Positive Story : सर्वांत स्वस्त कोरोना टेस्टिंग कीट येणार बाजारात; आयआयटी खरगपूरची कमाल!

पुणे : सर्वात स्वस्त कोरोना निदान संच खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) विकसित केला असून, तो लवकरच बाजारात येणार आहे. कारण आयआयटीच्या 'कोव्हिरॅप' या निदान संचाला भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) नुकतीच मान्यता दिली आहे. 

सात महिन्यांनी भरला वाडेश्वर कट्टा; महापौर, मनपा आयुक्त उपस्थित

रेण्विय निदान पद्धतीचा वापर करत शास्त्रज्ञांनी सहज हाताळण्या जोगे (पोर्टेबल) संयंत्र विकसित केले आहे. विशेष म्हणजे या संयंत्राची किंमतही अत्यंत कमी असून, सध्या एका निदान चाचणीसाठी 500 रुपयांचा खर्च येतो. औद्योगिक उत्पादन झाल्यास निदान चाचणीची किंमत कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आयआयटी खरगपूरचे संचालक प्रा. व्हि.के.तीवारी यांनी सांगितले. कोरोनाचे निदान करण्यासाठी सर्वात स्वस्त आणि अचूक निदान संच विकसित करत आयआयटीच्या संशोधकांनी आत्मनिर्भर भारतामध्ये मोठे योगदान दिले आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ.रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी दिली. प्रा. सुमन चक्रवर्ती, डॉ.अरिंदम मोंडल यांच्या नेतृत्वात शास्त्रज्ञांच्या चमूने हा संच विकसित केला आहे.

रोहित पवार यांनी पाळला शब्द; नुकसानग्रस्त पाचशे कुटुंबांना मदतीचा हात

असे होते निदान :
- रेण्विय निदान पद्धतीचा वापर 
- घशातील किंवा नाकातील द्रव पदार्थाचा (स्वाब) नमुना म्हणून वापर 
- रसायनांमध्ये स्वाब बुडविल्यानंतर त्याला जैवनिर्देशक पट्टीवर ठेवण्यात येते. 
- संबंधीत पट्टी संचामध्ये क्रेडीट कार्डप्रमाणे घालण्यात येते. 
- त्यानंतर स्मार्ट फोन्सच्या माध्यमातून फोटो काढण्यात येतो.
- मोबाईलमधील सॉफ्टवेअर फोटोच्या आधारे कोरोनाचे अचूक निदान करते.

कोव्हिरॅपची वैशिष्ट्ये :
- संयंत्राची किंमत सर्वात स्वस्त आणि फक्त 500 रुपयात निदान 
- कोरोनाचे अचूक आणि विश्‍वासार्ह निदान एका तासात होते.
- नुकतीच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाचे निदान शक्‍य 
- कौशल्य नसलेली व्यक्तीही निदानाची प्रक्रिया सहज पूर्ण करू शकते. 
- भविष्यात इतरही संसर्गजन्य आजारांचे निदान करणे शक्‍य 
- ग्रामिण आणि दुर्गम भागातही निदानाची व्याप्ती वाढवता येईल. 

'आम्हाला काय दोष देताय'; पुणे विद्यापीठाच्या खुलाशावर विद्यार्थी-प्राध्यापक संतापले!​

आम्ही पेटंट केलेले हे संयंत्र रुग्णांचे अचूक निदान करण्यासाठी सक्षम ठरले आहे. केवळ कोरोनोचेच नाही तर 'आयसोथर्मल न्युक्‍लिक ऍसीड' प्रकारातील म्हणजेच डेंग्यू, संसर्गजन्य आजार, हिवताप, क्षयरोग आदींचे निदानही स्वस्त आणि अचूक पद्धतीने करणे शक्‍य होणार आहे. 
- प्रा. सुमन चक्रवर्ती, यांत्रिक अभियांत्रिकी, आयआयटी, खरगपूर. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)



from News Story Feeds https://ift.tt/31ua1ft

Comments

clue frame