५०००mAh दमदार बॅटरीसह Vivo Y52s (T1 Version) लाँच, ५जी सपोर्टही मिळणार

नवी दिल्ली : कंपनी व्हीवोने आपला नवीन आणि बजेट ५जी स्मार्टफोन (T1 Version) ला चीनमध्ये लाँच केले आहे. हा गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Y52s चे नवीन व्हर्जन आहे. दोन्ही मॉडेलचे बहुतांश फीचर्स एकसारखे आहेत, मात्र यात प्रोसेसर वेगळे आहेत. Vivo Y52s (T1 Version) मध्ये स्नॅपड्रॅगन ४८० प्रोसेसर मिळतो, तर आधी लाँच झालेल्या Vivo Y52s मध्ये मीडियाटेक हीलियो Dimensity ७२० प्रोसेसर आहे. दोन्ही फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी आहे, जी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. वाचा : Vivo Y52s (T1 Version) ची किंमत Vivo Y52s (T1 Version) ची किंमत २,०९९ चीनी युआन (जवळपास २३,९०० रुपये) आहे. ही किंमत ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. फोन कोरल सी, सोनेट आणि टायटेनियम ग्रे रंगात उपलब्ध आहे. चीनमध्ये व्हिवोच्या अधिकृत वेबसाइटवरून हा फोन खरेदी करता येत आहे. Vivo Y52s (T1 Version) चे स्पेसिफिकेशन Vivo Y52s (T1 Version) स्मार्टफोन अँड्राइड ११ आधारित Origin OS 1.0 आहे. फोनध्ये ६.५८ इंच फूल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला असून, ज्याचे पिक्सल रिझॉल्यूशन १०८०x२४०८ आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ९० Hz आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४८० प्रोसेसर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळते. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. याचा प्रायमेरी कॅमेरा ४८ मेगापिक्सल असून, ज्याचे अपर्चर f/1.79 आहे. तर दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo Y52s मध्ये ५०००mAh ची बॅटरी देण्यात आली असून, ही बॅटरी १८W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ v५.५, यूएसबी टाईप-सी पोर्ट, ३.५mm हेडफोन जॅक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. वाचा : वाचा : वाचा :


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eZxbAt

Comments

Post a Comment

clue frame