मुंबई चीनची स्मार्टफोन कंपनी असणाऱ्या ओप्पोचा स्मार्टफोन ''ची आजपासून विक्री होणार आहे. अॅमेझॉनवर दुपारी १२ वाजल्यापासून खरेदीसाठी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. या फोनच्या खरेदीवर काही खास ऑफर ही देण्यात आल्या आहेत. मोबाइल बाजारपेठेत 'सॅमसंग गॅलेक्सी एम४०', 'विवो व्ही१५', 'रेडमी के२०' या फोनसोबत 'ओप्पो के३' ची स्पर्धा असणार आहे. 'ओप्पो के ३' हा स्मार्टफोन ६ जीबी रॅम व ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज आणि ८ जीबी रॅम व १२८ इंटर्नल स्टोरेज या दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये गेम बूस्ट २.० आणि व्हिओओसी फ्लॅश चार्ज ३.० सारखे प्री-लोडेड फिचर्स आहेत. किंमत आणि ऑफर भारतात 'ओप्पो के ३' मोबाइल १६ हजार ९९० रुपयांपासून उपलब्ध आहे. तर, ८ जीबी वेरिएंटची किंमत १९ हजार ९९० रुपये आहे. अॅमेझॉन पेचा पर्याय वापरून फोन खरेदी केल्यास १००० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. तर, अॅक्सिस बँकच्या ग्राहकांनाही १००० रुपयांची सवलत मिळणार आहे. रिलायन्स जिओनेदेखील खास ऑफर दिली आहे. जिओकडून ७०५० रुपयांचे व्हाउचर देण्यात येणार आहेत. इतकेच नव्हे तर लेंसकार्टवर ५००० रुपयांचे आणि ओयोवर १२ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. त्याशिवाय फोन नो कॉस्ट इएमआयवर देखील उपलब्ध आहेत. फोनची वैशिष्ट्ये फोनमध्ये ऑक्टाकोर स्नॅनड्रॅगन ७१० प्रोसेसर असून पॅनोरेमिक सॅमसंग एम्लोड डिस्प्लेदेखील आहे. ओप्पो के ३ मध्ये ६.५ इंचाचा एचडी ऐमोल्ड डिस्प्ले आहे. युजर्सना गेमिंगसाठी फोनमध्ये गेमबुस्ट २.० आहे. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये १६ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी डेप्थ सेंसर आहे. फोनमध्ये फ्रंटमध्ये १६ मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. कमी प्रकाशात उत्तम फोटो काढण्यासाठी फोनमध्ये अल्ट्रा क्लिअर नाइट व्ह्यू २.० फीचर आहे. फोनची बॅटरी क्षमता ३७६५ एमएएच इतकी आहे. फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Z83yn4
Comments
Post a Comment