LinkedIn वापरत असाल तर सावधान, ७० कोटी यूजर्सची खासगी माहिती डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध

नवी दिल्ली : यावर्षी दुसऱ्यांदा यूजर्सचा झाल्याची माहिती समोर आली आहे. नवीन ब्रीचमध्ये लिंक्डनइनच्या ७० कोटींपेक्षा अधिक यूजर्सचा डेटा लीक झाला आहे. रिपोर्टनुसार, या ब्रीचमध्ये लिंक्डइन यूजर्सची खासगी माहिती जसे की फोन नंबर, एड्रेस, जिओलोकेशन डेटा आणि पगार इत्यादी खासगी माहिती आहे. ही सर्व माहिती डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. वाचाः रिपोर्टनुसार, LinkedIn च्या ९२ टक्के यूजर्सचा डेटा लीक झाला आहे. लोकप्रिय फोरमच्या यूजर्सनी ७० कोटी लिंक्डइन यूजर्सच्या डेटासाठी जाहिरात दिल्यानंतर या ब्रीचची माहिती समोर आली आहे. ज्या हॅकरने हा डेटा काढला आहे, त्यांनी सँपल म्हणून १ मिलियन रेकॉर्ड देखील पोस्ट केले आहेत. रिपोर्टनुसार, स्पष्ट होते की हॅकरद्वारे जमा करण्यात आलेला डेटा खरा आणि अप-टू-डेट आहे. यामध्ये यूजर्सचे नाव, ईमेल आयडी, फोन नंबर, एड्रेससह अनेक माहिती आहे. हॅकरने एपीआयचा फायदा घेऊन हा डेटा जमा केला आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात देखील लिंक्डइनच्या ५० कोटी यूजर्सचा डेटा लीक झाला होता. यामुळे यूजर्सच्या खासगी माहितीचा समावेश होता. सोशल मीडिया अकाउंटची माहिती देखील ऑनलाइन लीक झाली होती. वाचाः दुसरीकडे, लिंक्डइनने डेटा ब्रीच झाला नसल्याचे म्हटले आहे. आमच्या तपासात डेटा ब्रीच झाला नसल्याचे आढळले असून, आम्ही यूजर्सच्या प्रायव्हसीला नुकसान होणार नाही यासाठी काम करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. खासगी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल ? डिजिटल प्लॅटफॉर्मवरील खासगी माहिती सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी अॅप्समधील सेफ्टी, सिक्योरिटी आणि प्रायव्हसी सेटिंग व्यवस्थित आहे की नाही पाहा. तसेच, योग्य पासवर्ड सेट करण्यासोबतच टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन इनेबल करा. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3drpMJW

Comments

clue frame