थांबा! ऑक्सिजन चेक करण्यासाठी Apps वापरताय? भारत सरकारने दिला इशारा

नवी दिल्ली: कोरोनाकाळात आपण दररोज सॅनिटायझरचा वापर करतो. त्याशिवाय ऑक्सिमिटरच्या सहाय्याने शरीरातील ऑक्सिजनची लेवलही तपासत असतो. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असतो, त्यामुळे शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी होत असते. आता बरेच लोक मोबाईल फोनवर उपलब्ध असणाऱ्या ऍप्सद्वारे शरीरातील ऑक्सीजन चेक करत आहेत, जे आपल्यासाठी धोकादायक आहे. मोबाईलद्वारे ऑक्सिजन चेक करण्याचं वाढतं प्रमाण पाहून आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

केंद्राने सायबर जागरुकता ट्वीटर हॅंडलवरून एक एडवायजरी जारी केली आहे. यामध्ये युजर्सना वेगवेगळ्या धोकादायक युआरएलवरून (URL) ऑक्सीजन चेक करणाऱ्या ऍप्सचा वापर करू नये असं सांगितलं आहे. त्यातील अनेक अॅप्स फेक असून त्यामधून युजर्सची माहिती, फोटो, फोन नंबर तसेच इतर महत्वाची माहिती चोरली जात असल्याचं सांगितलं आहे. तसेच या ऍप्समध्ये युजर्स आपली बायोमेट्रिक माहितीही देऊन बसतो, ज्याचा मोठा फटका युजर्सना बसू शकतो.  

WhatsApp मध्ये येणार नवीन 5 भन्नाट फीचर्स

बाजारात चांगल्या प्रतिचे ऑक्सिमीटर डिव्हाइस उपलब्ध आहेत, तरीही ऑक्सिमीटर ऍप्सची लोकप्रियता याकाळात वाढत आहे, पण यातली बहुतांश अॅप्स ही युजर्ससाठी धोकादायक आहे. 'सायबर दोस्त' या केंद्रीय गृह मंत्रालयाशी संबंधित असणाऱ्या ट्विटर हँडलवरून अशा धोकादायक एपबद्दल नागरिकांना सावध केले जाते. 

धक्कादायक! WhatsApp युजर्सच्या ऑनलाईन हालचाली होतायत ट्रॅक

ऑक्सिमीटर ऍप्स युजर्सच्या रक्तात असलेल्या ऑक्सिजनची पातळी तपासते असून युजर्सच्या हृदयाचे ठोकेही मोजते. विशेष म्हणजे या ऍप्सचा युजर्स किती उंचीवर आहे यानुसार ऑक्सिजनचं प्रमाण दाखवलं जातं. जे खूप धोकादायक आहे. लोक कोरोनाच्या संकटकाळात काळजी घेण्यासाठी दररोज ऑक्सिजनचं प्रमाण या ऍप्सद्वारे चेक करत आहेत. मात्र ही अॅप्स खासगी माहिती चोरत असून त्याचा गैरवापर केला जाण्याची भीती आहे. त्यामुळेच अशी अॅप वापरण्यापासून सावध रहा असं सरकारच्यावतीने सांगण्यात आलं आहे.

(edited by-pramod sarawale)



from News Story Feeds https://ift.tt/3kFE3UD

Comments

clue frame