गुड न्यूज: 'आता गुगल पे' वापरून कार्डने पेमेंट करता येणार; कशी वापरायची सुविधा?

पुणे : सध्या अनेकजण सोबत कॅश न ठेवता फोन पे, गुगल पे आणि पेटीएमचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहे. त्यामुळे अनेक गोष्टी सोईस्कर बनल्या आहेत. डिजिटल पेमेंटसाठी आघाडीवर असणाऱ्या 'गुगल पे'ने आता आपल्या ग्राहकांसाठी नवीन फिचर आणले आहे. गुगल पे वरून आता कार्ड पेमेंटची सुविधाही उपलब्ध होणार आहे.  गुगल पे ने काही दिवसांपूर्वीच अॅक्सिस बँक आणि स्टेट बँक यांच्या कार्ड नेटवर्कशी करार केला आहे. या दोन बँकांच्या डेबिट कार्डवरून तुम्हाला 'गुगल पे'द्वारे पेमेंट करता येणार आहे. 

भारतामध्ये क्रेडिट कार्ड क्षेत्रात स्टेट बँकेचं मोठं नाव आहे. अॅक्सिस बँक आणि स्टेट बँक या दोन्ही बँकांची कार्ड्स गुगल पेच्या टोकनायझेशन या नव्या संकल्पनेला धरून काम करणार आहे. ही नवी पद्धत ग्राहक आणि व्यापारी यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यवहार करण्यासाठी अधिक सुरक्षित आहे, अशी माहिती गुगल पे आणि एन.बी.यु.प्रमुख साजित शिवानंदन यांनी दिली.  

गुगल पूर्णत डिजिटल प्लॅटफॉर्मवर

गुगलने सप्टेंबर २०१९ मध्‍ये 'गुगल फॉर इंडिया' कार्यक्रमामध्ये भारतात कार्डवरून पेमेंटच्या योजनेची घोषणा केली होती. सध्या दोन बँकांबरोबर झालेली भागीदारी ही त्या कार्यक्रमाचा एक भाग आहे. सध्या गुगल पे ग्राहकांना बँक खात्याशी संबधित युपीआय हँडलचा उपयोग करण्याचा पर्याय होता. परंतु आता या सोबत कार्ड पेमेंट करण्याचा पर्यायही उपलब्ध होणार आहे.

टोकनायझेशन म्हणजे काय ?

कार्ड पेमेंटची टोकनायझेशन ही एक नवीन पद्धत आहे. या पद्धतीने व्यवहार अधिक सुरक्षित होतात. सुरुवातीला हि सुविधा फक्त व्हिसा कार्डधारकांसाठी उपलब्ध असेल प्रत्येक डेबिट कार्डधारकाची ओळख असावी म्हणून ग्राहकांच्या डेबिट कार्डवर १६ अंकी क्रमांक असतो. व्हिसा कार्ड या १६ अंकांना रँडम नंबरमध्‍ये बदलून त्यांना सेव्ह करते. जेव्हा कस्टमर त्या कार्डचा उपयोग करतील तेव्हा व्हिसा कार्ड नंबरऐवजी व्यापाऱ्यांसोबत टोकन नंबर शेअर होतो. यामुळे व्यापाऱ्यांना ग्राहकांचा कार्ड नंबर सुरक्षित राहतो व व्यवहार सुरळीतपणे पार पडतो. 

साधी सरळ व सुरक्षितरित्या ही प्रणाली

'गुगल पे'चा वापर करताना फक्त ओटीपीचा वापर करून तुम्हाला कार्डची नोंदणी करता येईल. तसेच त्याला टोकन पद्धतीने तुम्हाला सेव्ह करता येणार आहे. कोणताही व्यवहार करताना गुगल पे उघडल्यानंतर पैसे पाठविण्यासाठी किंवा स्विकारण्यासाठी तुम्हाला सेव्ह केलेले कार्ड निवडवावे लागेल. तसेच ओटीपी  माध्यमातून ते प्रमाणित केल्यानंतर तुमचे पेमेंट होईल. अगदी साधी सरळ व सुरक्षित अशी ही प्रणाली आहे. तसेच यामध्ये कार्डचा नंबर, सीव्हीव्ही आणि एक्स्पायरी डेट हे सर्व वारंवार टाकायची काहीच गरज भासणार नाही. विविध बिले भरण्यासाठीतसेच इ-कॉमर्स व्यवहारासाठी या पध्द्तीचा वापर करता येणार आहे. 

या पद्धतीने पेमेंट करता येईल

कस्टमर्सना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये  NFC (Near Field Communication) हे फिचर सुरू करावे लागणार आहे. भारतामध्ये बऱ्याच स्मार्टफोनमध्ये NFC नसते. म्हणून व्हिसा टोकनायझेजन ही प्रणाली अधिक प्रमाणात वापरण्यात आलेली नाही. त्यामुळे आता क्यू आर (QR) कोड स्कॅन करून तुम्हाला कार्डवरून पेमेंट करता येईल. व्हिसासोबत करार झाल्यानंतर गुगल पेच्या माध्यमातून प्रत्येक व्यापारी डिजिटल पेमेंटची सुविधा स्वीकारू शकेल. स्टेट बँक आणि ॲक्सिस बँकेचे कार्डधारक यांना या सेवेचा प्राथमिक स्तरावर लाभ मिळणार आहे.



from News Story Feeds https://ift.tt/34dD9bB

Comments

clue frame