'आकाश प्राइम क्षेपणास्त्र' ची चाचणी, भारताची 'पॉवर' वाढली, पाहा कोणती टेक्नोलॉजी वापरली

नवी दिल्ली: भारताने सोमवारी ओडिशाच्या चांदीपूरमध्ये आकाश क्षेपणास्त्राची नवीन आवृत्ती आकाश प्राईमची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्त्रात नवीन वैशिष्ट्ये जोडल्यानंतर प्रथमच त्याची चाचणी घेण्यात आली आहे. डीआरडीओ नुसार , क्षेपणास्त्राने हवेत लक्ष्य रोखले आणि अचूक लक्ष्य ठेवून ते नष्ट केले. आकाश प्राईम सध्याच्या व्यवस्थेपेक्षा आधुनिक आणि अनेक प्रकारे उत्तम आहे. वाचा: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आकाश प्राइमच्या यशस्वी चाचणीसाठी हवाई दल, डीआरडीओसह संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे अभिनंदन केले आहे. डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी म्हणतात की, ही भारताची अनुकरणीय कामगिरी आहे. शास्त्रज्ञांनी कठोर परिश्रमातून हे साध्य केले आहे. ते म्हणतात की, आता शत्रूची प्राणघातक हवाई शस्त्रे आकाशातच नष्ट केली जाऊ शकतात. यामुळे हवाई दलाची ताकद वाढणार आहे. आकाश क्षेपणास्त्र प्रणालीच्या तुलनेत आकाश प्राईम भारतात तयार केलेल्या उत्तम उपकरणांनी सुसज्ज आहे. उच्च उंचीवर कमी तापमानातही त्याची कामगिरी विश्वसनीय आहे. विद्यमान आकाश क्षेपणास्त्राच्या ग्राउंड सिस्टीममध्ये बदल करून उड्डाण चाचणी करण्यात आली आहे. आकाश प्राइम क्षेपणास्त्र स्वदेशी अॅक्टिव्ह आरएफ सीकरने सज्ज आहे. यामुळे लक्ष्य सहज ओळखता येते. आकाश प्राईममध्ये जास्त उंचीवर गेल्यानंतर तापमान नियंत्रण यंत्र सुधारित करण्यात आले आहे. त्याची ग्राउंड सिस्टीम देखील अपग्रेड करण्यात आली आहे. रडार, आणि टेलिमेट्री स्टेशन, क्षेपणास्त्र मार्ग आणि उड्डाण मापदंड सुधारण्यात आले आहेत. चाचणीमध्ये आकाश प्राइमने दाखवले की, ते शत्रूच्या विमानांचा शोध घेण्यास आणि नष्ट करण्यास कसे सक्षम आहे. नवीन व्हेरियंट २५ किमी अंतरावर कोणतेही लक्ष्य गाठण्यास सक्षम आहे. डीआरडीओच्या हैदराबाद स्थित प्रयोगशाळेने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. या क्षेपणास्त्राने मानवरहित विमानाला लक्ष्य केले आणि नष्ट केले. याआधी २१ जुलै रोजी ने आकाशच्या पृष्ठभागावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या नवीन प्रकाराची यशस्वी चाचणी केली होती. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CWvvSi

Comments

clue frame