायोमेट्रिक पासपोर्ट सध्या जर्मनी, ब्रिटन आणि बांगलादेश या देशांमध्ये जारी केले जातात. ई-पासपोर्ट कसे काम करतो? ई-पासपोर्ट हा सामान्य पासपोर्टसारखा दिसतो. ई-पासपोर्टमध्ये एक छोटी इलेक्ट्रॉनिक चिप असते. जी ड्रायव्हिंग लायसन्ससारखी असते. नाव, जन्मतारीख, पत्ता आणि इतर तपशीलांसह तुमच्या पासपोर्टवर छापलेली सर्व माहिती मायक्रोचिपमध्ये साठवली जाते. ही मायक्रोचिप इमिग्रेशन काउंटरना प्रवाशांच्या कोणत्याही तपशीलाची त्वरित पडताळणी करण्यास मदत करेल. या निर्णयामुळे बनावट पासपोर्टचे प्रमाण कमी होण्यासही मदत होणार आहे. ई-पासपोर्टसह इमिग्रेशन काउंटरवर घालवलेला वेळ ५० % टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. ई-पासपोर्टमध्ये बायोमेट्रिक डेटा म्हणजे काय? बायोमेट्रिक डेटा तुमचे फिंगरप्रिंट असू शकते. नवीन पासपोर्ट जारी करण्यापूर्वी सरकार तुमच्या बोटांचे ठसे स्टोर करते . मायक्रोचिपमध्ये साठवलेल्या या माहितीमुळे कोणत्याही इमिग्रेशन काउंटरवर तुमची ओळख सत्यापित करणे सोपे होईल. ई-पासपोर्टमुळे काय बदल होईल ? नवीन पासपोर्टसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया तशीच राहील आणि अर्जामध्ये कोणताही बदल होणार नाही. अहवालानुसार, परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत भारतातील सर्व ३६ पासपोर्ट कार्यालये ई-पासपोर्ट जारी करतील. जारी करण्याची प्रक्रियाही तशीच राहील. आतापर्यंतच्या ट्रायल रनमध्ये, सरकारने जारी केलेले ई-पासपोर्ट हे वैयक्तिक छापील पुस्तिकेच्या स्वरूपात आले होते. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nKAbFI

Comments

clue frame