ऑनलाइन झाली आहे आर्थिक फसवणूक, ‘या’ नंबरवर कॉल केल्यास त्वरित मिळू शकतात पैसे परत

नवी दिल्ली : च्या नावाखाली होत असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागाने हेल्पलाइन नंबर १५५२६० जारी करत फसवणूक झाल्यास रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. दिल्ली पोलीस फसवणूक झाल्यास त्वरित मदत करण्याचे आश्वासन देत आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, या नंबरवर फोन करून तक्रार केल्यास पैसे परत मिळण्यास मदत होईल. वाचा: हा हेल्पलाइन नंबर सिटीजन फायनेंशियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग आणि मॅनेजमेंट सिस्टचा भाग आहे. अंमलबजावणी संस्था, आणि वित्तीय संस्थांनी हा प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. सध्या छत्तीसगड, दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगाना, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यात या हेल्पलाइन नंबरचा वापर केला जात आहे. ही सेवा जून २०२१ मध्ये सुरू करण्यात आली होती. सरकारचा दावा आहे की, लाँचिंगनंतर १,५५,२६० प्रकरणात आतापर्यंत १.८५ कोटी रुपयांच्या बचत केली आहे. यात दिल्लीतील ५८ लाख आणि राजस्थानमधील ५३ लाख वाचवले. गृह मंत्रालयाच्या निवेदनानुसार, हेल्पलाइन नंबरमध्ये सर्व सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांचा समावेश आहे. यात स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, यूनियन बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एक्सिस, येस बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचा समावेश आहे. याशिवाय PayTM, PhonePe, Mobikwik, Flipkart आणि Amazon सारख्या वॉलेट आणि मर्चेंट्सचा समावेश आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, हेल्पलाइन आणि रिपोर्टिंग प्लॅटफॉर्मचे यश या गोष्टीवरून ठरवता येईल की, अनेक घटनांमध्ये पैसे गुन्हेगारांपर्यंत जाण्याच्या आधीच रोखण्यात आले. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DoJ9im

Comments

clue frame