Amazon चा 'हा' Mail आला असेल तर चुकूनही करू नका क्लिक, होईल मोठे नुकसान, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड पूर्वीपासूनच होताच , पण करोना नंतर यात अधिकच वाढ झाली. यासोबत ऑनलाईन फ्रॉड्सचे देखील प्रमाण वाढले आहे. तेव्हापासून हॅकर्सन देखील अधिक सक्रिय झाले आहे. अगदी बँक खात्यातून पैसे चोरण्यापासून ते ऑनलाइन खरेदीपर्यंत हॅकर्सनी चौफेर पाय पसरले आहेत. सध्या हॅकर्स अॅमेझॉनशी संबंधित ईमेल ग्राहकांना पाठवत आहेत. वाचा: वर ग्राहकांचा विश्वास असल्याचा फायदा हॅकर्स घेत आहे. या ईमेलमध्ये ऑर्डर रद्द करण्यासाठी आणि कॉल करण्यासाठी एक नंबर दिला जातो. हा नंबर अॅमेझॉनचा असल्याचे सांगितले जाते. ग्राहकांनी चुकूनही या नंबरवर कॉल केला तर ते हॅकर्सच्या तावडीत सापडतात. एका रिपोर्टनुसार, या हॅकर्सकडे अॅमेझॉनची लिंक आणि खरेदीच्या पावत्याही आहेत. मात्र, या दोन्ही गोष्टी मॉकअप आहेत. हॅकर्स पैसे आणि बँक तपशील चोरतात: या Email मध्ये काही तपशील ग्राहकांना पाठवण्यात येतात. ज्यामध्ये महागड्या उत्पादनांच्या बनावट पावत्या आणि पेमेंट तपशील असतात . त्या व्यक्तीने त्या नंबरवर कॉल केल्यावर हॅकर्सकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यानंतर हॅकर्स स्वतःच त्या व्यक्तीला पुन्हा कॉल करतात. त्यांच्या वतीने हा आदेश रद्द करण्यात आला असल्याचे सांगून ग्राहकांचे बँक डिटेल्स हॅकर्स मागतात. ग्राहकाने बँक डिटेल्स देताच हॅकर्स त्याचा डेटा चोरून त्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतात. स्वतःला सुरक्षित ठेवा : अशा कोणत्याही मेलला उत्तर देऊ नका. तसेच कोणत्याही नंबरवर कॉल करू नका. हे बनावट ईमेल आहेत आणि त्यावर विश्वास ठेवू नका. कोणताही मेल पाहण्यापूर्वी, त्याचा ईमेल पत्ता आवर्जून तपासा. तसेच, डेबिट-क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग लॉगिन यासारखे तपशील कधीही कोणाशीही शेअर करू नका. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CgpyPK

Comments

clue frame