DoT: टेलिकॉम कंपन्या दोन वर्षांसाठी स्टोर करणार तुमचे खासगी कॉल-मेसेज, जाणून घ्या यामागचे कारण

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून टेलिकॉम कंपन्यांना नवीन गाइडलाइन्स जारी करण्यात आली आहे. यानुसार, टेलिकॉम कंपन्यांना आंतरराष्ट्रीय कॉल, सेटेलाइट फोन कॉल, कॉन्फ्रेंस कॉल आणि सामान्य नेटवर्कसह इंटरनेटवर करण्यात आलेल्या मेसेजचा रेकॉर्ड कमीत कमी २ वर्षांसाठी स्टोर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. दूरसंचार विभागाद्वारे डिसेंबरमध्ये नियमात बदल करण्यात आले होते. यानंतर कॉल व मेसेज रेकॉर्ड करण्याचा कालावधी एक वर्षावरून दोन वर्ष करण्यात आला आहे. वाचा: , , , सारख्या दूरसंचार कंपन्या सेटेलाइट फोन सुविधा सोडून इतर सर्व दूरसंचार सेवा प्रदान करतात. लायसन्स असलेल्या नेटवर्कला कमर्शियल रेकॉर्ड्स, कॉल डेटा रेकॉर्ड, एक्सचेंज डिटेल रेकॉर्ड, आयपी डिटेल रेकॉर्ड स्टोर करावे लागेल. दूरसंचार विभागाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कमीत कमी दोन वर्षांपर्यंत कॉलिंग आणि मेसेजला स्टोर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, निर्देश दिले जात नाहीत तोपर्यंत हा रेकॉर्ड डिलीट करता येणार नाही. हे नियम टाटा कम्यूनिकेशन्स, सिस्कोच्या वीबॅक्स, एटी अँड टी ग्लोबल नेटवर्क सारख्या कंपन्यांवर लागू होतात. या कंपन्यांकडे यासंदर्भात लायसन्स आहेत. बीएसएनएलला सेटेलाइट फोन कॉल आणि डेटा सेवा प्रदान करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या लायसन्ससह लायसन्स असलेल्यांसाठी देखील ही तरतूद लागू असेल. त्यामुळे सर्व प्लॅटफॉर्म्सला दोन वर्षासाठी कॉल डेटा आणि इंटरनेट कम्यूनिकेशन रेकॉर्ड स्टोर करणे अनिवार्य आहे. दरम्यान, अनेक कंपन्या भारतात सेटेलाइट कॉलिंगचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचा देखील समावेश आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/TdAI2l0GM

Comments

clue frame