नवी दिल्लीः कोविड-१९ मुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला आहे. अशा तरुणांना लोन देण्यासाठी सध्या Google Play Store वर अनेक अॅप्स आहेत. देणाऱ्या या वरून पैसे घेतले खरे पण ते न चुकवता आल्याने नैराश्य आल्याने महिन्याभरात तीन तरुणांनी आत्महत्या केल्याची माहिती उघड झाली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणात एड्डु श्रवण यादव (२३), किरणि मोनिका (२८) आणि पी सुनील (२९) या तिघांचा समावेश आहे. या तिघांहीनी लोन अॅप्सवरून कर्ज घेतले होते. वाचाः १६ डिसेंबर रोजी किस्मतपूर मध्ये राहणाऱ्या २९ वर्षीय सॉफ्टवेयर इंजिनियर पी सुनिलने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. सुनील हैदराबादमधील मधापूरच्या एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता. परंतु,कोविडमुळे त्याची नोकरी गेली होती. लॉकडाउनमध्ये त्याला दुसरी नोकरी सुद्धा मिळाली नाही. त्यामुळे त्याने मोबाइल फोनवरून इंस्टेंट लोन अॅप्सवरून २ लाखांचे कर्ज घेतले होते. परंतु, नोकरी न मिळाल्याने तो या कर्जाचे हप्ते फेडू शकला नाही. त्याला नैराश्य आले व त्याने आत्महत्या केली. वाचाः २ लाख रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर लोन कंपनीने त्याच्या मागे तगादा लावला. मोबाइल डेटा आणि सोशल मीडियाच्या मदतीने या कंपन्यांनी सुनीलला ब्लॅकमेल करणे सुरू केले. त्याच्या पत्नीला व वडिलांना फोन करणे सुरू केले. यामुळे सुनील त्रस्त झाला. १६ डिसेंबर रोजी सुनीलने दुपारी दीडच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेनंतर सुनीलच्या पत्नीने ४२०, ३०६, ५०४, ५०६ आणि आयटी कलम ६७ अंतर्गत लोन कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. वाचाः या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सुनीलने मनी अॅप्सवरून कर्ज घेतले होते. कॅश, कॅश ऐरा, कॅश लॉयन, लकी वॉलेट, कोको कॅश, रुपी पुस, इंडियन लोन, क्रेडिट फ्रिंच, टॅप क्रेडिट, राथेन लोन, कॅश पोर्ट, स्माइल लोन, क्रेडिट डे, कॅश टुडे, लकी रुपी, गो कॅश, स्नॅपिट लोन, लोन जोन, क्विक कॅश, पंडा रुपीस, प्ले कॅश, धानी, लॅजी पे, लोन टॅप, आयपीपीबी मोबाइल, मायक्रेडिट, क्विक क्रेडिट, कॅशऑन, रुपीस प्लस, रुपी नाउ, एलिफेंट लोन, एंट कॅश, क्विक मनी कडून सुनीलने लोन घेतले होते. अॅप्सच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची तपासणी पोलीस आता करीत आहेत. वाचाः याचप्रमाणे किरणि मोनिका (वय २८) हिने स्नॅपइटवरून इंस्टेंट लोन घेतले होते. परंतु, ते परत फेडू शकली नाही. कंपनीने तिच्या फोटोवर डिफॉल्टर लिून मोबाइल नंबर तिच्या कॉन्टॅक्टमधील लोकांना पाठवले. हे मेसेज वाचल्यानंतर तिने आत्महत्या केली. वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2J4mL6B
Comments
Post a Comment