यूजर्स नव्हे, तुम्ही-आम्ही कंपन्यांच्या हातातील बाहुलं!

इंटरनेट डेटा आणि त्याच्या वापराचे विश्लेषण करणाऱ्या डोमो या संकेतस्थळाने एक इन्फोग्राफिक शेअर केलं आहे. डेटा नेव्हर स्लीप असं शीर्षक असलेल्या या इन्फोग्राफिकमध्ये सद्या कोरोनाच्या काळात कशाप्रकारे डेटा वापरला जात आहे? आणि ऑनलाइन युजर्सचा कल कोणत्या गोष्टींकडे आहे? याची माहिती देण्यात आली आहे. झूम, टिकटॉक, स्काइप, नेटफ्लिक्स यासारख्या प्लॅटफॉर्मच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आलं आहे. हे विश्लेषण वाचलं तर, तुम्ही जगातील बड्या कंपन्यांच्या हातातील बाहुलं झाला आहात, हे स्पष्ट होतंय.  

कोरोनामुळे या वर्षी डेटाचा वापर आणि डिजिटलकडे वळलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. लोक घरातच अडकून पडले आहेत. मोठ्या प्रमाणावर कार्यालये, दुकाने, बँका आणि इतर गोष्टी बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन असलेल्यांची संख्या प्रचंड वाढली. समोर आलेल्या माहितीनुसार वर्क फ्रॉम होम करण्यासाठी लागणारी अॅप, व्हिडिओ चॅट, ऑनलाइन खरेदी, मनोरंजनासाठी ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचे प्रमाण जास्त आहे. एप्रिल 2020च्या रिपोर्टनुसार जगातील लोकसंख्येच्या 59 टक्के लोकांकडे इंटरनेट आहे. त्यापैकी 45 कोटींहून अधिक युजर्स सक्रीय आहेत. जानेवारी 2019 पासून युजर्सच्या संख्येत 3 टक्के वाढ झाली. सक्रीय युजर्सपैकी 42 कोटी लोक मोबाइलचा वापर करतात. त्यातील 38 कोटी युजर सोशल मीडियावर सक्रीय आहेत. 

हे वाचा - तुमच्या जगण्याचं नियंत्रण कुणाकडं? तुमच्याकडं की, जिओ-फेसबूक-गूगलकडं?

वर्क फ्रॉम होम
कोरोनामुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलं आहे. लॉकडाउनच्या आधीच्या काळात अमेरिकेत किमान 15 टक्के लोक वर्क फ्रॉम होम करत होते. सध्या हे प्रमाण तब्बल 50 टक्क्यांवर पोहोचलं आहे. मायक्रोसॉफ्ट टीमवर सध्या एका मिनिटाला जवळपास 52 हजार युजर्स कनेक्ट असतात. झूम मिटिंग हे अॅप वापराचं प्रमाणही वर्क फ्रॉम होममुळे वाढलं आहे. फेब्रुवारीमध्ये दिवसाला 20 लाख तर मार्चमध्ये दिवसाला 70 लाख युजर मिटिंगवर असायचे. आता हेच प्रमाण मिनिटामध्ये अंदाजे 2 लाख इतकं वाढलं आहे. 

 

व्हिडिओ चॅट
लोकांशी प्रत्यक्ष संपर्क कमी झाला असला तरी व्हर्च्युअल संपर्कात कोरोनाच्या काळात वाढ झाली. सोशल मीडिया मेसेजिंग अॅप, व्हिडिओ कॉलिंग अॅप यातून व्हिडिओ चॅटचं प्रमाणही वाढलं आहे. गुगल ड्युओच्या वापरात जानेवारी ते मार्च या काळात 12.4 टक्के वाढ झाली आहे. तर, स्काइपवर मिनिटाला जवळपास 28 हजार लोक ऑनलाइन असतात. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉटसअॅपवरून व्हिडिओ कॉलचे प्रमाण 51 टक्क्यांनी वाढले आहे. 

टेक्नॉलॉजीच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रीमिंग
घरात बसून कंटाळलेले लोक मनोरंजनासाठी विविध साधनं वापरत आहेत. सध्या ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वापरणाऱ्यांची संख्या मोठी असून HBO Max, Netflix, Disney Plus, Hulu यांच्यातील आधीपासून असलेली स्पर्धा या काळात आणखी जास्त तीव्र झाली आहे. लोक त्यांचा सर्वाधिक वेळ या प्लॅटफॉर्मवर व्यतीत करत आहेत. कंपन्यांच्या सबस्क्रीप्शनमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. नेटफ्लिक्सचे पहिल्या तिमाहीत जवळपास 1 कोटी 58 लाख नवे युजर वाढले आहेत. जानेवारी ते मार्च या कालावधीत 16 टक्के ट्राफिक वाढलं आहे.

Edited By - Suraj Yadav



from News Story Feeds https://ift.tt/3hh0jTu

Comments

clue frame