नवी दिल्ली : कोरोना साथीच्या देशात भीतीदायक वातावरण आहे. रेमेडिसिव्हिर इंजेक्शनचा साठा कमी असल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक चिंताग्रस्त आहे, बरेच जण ऑक्सिजन सिलिंडर मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न प्रयत्न करीत आहेत आणि रुग्णालयात बेड मिळावा यासाठी देखील धडपड करीत आहे. परिस्थिती बिकट होत असल्याचे पाहून काही नेते-कलाकार आणि सामाजिक संस्था लोकांच्या मदतीसाठी पुढे आल्या असून सोशल मीडियाच्या माध्यमातून गरजूंना आवश्यक त्या सेवा पुरविल्या जात आहेत. परंतु, अशा गंभीर परिस्थितीत देखील काही समाजकंटक लोंकाना लुबाडण्याचा प्रयत्न करीत आहे. नामांकित सामाजिक संस्थांची लोकांची नावे वापरुन लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार देखील वाढत आहे. औषध, दवाखान्यात बेड, ऑक्सिजन सिलिंडर देण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळले जात आहे. मोबाईल क्रमांक आणि इतर माहितीचा गैर वापर करून हा प्रकार होत असल्याचे समोर आले आहे.
गृह मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या सायबर शाखा सायबर दोस्त यांनी ट्वीटद्वारे लोकांना या संदर्भात सावध राहण्यास सांगितले आहे. सायबर मित्रने ट्विटमध्ये म्हटले आहे की सोशल मीडियावर कोव्हीड- १९ ला मदत करण्यासाठी किंवा घेण्यासाठी आपला फोन नंबर आणि वैयक्तिक तपशील देताना थोडी सावधगिरी बाळगा. सायबर गुन्हेगार त्याचा गैरवापर करू शकतात आणि तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. २. रुग्णालयात बेड व औषध उपलब्ध करून देण्याचा करतात दावा आपण सोशल मीडियावर मदतीसाठी विचारत असल्यास, या फसवणूक करणाऱ्या टोळ्या आपल्याशी संपर्क साधतील आणि ते आपल्याला मदत करू इच्छित आहेत असे सांगतील. रुग्णालयात बेड आणि आवश्यज औषध मिळवून देण्यास आपली मदत करू असे देखील सांगतील. चॅरिटीच्या नावाखाली फसवणूक याखेरीज असे काही असे आहेत की जे स्वत: ला सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थेचे अधिकारी म्हणून दावा करतात आणि मग लोकांकडून पैसे घेतात. हे लोक डोनेशनच्या नावाखाली लोकांची फसवणूक करतात. सायबर मित्राने लोकांना बनावट औषधांबाबतही सतर्क राहण्यास सांगितले आहे. हे टाळण्यासाठी सायबर दोस्तने काही टिप्सही दिल्या आहेत. सायबर दोस्तने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की कोरोना रुग्णांना बनावट औषधे देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत, एका विश्वास ठेवता येईल अशा दुकानातूनच औषध घ्या. तसेच, देय देताना पूर्ण काळजी घ्या. सायबर मित्राने स्पष्टपणे सांगितले आहे की सोशल मीडियाच्या मदतीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. मोबाईल नंबर, आधार नंबर यासारखी माहिती सोशल मीडियावर देण्याचे जाणीवपूर्वक टाळा. टेलिग्राम ग्रुपवर सक्रिय देखील आहेत हे सक्रिय काही टेलिग्राम समुहांकडूनही माहिती प्राप्त झाली आहे जेथे मदतीच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जाऊ शकते. महाराष्ट्र पोलिसांनीही रेमेडिसवीर ऑनलाइन खरेदी संदर्भात अलर्ट जरी केला आहे. रेमेडीसवीरांना ऑनलाईन देण्याचा दावा करणाऱ्यांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. असे महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने ट्विट केले आहे. ऑक्सिजन, बेड आणि औषधांची घरपोच सेवा देणायांपासून देखील सावध रहाण्याची आवश्यकता आहे. वाचा :
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3niWrW2
Comments
Post a Comment