दैनंदिन जीवनात स्मार्टफोन हा अविभाज्य भाग बनला आहे. सोशल मीडियावर अपडेट राहण्यासाठी इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारख्या अॅपचा वापर केला जातो. यावर फोटोज अपलोड करून अनेक जण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहतात. लाखो लोक त्यांच्या स्मार्टफोनचा वापर यासाठी करत असतात. याशिवाय फोटो, कामाची कागदपत्र यांसारख्या गोष्टीही सेव्ह करत असतात. कधी कधी एखादी व्यक्ती आपल्याकडे फोन मागते. यात फोटो काढण्यासाठी किंवा कॉल करण्यासाठी फोन मागितला जातो. त्यावेळी अचानक आपल्या खाजगी डेटाच्या सुरक्षिततेची चिंता निर्माण होते.
कल्पना करा की तुम्ही एखाद्या कार्यक्रमात किंवा जास्त लोक असलेल्या ठिकाणी आहात. त्यावेळी तुमचा फोन दुसऱ्याच्या हातात असेल तर? एखादी व्यक्ती तुमच्या फोनमध्ये डोकावत असेल तर? अशावेळी तुम्ही फोनमधील डेटा डिलिट करण्याचा किंवा फोन लपवून ठेवण्याचा प्रयत्न कराल. पण ओळखीच्या व्यक्तीसोबत असं वागणं बरोबर ठरत नाही. मित्रमंडळी किंवा नातेवाईकांच्या हातात जेव्हा तुम्ही फोन देता तेव्हा तुमचा खाजगी डेटा सेफ राहील का असा प्रश्न उपस्थित होतो.
मात्र आता या सर्व चिंता Alt Z Life मुळे दूर होतील. Alt Z Life सर्वांना स्वतंत्रपणे जगण्यासाठी आणि खाजगीपणा अबाधित राखण्यासाठी मदत करते. यामध्ये सॅमसंगने क्विक स्विच आणि कंटेंट सजेशनची फीचर्स दिली आहेत. मेक फॉर इंडिया अंतर्गत कंपनीने हे पाऊल उचललं असून सॅमसंगच्या गॅलेक्सी A51 आणि गॅलेक्सी A71 मध्ये हे फीचर उपलब्ध आहे. स्मार्टफोन इंडस्ट्रीमधील मिड रेंज सेगमेंटमधील हे पहिलंच असं फीचर आहे. गॅलेक्सी A51 आणि गॅलेक्सी A71 स्मार्टफोन उच्च दर्जाचा कॅमेरा, स्क्रीन आणि दीर्घकाळ चालणाऱ्या बॅटरीसह ग्राहकांच्या हातात दिला जात आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये फ्लॅगशिप कॅमेरा फीचर्स आहेत .याशिवाय क्वाड कॅमेरा सेट अप्स सारखे सिंगल टेक, नाइट हायपरलॅप, प्रो कॅमेरा मोड, कस्टम फिल्टर, स्मार्ट सेल्फी अॅंगलसुद्धा आहेत.
कामाच्या ठिकाणी डेस्कवर स्मार्टफोन ठेवून जाण्याची सवय आहे का? तसंच फोनवरील आर्टीकल किंवा डॉक्युमेंट वाचण्यासाठी तुमचा फोन इतरांकडे देता का? तुमचा खाजगी डेटा कोणी बघेल अशी भीती वाटत असेल तर घाबरू नका Quick Switch तुमचा डेटा सुरक्षित ठेवेल.Quick Switckहे एक आल्ट झेड लाइफसाठी आवश्यक सर्व बाबी पूर्ण करतं. क्विक स्विच नावाप्रमाणेच त्याची प्रक्रिया वेगाने आणि कमी वेळेत करते. यामध्ये गॅलरी, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट यासारख्या खाजगी आणि पब्लिक युजर बेस अॅप स्वीच करण्याचा पर्याय मिळतो. आपण फोन एका हातातून दुसऱ्या हातात घेता घेता क्विक स्वीच करू शकतो. हे सहज आणि सोयीचं आहे. जेव्हा तुम्ही तुमचा स्मार्टफोन दुसऱ्या कोणाकडे देता तेव्हा फक्त पॉवर की दोन वेळा दाबून अॅक्टिव्ह करता येतं. अभिनेत्री राधिका मदन आणि सनी सिंह यांच्या एका व्हिडिओमधून क्विक स्वीच कसं वापरता येतं हे दिसतं.
क्विक स्विचचा वापर फक्त गॅलरीतील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी होतो असा नाही तर वेब ब्राउजर, व्हॉटसअॅपसह इतर अॅप्सचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठीही करता येतो. तुम्ही क्विक स्विच केलेलं कोणाला कळणार सुद्धा नाही इतकं सहज ते होतं. जेव्हा कोणी तुमची गॅलरी बघणार असतं तेव्हा त्यांना पब्लिक व्हर्जन दाखवू शकता. त्यावेळी Secure Folder मधील माहिती त्यांना पाहता येणार नाही. ती फक्त तुम्हालाच पाहता येईल. तुम्ही सेटिंग करून जे फोटो आणि इतर माहिती इतरांपासून सुरक्षित ठेवली आहे ती Secure Folder मध्ये राहते. हा फोल्डर सॅमसंग क्नॉक्सने तयार केला आहे.
कंटेंट सजेशन हे ‘On-Device AI’ फीचरमधून येतं. Secure Folder मध्ये Content Suggestions वापरून महत्वाचा आणि खाजगी डेटा त्या फोल्डरमध्ये मूव्ह केला जातो. युजर ही माहिती कोणाला दाखवायची हे ठरवू शकतो. त्यात फेस, इमेजेस आणि टॅग वापरू शकतो. कंटेंट सजेशनमधून मूव्ह केलेले फोटो आणि डेटा इतरांना पाहता येणार नाही. ही सर्व प्रोसेस डिव्हाइसवरच होते. यामध्ये क्लाउड किंवा बाहेरच्या सर्व्हरचा वापर होत नाही. सॅमसंगने पहिल्यांदाच हे फीचर्स दिले असून ग्राहकांना त्यांचे खाजगीपण जपता येईल.
एक उदाहरण घ्या, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सुट्टी साजरी केल्यानंतर घरी परत येता. तेव्हा तुमच्या फोनमध्ये खूप सारे फोटो आहेत. ते तुम्हाला कोणालाही दाखवायचे नाही. तुमच्या खास मित्रांनासुद्धा ते दिसू नयेत असं तुम्हाला वाटतं. जेव्हा तुम्ही मित्रांसोबत असता तेव्हा ते फोटो कोणीही पाहू शकतं अशा वेळी क्विक स्वीचचा पर्याय उपयोगी पडतो.
Galaxy A51 आणि Galaxy A71 ही डिव्हाइसेस सॅमसंग क्नॉक्सने सुरक्षित आहे. यामध्ये मल्टिलेअर डिफेन्स ग्रेड सिक्युरीटी प्लॅटफॉर्म असून One UI सॉफ्टवरेअवर तयार केलं आहे. Google च्या Android OS वर ते आधारीत आहे. ही एक प्रायव्हसी सिस्टीम encrypts असून युजरचा डेटा सुरक्षित ठेवतो. इतर स्मार्टफोन कंपन्यांनी अद्याप अशी सुविधा दिलेली नाही. सॅमसंग सुरक्षेबाबत असं पाऊल उचलणारी पहिलीच कंपनी आहे.
from News Story Feeds https://ift.tt/2ZOiY2o
Comments
Post a Comment