KBC च्या नावानं मोठा स्कॅम, WhatsApp वर आलेल्या 'या' मेसेजपासून राहा सावध

नवी दिल्ली : (कौन बनेगा करोडपति) च्या नावाने फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. यासाठी ची मदत घेतली जात आहे. मेसेजद्वारे पैसे जिंकण्याचे अमिष दाखवले जात आहे. असाच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये एक ऑडिओ क्लिप आणि एका ग्राफिक्सचा समावेश असून, यात चा उल्लेख आहे. यात लकी ड्रॉमध्ये २५ लाख रुपये जिंकण्याचा दावा केला जात आहे. जर तुम्हालाही अशा स्वरुपाचा मेसेज आला असल्यास त्वरित सावध व्हा, अन्यथा बँक खाते रिकामे होऊ शकते. वाचा: व्हॉट्सअ‍ॅपवर येत असलेला हा मेसेज ‘ऑल इंडिया सिम कार्ड लकी ड्रॉ कॉम्पिटेशन’ नावाने शेअर केला जात आहे. यासोबतच्या ऑडिओ क्लिपमध्ये बनावट लॉटरीची माहिती दिली जात आहे. ऑडिओमध्ये म्हटले आहे की, हा मेसेज केबीसीकडून मुंबईवरून पाठवला आहे. ज्या यूजरला व्हॉट्सअप नंबरवर मेसेज आला आहे, त्याची कंपनीकडून लकी ड्रॉ मध्ये निवड झाली आहे. या नंबरवर २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. या बनावट मेसेजमध्ये म्हटले आहे की, कंपनीकडून ५ हजार मोबाइल नंबर्सची लॉटरी काढण्यात आली. यात वोडाफोन-आयडिया, एअरटेल, बीएसएनएल आणि जिओच्या नंबर्सचा समावेश आहे. या ५ हजार नंबर्सपैकी तुमचा नंबर निवडला गेला आहे. या मेसेजसोबत ग्राफिक्स फोटो देखील पाठवण्यात आला आहे व यात त्यांच्या कंपनीच्या मॅनेजरचा नंबर आहे. मॅनेजरच्या नंबरवर केवळ व्हॉट्सअ‍ॅप कॉल करणे शक्य आहे. त्यानंतर पुढील प्रक्रियेबाबत माहिती दिली जाते. हा मेसेज +९१६३५४९५७११३ या नंबरने येतो. दरम्यान, हा मेसेज पूर्णपणे बनाट असून, याप्रकारच्या कोणत्याच लकी ड्रॉ स्पर्धेचे केबीसी टीमने आयोजन केले नव्हते. केबीसी कार्यक्रमादरम्यान देखील याबाबतच्या बनावट मेसेजबाबत सावध केले जाते. जर तुम्हालाही याप्रकारचा मेसेज असल्यास, सावध होणे गरजेचे आहे. अशा मेसेजमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. याप्रकारचा मेसेज काही दिवसांपूर्वी देखील व्हायरल झाला होता. बनावट मेसेजपासून अशाप्रकारे करा स्वतःचा बचाव
  • जर तुम्हाला अशाप्रकारचा मेसेज आल्यास कोणताही रिप्लाय करू नये. तसेच, मेसेजमध्ये सांगितलेली प्रोसेस फॉलो करू नये.
  • याप्रकारच्या अनोळखी लोकांची संपर्क साधू नये.
  • अनोळखी व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे पेमेंट करू नका.
  • मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीशी बँक खात्याची माहिती शेअर करू नका. जर तुम्ही आधीच माहिती दिली असेल तर त्वरित बँकेला अलर्ट करा.
  • अशाप्रकारच्या कोणत्याही माहितीला तुम्ही CyberCrime.gov.in पोर्टलवर रिपोर्ट करू शकता.
वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kSVNyM

Comments

clue frame