व्हॉट्सअपवरील तुमचे वैयक्तिक मेसेज कसे वाचले जाऊ शकतात? जाणून घ्या

नवी दिल्ली: सुशांतसिंह प्रकरणात दररोज बऱ्याच सेलिब्रेटींचे व्हॉट्सअप चॅट समोर येत आहे. यामुळे व्हॉट्सअप युजर्सला व्हॉट्सअपबद्दल असुरक्षितता वाटत असल्याचे दिसत आहे. कारण व्हॉट्सअप नेहमी सांगत आलं आहे की, आमच्या युजर्सचा सर्व डेटा एनक्रिप्टेड असून तो सेंडर आणि रिसिव्हरशिवाय कोणीही पाहू शकत नाही. आता विविध माध्यमांत येत असलेल्या सेलिब्रेटींमधील चॅटवरून व्हॉट्सअपच्या प्रायव्हसीवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

व्हॉट्सअपच त्यांच्या सुरक्षेवर म्हणालं आहे की, व्हॉट्सअपवर एंड टू एंड एनक्रिप्टेड चॅटींग करता येत असल्याने कोणतीही थर्ड पार्टीला हे वाचता येऊ शकत नाही. एंड टू एंड एनक्रिप्टेड म्हणजे ज्यावेळेस एखादा मॅसेज सेंडरकडून रिसिव्हरला पाठविला जातो त्यावेळेस तो एका कोडमध्ये जात असतो. मध्ये कोणीच मॅसेजेस अथवा झालेली चॅटींग पाहू शकत नाही. 

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणामुळं व्हॉट्सअप संशयाच्या भोवऱ्यात; कंपनीने केला खुलासा

नेमकी कशी समजतेय व्हॉट्सअपवर चॅटींग-
व्हॉट्सअपवर अकाउंट काढताना यूजर्सला फक्त मोबाईल नंबरची गरज असते आणि त्याच्यावर आलेल्या मॅसेजद्वारेच अकाउंट व्हेरिफाय केलं जातं. व्हॉट्सअप दुसऱ्या सोशल मिडिया सर्विसेससारखं कोणताही पिन अथवा पासवर्ड सेट करण्याचा ऑप्शन देत नाही, ज्याद्वारे अकाउंटमध्ये लॉग इन केलं जाऊ नये. यावरून एक समजते की एखाद्या यूजर्सचा नंबर क्लोन केला तर त्याचं अकाउंटमध्ये लॉग इन केलं जाऊ शकतं. तसेच त्यात जुना चॅट बॅकअपही घेता येऊ शकतो. व्हॉट्सअपचा टू फॅक्टर ऑथिटिकेशनही अशात काम करु शकत नाही. कारण यासाठी लागणारा 6 अंकी कोडही यूजर्सच्या फोन नंबरवर येत असतो.  

 Happy Birthday - भारताच्या अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह

व्हॉट्सअपवर चॅट करणे वाईट नाही पण तिथं आपण थोडी काळजी घेतली पाहिजे. व्हॉट्सअप वापरताना सर्व सुरक्षा मोड ऑन ठेवली पाहिजेत. फिंगरप्रिंट आणि इतर अॅप लॉक नेहमी ऑन ठेवली पाहिजेत. 

लिक झालेल्या चॅटींगबद्दल व्हॉट्सअप​चं स्पष्टीकरण-
या संदर्भात व्हॉट्सअपच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की, व्हॉट्सअपचे मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्शननुसार पूर्णपणे सुरक्षित आहेत. या दरम्यान तिसरा कोणीही हे मेसेज वाचू शकत नाही. अगदी व्हॉट्सअपलाही हे मेसेज वाचता येत नाहीत. व्हॉट्सअपचं सायनिंग केवळ एका नंबरने होतं, असं कंपनीनं म्हटलंय. सुशांतसिंह प्रकरणाच्या चौकशी दरम्यान, जुन्या व्हॉट्सअप चॅटचा आधार घेत एनसीबीने अनेक बड्या कलाकारांना समन्स बजावलंय. त्यामुळं देशभरात व्हॉट्सअप सुरक्षित नसल्याची ओरड होऊ लागली आहे. त्यामुळंच कंपनीला खुलासा करावा लागत आहे. चौकशी अधिकाऱ्यांना कायदेशीर पद्धतीने जुना डेटा मिळवण्याची अनुमती आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना फॉरेन्सिक पद्धतीनं या डेटापर्यंत पोहचावं लागतं, असं व्हॉट्सअपकडून स्पष्ट करण्यात आलंय.



from News Story Feeds https://ift.tt/3i2Nyvy

Comments

clue frame