गुगल मॅपमध्ये नवीन 'कोविड लेयर' फीचर जोडला जातोय, तो सांगेल कोणत्या भागात किती आहेत कोविड केसेस

पुणे : जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. हा कोरोनाचा प्रसार थांबायच नाव काही घेत नाही. दरम्यान, गुगलने आपल्या स्मार्टफोनमधील गुगल मॅपसाठी एक नवीन फीचर जाहीर केले आहे. गुगल मॅपच्या या नवीन फीचरचे 'कोविड लेयर' असे नाव देण्यात आले आहे.

गुगलच्या मते, हे फीचर यूजर्सना एखाद्या भागातील कोरोनाबाधित संख्येची माहिती दर्शवेल. यूजर्सना त्या भागात जायचे की नाही हे ठरविण्यास मदत करेल.

सध्या जगभरात पसरलेली कोरोनाची साथ दिवसेंदिवस वाढतच आहे. भारत देश हा कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांपैकी एक आहे. दरम्यान, गुगलचे 'कोविड लेयर' हे नवीन फीचर केवळ अँड्रॉइड आणि आयओएस या दोघांसाठी रिलीज करणार आहे.

'कोविड लेयर' फीचर कसे करेल काम 

गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, यूजर्सना गुगल मॅप उघडून त्यामध्ये डेटा पाहू शकता. यासाठी, त्यांना स्क्रीनच्या उजव्या बाजूला लेयर बटण टॅप करावे लागेल. यानंतर त्यांना 'कोविड-19 इंफो' माहिती' वर क्लिक करावे लागेल.

हे फीचर यूजर्सना मॅप पाहण्याची अनुमती देते. यावेळी त्या भागातील एक लाख लोकांना दररोज सरासरी सात दिवसांची कोविड प्रकरणे दर्शवली जातील आणि येथे एक लेबल देखील असेल जे कोरोना प्रकरण ट्रेंड होत आहे की नाही हे सांगेल. ज्या भागात गुगल मॅप सपोर्ट करतोय त्या भागात सर्व ठिकाणी हा डेटा दिसेल. 

काही विशिष्ट भागासाठी कोविड-19 केसेसचा डेटा हा गुगल वेगवेगळ्या सोर्सेजने कलेक्ट करेल. त्यात जॉन्स हॉपकिन्स, न्यूयॉर्क टाइम्स आणि विकिपीडियाचा समावेश असेल.

या सोर्सेजला जागतिक आरोग्य संघटना, सरकारी आरोग्य मंत्रालये आणि राज्य व स्थानिक आरोग्य संस्था व रुग्णालये यासारख्या सार्वजनिक आरोग्य संस्थांकडून डेटा मिळतो.



from News Story Feeds https://ift.tt/2EBKxVc

Comments

clue frame