हे आहेत सर्वात बेक्कार ५० पासवर्ड्स, तुम्हीही या पासवर्ड्सचा वापर करतात?

नवी दिल्लीः कमजोर पासवर्ड्ससंबंधी अनेक बातम्या आपण वाचल्या असतील. त्यासाठी अनेक युजर्संना सल्ला सुद्धा दिला जातो. अनेक युजर्स आपल्या अकाउंट्सचा पासवर्ड्स सोपा ठेवतात, कारण तो लक्षात राहावा म्हणून. परंतु, असे करणे अकाउंटसाठी धोक्याचे ठरू शकते. कमजोर पासवर्ड्स अनेक वेळा हॅक होण्याची भीती असते. कारण, हे कॉमन पासवर्ड्स असतात. वाचाः त्यामुळे युजर्संनी पासवर्ड्सला मजबूत करण्यासाठी विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे. याप्रकरणी राष्ट्रीय सायबर सुरक्षेचे लेफ्टिनंट जनरल (निवृत्त) राजेश पंत यांनी सांगितले की, सध्या सायबर हल्ल्यांची भीती दुपटीने वाढली आहे. देशात रोज ४ लाख मेलवेयर मिळतात. कमीत कमी ३७५ सायबर हल्ले होतात. जागतिक स्तरावर ही संध्या खूप मोठी आहे. त्यामुळे सावध राहणे हे अत्यंत महत्वाचे आहे. सुरक्षेसाठी जे काही करायला हवे ते केले पाहिजे. त्यामुळ एक स्ट्रॉंग पासवर्डचा वापर करायला हवा. तरच, युजर्स आपल्या अकाउंटला सुरक्षित ठेऊ शकतो. कोणत्याही अकाउंटचा पासवर्ड कमजोर ठेऊ नये. असे केल्यास अकाउंट कधीही हॅक होण्याची भीती असते. वाचाः प्रत्येक वर्षी प्रॉपिटिएरी पासवर्ड मॅनेजर NordPass वर्षातील सर्वात बेकार पासवर्डची यादी जारी करीत असतो. या लिस्टमध्ये दिलेले पासवर्ड क्रॅक करणे सोपे असते. केवळ सोपे नाही तर त्याला अवघ्या एका सेकंदात क्रॅक करता येऊ शकते. या यादीत गेल्या वर्षी पासवर्ड्स उपलब्ध आहे. जाणून घ्या २०२० मध्ये कोणत्या ५० पासवर्ड्स जोडले आहेत. जाणून घ्या. वाचाः २०२० मधील ५० पासवर्ड्सची ही यादी picture1, senha, Million2, aaron431, evite, jacket025, omgpop, qqww1122, qwer123456, unknown, chatbooks, 20100728, 5201314, Bangbang123, jobandtalent, default, 123654, ohmnamah23, zing, 102030, 147258369, party, myspace1, asd123, a123456789, 888888, 1234qwer, 147258, 999999, 159357, 88888888, 789456123, anhyeuem, 1q2w3e, 789456, 6655321, naruto, 123456789a, password123, hunter, 686584, iloveyou1, 25251325, love, 987654, princess1, 101010, 12341234, a801016 आणि 111 आहे. वाचाः पासवर्ड बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही कोणत्याही अकाउंटचा पासवर्ड बनवता त्यावेळी त्यात कमीत कमी १५ कॅरेक्टर असायला हवेत. या १५ कॅरेक्टर्समध्ये नंबर, लेटर्स आणि स्पेशल सिम्बॉल असायला हवेत. यात कोणत्याही कुटुंबातील, मित्राचा किंवा आवडत्या नावाचा समावेश करू नका. सोबत कोणतीही पोस्टकोड, फोन नंबर, बर्थ डेट, आयडी कार्ड, सोशल सिक्योरिटी नंबर्स पासवर्ड म्हणून वापर करू नका. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qYFJMr

Comments

clue frame