वॉशिंग्टन: अमेरिकेची अंतराळ संस्था नासाला मंगळ मोहिमेत आणखी यश मिळाले आहे. नासाने मंगळ ग्रहावर ऑक्सिजन तयार करण्यास यश मिळाले आहे. मंगळावरील वातावरणात कार्बन डायऑक्साइडमधून ऑक्सिजन तयार करण्यात आला असल्याचे नासाने सांगितले. नासाचे Perseverance रोव्हर १८ फेब्रुवारी रोजी मंगळावर उतरले होते. त्यानंतर विविध टप्प्यांमध्ये नासाचे संशोधन सुरू झाले. मंगळ ग्रहावरील वातावरण पृथ्वीपेक्षाही पातळ आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑक्सिजन तयार करण्याची प्रक्रिया अधिकच आव्हानात्मक होती. मात्र, नासाच्या संशोधकांनी ही किमया साध्य केली आहे. वाचा: नासाने ऑक्सिजन तयार करण्यासाठी टोस्टरच्या आकाराचे 'मॉक्सि' (MOXIE) हे खास उपकरण मंगळावर पाठवले होते. त्यातून पाच ग्रॅम ऑक्सिसजन तयार करण्यास यश मिळाले. अंतराळवीर हे पाच ग्रॅम ऑक्सिजन १० मिनिटांसाठी श्वास घेण्यासाठी वापरू शकतो, असे नासाने म्हटले. परग्रहावर ऑक्सिजन तयार करता येणे ही मोठी बाब ठरणार आहे. मानवाने परग्रहावर जाऊन ऑक्सिजन तयार करण्याची घटना म्हणजे परग्रहावर मानवी वस्ती करण्याच्यादृष्टीनेही महत्त्वाचे असल्याचे नासाच्या शास्त्रज्ञांनी म्हटले. वाचा: हे 'मॉक्सी' उपकरण इलेक्ट्रोलायजिसद्वारे कार्य करते. जो कार्बन डाय ऑक्साईडच्या रेणूपासून ऑक्सिजन अणू विभक्त करण्यासाठी अत्यधिक उष्णतेचा वापर करतो. जे मंगळावरील वातावरणाचा जवळपास ९५ टक्के हिस्सा आहे. मंगळ ग्रहावर अतिशय अत्यल्प प्रमाणात ऑक्सिजन आहे. भविष्यातील संशोधनाच्या दृष्टीने ऑक्सिजन तयार करण्याची घटना महत्त्वाची समजली जात आहे. वाचा: दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नासाने मंगळ ग्रहावर हेलिकॉप्टर उडवण्यास यश मिळवले होते. Ingenuity हेलिकॉप्टरने मंगळ ग्रहावरील जेजेरो क्रेटरमध्ये तयार करण्यात आलेल्या एका तात्पुरत्या हेलिपॅडवरून उड्डाण घेतले. पृथ्वीशिवाय इतर ग्रहावर पहिल्यांदा हेलिकॉप्टर उडाले. नासाच्या Ingenuity या जवळपास १.८ किलोच्या रोटरक्राफ्टने आपल्या चार कार्बन-फायबर पातींच्या आधारे उड्डाण घेतले. या पाती प्रति मिनिटाला २५०० वेळा फिरतात.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Pd6eAl
Comments
Post a Comment