'फेक न्यूज' रोखण्यासाठी WhatsAppचं नवं भन्नाट फीचर

सध्या भारतात वापरल्या जाणाऱ्या ऍपमध्ये  WhatsApp (व्हॉट्सऍप) हे आघाडीवरील ऍप आहे. हे मेसेंजिंग अॅप वापरायला सोपे असल्याने ते कमी वेळात प्रसिद्धही होत आहे. तसेच व्हॉट्सऍपनेहमी आपले फिचर अपडेट करत आलं आहे. त्यामुळं ऍप दिवसेंदिवस वापरण्यास सोईस्कर होत आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सऍपने एक मेसेज वारंवार पाठवला गेला असेल तर त्यावर फॉरवर्ड (forwarded) असा मार्क दिसायचा. त्यामुळे काहीही विचार न करता मेसेज पुढे पाठवण्यावर काही प्रमाणात बंधने आली होती. आता व्हॉट्सऍप भारतात लवकरच अजून एक भन्नाट फिचर आणणार आहे.  दिल्लीत झालेला हिंसाचारात बनावट बातम्या मोठ्या प्रमाणात पसरत होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिथं व्हॉट्सअॅपवर भडक संदेश पाठवले गेले होते. त्यामुळे देशाची राजधानी दिल्ली हिंसाचाराच्या आगीत भस्मसात झाली होती. सोशल मीडियावर चालू असलेल्या अशा फेक न्यूजमुळे (fake news) बऱ्याचदा तुमचे आयुष्यही अडचणीत येऊ शकते. सध्या व्हॉट्सऍपचा विचार केला तर, सध्या भारतात 20 कोटींपेक्षा जास्त लोक व्हॉट्सअॅलपचा वापर करत आहेत. हे सर्वजण रोज कोट्यावधी मेसेजची देवाणघेवाण करत असतात. यामध्ये असे बरेच फॉरवर्ड केलेले मेसेज फेक असतात. पण, आपण त्याची शहानिशा न करता पुढे पाठवतो, जो एक गुन्हाही आहे. यावर व्हॉट्सऍपनं काढलेलं हे फिचर खूप महत्वपूर्ण आहे.   

सध्या भारतात काही युसर्ससाठीच उपलब्ध
व्हॉट्सअऍपने एक खास फिचर लॉंच केले आहे, ज्यात संबंधित फॉरवर्ड केलेल्या मेसेजचे सत्य कळू शकते. सध्या हे फिचर भारतातील काही युसर्ससाठीच उपलब्ध केले आहे, परंतु भविष्यात हे फिचर सर्वांना वापरता येईल. व्हॉट्सऍपचं हे फिचर सध्या अनेक देशांमध्ये वापरलं जात आहे, तिथं ते प्रचंड प्रसिध्दही होत आहे. व्हॉट्सऍपचं हे नवीन फिचर लवकरच भारतात सर्वाना उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

मॅग्निफाइंग ग्लासचा आइकॉन (भिंग काचेचे चिन्ह)
व्हॉट्सऍपने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की हे फिचर विशेष असून आपल्याला एखादा फॉरवर्ड मेसेज येताच त्याच्या बाजूला मॅग्निफाइंग ग्लासचा आइकन (भिंगाचे चिन्ह) असेल. हे चिन्ह केवळ पाच किंवा अधिक लोकांना पाठविलेल्या फॉरवर्ड मेसेजवरच असेल. या चिन्हावर दाबल्यावर, ते आपल्याला ब्राउझरकडे नेईल, तिथं आपल्याला त्या मेसेजमधील तथ्यांची (Facts) शहानिशा करता येईल. विशेष म्हणजे एखादा फोटो अथवा व्हिडिओ आला असेल तर आपल्याला त्याचीही शहानिशा करताही येते.

ठराविक देशांमध्येच आहे सुविधा!
मार्च 2020 मध्ये 'फेक न्यूज मॅग्निफाइंग ग्लास' या  फिचरची चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर हे फिचर अमेरिका, मेक्सिको, स्पेन, ब्रिटन, ब्राझील, इटली आणि आयर्लंड या देशांमध्ये सुरू करण्यात आलं आहे. हे व्हॉट्सऍपचं नवीन फिचर 'Android आणि  iOS' वर चालेल. हे फीचर वापरण्यासाठी यूजर्सला व्हॉट्सअॅपची अपडेट करावं लागेल.



from News Story Feeds https://ift.tt/3leSvnC

Comments

clue frame