३.५ मिलियन Mobikwik यूजर्संचा डेटा झाला लीक, या ठिकाणी फोन नंबर आणि केवायसीची विक्री

नवी दिल्लीः पेमेंट अॅप मोबिक्विकसंबंधी एका सिक्योरिटी रिसर्चरने दावा केला आहे की, ३.५ मिलियन युजर्संचा डेटा लीक झाला असून तो डार्क वेबवर विकला जात आहे. रिसर्चने हेही म्हटले की, यात युजर्सची खासगी माहितीचा समावेश आहे. यात केवायसीची माहिती, त्यांचा पत्ता, फोन नंबर, आधार कार्ड डिटेल्स आणि दुसरी महत्वाची माहिती या ठिकाणी विकली जात आहे. वाचाः अनेक युजर्संना आतापर्यंत माहिती झाले आहे की, त्यांची खासगी माहिती इंटरनेटवर व्हायरल केली जात आहे. डेटा ब्रीचला सर्वात आधी फेब्रुवारी महिन्यात सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजाहरिया यांनी पाहिले होते. १ कोटी भारतीय कार्डधारकांचा कार्ड डेटा ज्यात वैयक्तिक माहिती आणि केवायसी सॉफ्ट कॉपी (पॅनकार्ड आदी) चा सहभाग आहे. भारतात कंपनीचे सर्वर लीक झाले आहे.ज्यात ६ टीबी केवायसी डेटा आणि ३५० जीबी mysql डंप यांचा समावेश आहे. ब्रीचच्या स्क्रीनशॉटला ट्विटरवर एक अन्य सुरक्षा शोधकर्ताकडून पोस्ट करण्यात आले आहे. ज्याला इलियट एल्डरसन नावाने ओळखले जाते. इतिहासातील सर्वात मोठा केवायसी डेटा लीक झाला आहे. वाचाः TechNadu च्या रिपोर्ट अनुसार, ईमेल आयडी, फोन नंबर, पासवर्ड अॅप्लिकेशन इन्स्टॉल, फोन निर्माता, आयपी अॅड्रेस, जीपीएस स्थान आणि युजर्सची अन्य माहिती लीक झाली होती. रिपोर्टमध्ये कथित विक्रेताने एक डार्क वेब पोर्टल बनवले आहे. या ठिकाणी कोणताही व्यक्ती डार्क वेब किंवा ईमेल आयडी शोधू शकतो. एकूण ८.२ टीबी डेटा मधून ही माहिती घेऊ शकतो. वाचाः कंपनीने फेब्रुवारी मध्ये राजशेखर यांच्या दाव्याला फेटाळले होते. परंतु, सोमवारी डार्क वेबवरून एक लिंक ऑनलाइनवर पाहिली गेली आहे. डार्क वेबवर त्यांची खासगी माहिती मोबिक्विकच्या डेटाच्या स्क्रीनशॉट सुद्धा पोस्ट करण्यात आले आहे. जे डार्क वेबवर विक्रीसाठी आणले होते. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, डेटा १.५ बिटकॉइन किंवा जवळपास ८६ हजार डॉलर मध्ये विकला जात होता. परंतु, मोबिक्विकने राजाहरिया यांच्याकडून करण्यात आलेल्या दाव्यांना फेटाळून लावले आहे. वाचाः कंपनीच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, काही मीडिया तथाकथित सिक्योरिटी रिसर्चने वारंवार आमच्या संघटन संबंधी किंमती सोबत मीडिया सदस्यांना नुकसान पोहोचवण्यासाठी चुकीच्या फाइली आणल्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही पूर्णपणे तपास केला आहे. आमच्याकडून कोणतीही सुरक्षेत चूक झाली नाही. आमच्या युजर्सचा डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fsl2po

Comments

clue frame