म. टा. प्रतिनिधी, पुणे करोनाच्या साथीमुळे भारताच्या ई-कॉमर्स बाजारपेठेमध्ये अनपेक्षित वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाजारपेठ २०२४पर्यंत ८४ टक्क्यांनी वाढून १११ अब्ज अमेरिकी डॉलर (सुमारे ८०४०.९० अब्ज रुपये) होईल, असा अंदाज आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘एफआयएस’ या कंपनीने सादर केलेल्या अहवालात वर्तविण्यात आला आहे. वाचाः जगातील ४१ देशांतील विद्यमान व भावी पेमेंट पद्धतींचे परीक्षण करणाऱ्या ‘एफआयएस’च्या ‘वर्ल्ड-पे २०२१ ग्लोबल पेमेंट’ अहवालामधून ही बाब पुढे आली आहे. या अहवालानुसार भारताची ई-कॉमर्स बाजारपेठ २०२४पर्यंत ८४ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. मोबाइलवरून होणाऱ्या खरेदीमुळे या वाढीला चालना मिळणार आहे. पुढील चार वर्षांत त्याचे प्रमाण वार्षिक २१ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. २०२०मध्ये डिजिटल वॉलेट (४० टक्के), क्रेडिट कार्ड (१५ टक्के) आणि डेबिट कार्ड (१५ टक्के) या सर्वांत लोकप्रिय पेमेंट पद्धती होत्या. भारतामध्ये ‘, ’ ही पद्धत वेगाने वाढत आहे. या अहवालानुसार सध्या याचे प्रमाण फक्त तीन टक्के असून, २०२४ पर्यंत ते नऊ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या खरेदीमुळे २०२४पर्यंत ऑनलाइन पेमेंटचा बाजारपेठेतील हिस्सा ४७ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. वाचाः अहवालामधील माहितीनुसार, भारतातील ‘पॉइंट ऑफ सेल’ (पीओएस) बाजारपेठ २०२४पर्यंत ४१ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या दुकानांमध्ये बिल देण्यासाठी सर्वाधिक रोख रकमेचाच वापर होत असून, त्याचे प्रमाण ३४ टक्के आहे. त्यानंतर डिजिटल वॉलेट (२२ टक्के) आणि डेबिट कार्ड पेमेंटचा (२० टक्के) क्रमांक आहे. अहवालानुसार, २०२४पर्यंत दुकानांमधील बिलांसाठी डिजिटल वॉलेट रोख व्यवहारांपेक्षा सर्वांत लोकप्रिय पद्धत ठरेल, असा अंदाज या अहवालात वर्तविण्यात आला आहे. त्या वेळी डिजिटल वॉलेट पेमेंट ३३ टक्के राहील, असा अंदाज आहे. ‘भारतीय ई-कॉमर्स इंडस्ट्रीमध्ये करोनामुळे प्रचंड वाढ झाल्याचे दिसते आहे. या क्षेत्राच्या विस्तारालादेखील मोठी संधी आहे,’ असे ‘एफआयएस वर्ल्ड-पे’ चे व्यवस्थापकीय संचालक (एशिया पॅसिफिक) फिल पोमफोर्ड यांनी सांगितले. ‘ई-कॉमर्स क्षमता आता फक्त पारंपरिक वेबसाइटपर्यंत मर्यादित राहिलेली नाही. ती रिटेल डिजिटल विश्वाशी संलग्न झाली आहे. डिजिटल पेमेंट अवलंबलेले व्यापारी भारतातील रिटेल व ई-कॉमर्स बाजारपेठेतील भावी विकासाचा अचूक फायदा करून घेऊ शकतील,’ असे पोमफोर्ड यांनी सांगितले. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31yMxp6
Comments
Post a Comment