सरकारने मोटार व्हेइकलच्या नियमात केला मोठा बदल

नवी दिल्ली - इलेक्ट्रिक व्हेइकलला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने मोटर व्हेइकल अॅक्टमध्ये बदल केला आहे. केंद्रीय मोटर वाहन नियमांमध्ये सरकारने प्रसिद्ध केलेल्या नव्या संशोधनानुसार कार टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम किंवा टायर रिपेअर किट कारमध्ये असेल तर स्पेअर टायर ठेवण्याची गरज नाही. मोटर व्हेइकल अॅक्टमध्ये सुधारणा करताना बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढती संख्या लक्षात घेण्यात आली. कारमध्ये स्पेअर टायर नसल्यास जास्तीची जागा मिळेल आणि यामध्ये एक मोठी बॅटरी ठेवता येईल. 

देशात कार्बनच्या उत्सर्जनात होणाऱ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्राला पर्यावरणाची काळजी लागली आहे. यामुळे भारत इलेक्ट्रिक व्हेइकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाय करत आहे. नव्या सुधारणेनुसार इलेक्ट्रिकल व्हेइकलच्या मोठ्या बॅटरीला ठेवण्यासाठी रिकामी जागा आवश्यक आहे. ज्यामुळे व्हेइकलची रेंजही वाढवता येईल. यासाठी गाडीत स्पेअर टायरची जागा बॅटरीसाठी वापरता येईल. देशात इलेक्ट्रिक व्हेइकल खरेदी कऱणाऱ्यांसमोर मायलेजची सर्वात मोठी चिंता आहे.

हे वाचा - मारुती सुझुकी 7 सीटर WagonR लाँच करण्याच्या तयारीत?

गाड्यांमध्ये एक अतिरिक्त टायरच्या आवश्यकतेबाबत महत्वाचे बदल कऱण्यात आले आहेत. नव्या सुधारणेनुसार वाहनामध्ये इन बिल्ट टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम (TPMS) असलीच पाहिजे असं नाही. असंही सांगण्यात आलं आहे की, गाडीमध्ये कंपन्यांकडून टायर दुरुस्त कऱण्याचं किट आणि TPMS दिलं जात असेल तर अशा वाहनांमध्ये अतिरिक्त टायरची गरज नाही. त्यामुळे लोकांना गाडीत एक्स्ट्रा टायर ठेवण्याची आवश्यकता भासणार नाही. 

हे वाचा - नव्या जनरेशनची होंडा सिटी लाँच, भारतात पहिल्यांदाच कारमध्ये दिलंय अनोखं फीचर

TPMS चालकाला टायर प्रेशरबद्दल माहिती देतो आणि यातून इशाराही दिला जातो. टायर खराब असेल तर गाडी चालवणं धोक्याचं असतं. TPMS लो टायर प्रेशर इंडिकेटरचं एक चिन्ह असंत जे डॅशबोर्ड इन्स्ट्रुमेंट पॅनेलवर सिग्नल देतं. 



from News Story Feeds https://ift.tt/3jsWSus

Comments

clue frame