WhatsApp Payची पेमेंट सेटअप कशी करावी? जाणून घ्या 

नवी दिल्ली: भारतात WhatsApp Pay लॉंच केलं गेलं आहे. यासाठी कंपनीला 3 वर्ष वाट पहावी लागली आहे. सध्या याची टेस्टींग सुरु असून काही जण याचा वापर करत आहेत.  WhatsApp च्या अधिकृत माहितीनुसार, आता यावरून लोकं एकमेकाला पैसे पाठवू शकणार आहेत. NPCI ने 2 कोटी नोंदणीकृत युजर्संना परवानगी दिली आहे.

सध्या भारतात  WhatsAppचे 40 कोटींहून अधिक युजर्स आहेत. सध्या दोन कोटी युजर्सना ही सेवा मिळणार आहे. 1 जानेवारी 2021 पासून ही सेवा सुरु होणार आहे. 

WhatsApp Pay setup process

 
ही सेवा कशी वापरायची त्याबद्दल जाणून घेऊया-

- पहिल्यांदा हे ऍप अपडेट करा.
  
- नंतर सेटिंग्जमध्ये जाऊन पेमेंट पर्याय सेटिंग्जमध्ये दर्शविला असेल तर तुम्ही आता पुढील प्रक्रिया सुरू करू शकता.

- त्यानंतर पेमेंट सेक्शनमध्ये जाऊन New Payment चा ऑप्शन दिसेल. त्यानंतर तुम्हाला ADD NEW असा पर्याय निवडावा.

WhatsApp Payment add

आता WhatsAppच्या E-wallet वरूनही पाठवता येणार पैसे ; NCPI ने दिली परवानगी

 - यानंतर  Add New Payment Method निवडून बॅंक सिलेक्ट करावी लागणार आहे. इथं बऱ्याच बॅंकांचे ऑप्शन मिळतील. बॅंक सिलेक्ट केल्यानंतर तुमचं अकाउंट  Verify केलं जाईल. इथं Verify Via SMS असा ऑप्शन दिसेल ते सिलेक्ट करा.

WhatsApp Payment NPCI

- WhatsApp चा आणि बॅंकेला लिंक असणारा नंबर एकच पाहिजे तरच व्हेरीफिकेशन यशस्वी होईल.

- व्हेरीफिकेशन झाल्यानंतर फिनिश असं बटन दिसेल ते दाबा. त्यानंतर  UPI पिन सेट करण्यास सांगितले जाईल. प्रत्येक पेमेंटला  UPI पिन टाकणे बंधनकारक असेल.

NPCI caps UPI market share from Jan; WhatsApp Pay to go live for 20 Mn users

- सगळं सेट अप झाल्यावर WhatsApp वरून खूप सहजरित्या ग्राहकांना पैसे पाठवता येतील. यासाठी WhatsAppवर कॉन्टॅक्टमधील नंबरवर जाऊन टॅप करावं लागेल. इथं अटॅचमेंट आयकॉनवर जावं लागेल. त्यानंतर पेमेंट ऑप्शनवर टॅप करुन किती पैशे पाठवायचे आहेत ते अमाउंट टाकावी लागेल.

भारत ही मोठी बाजारपेठ-
व्हॉट्सअपसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. व्हॉट्सअपच्या 1.5 अब्ज युजर्संपैकी 40 कोटी युजर्स भारतातील आहेत. सध्या भारतात UPIवर आधारित 45 पेक्षा जास्त ऍप आहेत, जे डिजीटल पेमेंट सेवा पुरवतात. यामध्ये गुगल पे, अॅमेझॉन पे, फ्लिपकार्ट आणि फोन-पे अशा प्रकारची ऍप आहेत. तसेच 140 बॅंकाही डिजीटल पेमेंट सेवा देतात यामध्ये पेटीएम पेमेंट्स बँक, एअरटेल पेमेंट्स बँक आणि अॅक्सिस बँक यांचा समावेश आहे.

(edited by- pramod sarawale)
 



from News Story Feeds https://ift.tt/3k5OOip

Comments

clue frame