बेकायदा ‘बूस्टर्स’मुळे पुणेकर ‘रेंज’बाहेर; बूस्टर्स आणि रिपीटर्स म्हणजे काय ?

Aditya.Tanawade@timesgroup.com Tweet : @AdityaTanawade पुणे ः पुणे शहरात गजबजलेल्या ठिकाणी मोबाइल रेंज मिळावी म्हणून बसविण्यात आलेले मोबाइल बूस्टर्स शहराच्या कनेक्टिव्हिटीमध्ये अडथळे ठरत असल्याचे समोर आले आहे. शहरातील अनेक बेकायदा बूस्टर्समुळे नागरिकांना मोबाइल रेंज आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नसून अशा बूस्टर्सवर कारवाई करण्याचा इशारा दूरसंचार विभागातर्फे देण्यात आला आहे. वाचाः बेकायदा स्वरूपात बूस्टर्सची सर्वाधिक संख्या पुण्यातील मध्यवस्ती आणि पेठांमध्ये आढळून आल्याचे निरीक्षण दूरसंचार विभागाने नोंदवले आहे. काही दिवसांपूर्वी यातील शेकडो बूस्टर्स आणि रिपीटर्सवर कारवाई करण्यात आली असून अशाच प्रकारच्या बूस्टर्सचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मध्यवस्तीत निमुळत्या गल्ल्या आणि जोडून घरे आहेत. इथल्या इमारतींच्या चुकीच्या बांधणीमुळे घरांमध्ये रेंज पोहोचायला अडथळे येतात. यामुळे अनेक नागरिक आणि दुकानांमधील व्यावसायिक ‘बूस्टर्स’ लावून मोबाइल टॉवरची रेंज खेचून घेण्याचा प्रयत्न करतात. हे बूस्टर्स अत्यंत स्वस्त दरात बाजारात उपलब्ध असल्याने केवळ तीन ते चार हजार रुपयांमध्ये त्याची खरेदी केली जाते आणि ‘रेंज’ वळवण्याचे प्रयत्न केले जातात. यामुळे त्याचा फटका इतर नागरिकांना बसत असून काही विशिष्ट व्यक्ती सोडल्या; तर मोबाइल नेटवर्क नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. यावर मार्ग काढण्यासाठी शहरातील दूरसंचार विभागातर्फे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात आली असून ही पथके शहरातील बूस्टर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत मोबाइल रेंज मिळवण्यासाठी बेकायदा बूस्टर्स वापरू नयेत, असे आवाहन दूरसंचार विभागाकडून करण्यात आले असून बेकायदा बूस्टर्सची माहिती विभागाला द्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे. वाचाः दीड वर्षांत ६०० बूस्टर्सवर कारवाई गेल्या दीड वर्षांमध्ये पुण्यातील मध्यवस्तीतील साधारण सहाशे बूस्टर्स आणि शंभराहून अधिक रिपीटर्सवर कारवाई करून ते निकामी करण्यात आले आहेत. यामध्ये बुधवार पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ या परिसरात सर्वाधिक बूस्टर्स बसवले जात असल्याचे आढळून आले आहेत. काही दिवसांपूर्वी फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत केलेल्या कारवाईत बेकायदा बूस्टर्स बसवणाऱ्या नागरिकांना पोलिसांमार्फत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. बूस्टर्स आणि रिपीटर्स म्हणजे काय ? बूस्टर्स आणि रिपीटर्स ही दोन उपकरणे सिग्नलची क्षमता वाढवण्यासाठी वापरली जातात. बूस्टर्स हे उपकरण मोबाइल टॉवरवरून फ्रीक्वेन्सी खेचण्यासाठी वापरले जाते; तर रिपीटर्स उपकरण फ्रीक्वेन्सीची क्षमता दुपटीने वाढवण्यासाठी वापरतात. दोन्ही उपकरणांमुळे परिसरात मिळणाऱ्या नेटवर्कमध्ये अडथळे निर्माण होतात. बूस्टर्स ठरू शकतात घातक बूस्टर्स बसवल्याने रेंज एका विशिष्ट परिसरात खेचली जात असल्याने तेथील नागरिकांना जरी त्याचा फायदा होत असला तरी बूस्टर्सचा वापर अत्यंत घातक असल्याचे दूरसंचार विभागातर्फे सांगण्यात आले आहे. याचे दूरगामी परिणाम वाईट असून यामुळे शहराच्या कनेक्टिव्हिटीवर विपरीत परिणाम होतील, असा इशारा टेलिकॉम तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. बेकायदा ‘बूस्टर्स’चा वापर करणे कायद्याने गुन्हा ठरू शकतो. टेलिकॉम कंपन्या स्पेक्ट्रमसाठी प्रचंड पैसे मोजतात त्यामध्ये काही विशिष्ट लोकांपर्यंत सेवा पोहोचवणे बंधनकारक असते. बूस्टर्स लावल्यामुळे या सेवेत अडथळे येतात. यात कंपन्यांनी तक्रार केली; तर नागरिकांवर भारतीय वायरलेस टेलिग्राफी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. - मिलिंद राऊत, संचालक, दूरसंचार विभाग पुणे शहरातील पेठांच्या भागात बूस्टर्स बसविण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. वर्षाच्या सुरुवातीला, अशा अनेक बूस्टर्सवर आम्ही कारवाई केली असून ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे. नागरिकांनी वेळीच सावध होऊन आपल्या परिसरात बसवलेले बूस्टर्स काढून टाकावेत. - अमित गौतम, वरिष्ठ अधिकारी, दूरसंचार विभाग वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lx8b6n

Comments

clue frame