देवाणघेवाणीची सोय 

भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी "ऍप' वापराची एक चळवळ उभी राहिल्यासारखी उभी राहिली. अनेकजण देशी "ऍप"चा शोध घेऊ लागले. स्वदेशीचा नारा दिल्याने अनेकजण स्वदेशी बनावटीचे "ऍप' वापरण्यावर भर देत आहेत. अशात अनेक नवनवीन भारतीय बनावटीचे "ऍप" उपलब्ध होण्यास सुरुवातही झाली आहे. पण एखाद्या ऍपला जर स्वदेशी ऍपचा पर्याय उपलब्ध नसेल तर युजर्स चिनी ऍप सोडून अन्य ऍपचा शोध घेताना दिसत आहेत. याच परिस्थितीचा फायदा उठवत गुगलने एक संधी शोधली असून "शेअरइट' या फाईल शेअर करण्याच्या चिनी "ऍप'ला एक नवा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. गुगलने चिनी फाईल ट्रान्सफर ऍप "शेअरइट' वर भारत सरकारने बंदी घातल्यानंतर आपलं एक ऍप लॉन्च केलं आहे. या "ऍप'ला कंपनीने "निअरबाय शेअर" असं नाव दिलं आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

समाज माध्यमांच्या जगात सध्या अनेक ऍप आहेत. मल्टिमीडिया मोबाईल वापरत असल्यावर अनेक फाईल ट्रान्सफर करण्यासाठी आपणाला "ऍप'ची गरज भासत असते. शेअरइटसारख्या लोकप्रिय "ऍप'ला भारत सरकारने बंदी घातल्यानंतर भारतीय मोबाईल वापरकर्त्यांनाही पर्याय हवा होता. निअरबाय शेअर नावाचे "ऍप' आणले आहे. हे "ऍप' लोकप्रियही होत आहे. हे "ऍप' पूर्णपणे मोफत आहे. कुठलीही आकारणी या "ऍप'साठी केली जात नाही. 

हे "ऍप' ऍपलच्या ऍपल एअरड्रॉपप्रमाणे आहे. जे आयफोनमध्येही काम करतं. निअरबाय शेअरचा वापर करुन आपण "शेअरइट'प्रमाणे अगदी सहज फोनमध्ये पिक्‍चर, फाईल, फोटो आणि लिंक शेअर करता येतात. "ऍन्ड्राईड यूजर्स'ही सहजपणे या "ऍप'चा वापर करु शकतात. गुगलने हे नवं फिचर ऍन्ड्राईड वापरणाऱ्यांच्या गरजा लक्षात घेता बनवलं आहे. ज्याच्या मदतीने ते एकमेकांना डेटा सहजपणे ट्रान्सफर करु शकतात. यासाठी कमी वेळ लागणार आहे. हे नवं फिचर "ओएस ऍन्ड्रॉईड 6' आणि त्यानंतरच्या सर्व उपकरणांत देण्यात आलं आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऍपल डिव्हाईसमध्ये एअरड्रॉपमुळे डाटा ट्रान्सफर करणं सहज शक्‍य आहे. एअरड्रॉपच्या माध्यमातून डाटा ट्रान्सफर करणं सुरक्षितही आहे. सहसा याद्वारे डेटा चोरीचा धोका नसतो. त्याचबरोबर या "ऍप'च्या मदतीने मोबाईलमध्ये जास्तीचा झालेला डाटा कमी करता येतो. मेमरी क्‍लिनअपचा पर्यायही या ऍपमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ऍपमध्ये क्‍लिन (Clean), ब्राऊज (Browse), शेअर (Share) असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. शेअर या पर्यायामध्ये सेंड आणि रिसीव्ह असे दोन पर्याय देण्यात आलेले आहेत. या पर्यायाच्या माध्यमातून आपल्याला फाईल ट्रान्सफर करता येते. फाईल सेंड करताना मोबाईलचे लोकेशन एक्‍सेस द्यावे लागते त्यासोबतच आपल्या नावाची नोंद करावी लागते. त्यानंतर फाईल सेंड किंवा रिसीव्ह करता येते. हे ऍप गुगल प्ले स्टोअरवरही उपलब्ध आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या सुविधा 
1) फाईल शेअर करता येतात. 
2) एक्‍सेस डाटा शेअर करता येतो. 
3) डाटा ब्राऊज करुन थेट फाईल सर्च करता येते. 
4) ऑडिओ, व्हिडिओ आणि मजकूर किंवा लिंक अशा सर्व प्रकारचा डाटा शेअर करता येतो. 

निअरबाय शेअर ऍप वापराच्या पायऱ्या 
1) पहिल्यांदा हे ऍप गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड करावे. 
2) फाईल शेअरिंगसाठी लोकेशन एक्‍सेस द्यावे. 
3) नाव रजिस्टर करुन फाईल शेअर करावी. 



from News Story Feeds https://ift.tt/331uhGw

Comments

clue frame