भारतीयांनी दाखवला इंगा; चिनी मोबाईल ब्रँडंना मोठे नुकसान

नवी दिल्ली- भारतात मोबाईल शिपमेंट २०२० मध्ये दुसऱ्या तिमाहीत ५१ टक्क्यांची घट झाली आहे. counterpoint research च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. मात्र, कोरोना महामारीचे संकट आणि चीन विरोध असूनही Xiaomi ने तिमाहीमध्ये आपलं नेतृत्व कायम ठेवले आहे. शिवाय सॅमसंगने महामारीच्या काळात सर्वाधिक रिकवरी प्राप्त केली असून कोविडपूर्व स्तरातील ९४ टक्के स्तर गाठला आहे. 

गाडीवर मागे बसणाऱ्यासाठी होणार बदल, सरकारचा नवा आदेश
एप्रिलमध्ये टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर मोबाईल बाजार पूर्णपणे ठप्प झाला होता. मात्र, आता बाजार सामान्य होताना दिसत आहे. Xiaomi ने २९ टक्के मार्केट शेअरसह आपली पहिली जागा कायम ठेवली आहे. Xiaomi नंतर samsung ने मोबाईल बाजारात आपले दुसरे स्थान टिकवले आहे. कंपनीने मार्च तिमाहीमध्ये २६ टक्के मार्केट शेअर प्राप्त केले आहेत. पहिल्या तिमाहीत हा हिस्सा केवळ १० टक्के होता.

जूनमध्ये संपणाऱ्या तिमाहीत तिसऱ्या क्रमांकावर Vivo आहे. Vivo ची मोबाईल मार्केटमधील हिस्सेदारी १७ टक्के आहे. गेल्या महिन्यापेक्षा कंपनीने ६० टक्क्यांनी रिकवरी केली आहे. Realme ११ टक्के बाजार हिस्स्यासह चौथ्या स्थानी आहे. गेल्या वर्षीच्या याच काळातल्या कंपनीचा हिस्सा तीन टक्क्यांनी जास्त होता. Oppo ने पुरवढा पातळीवर अनेक अडचणी सहन केल्या आहेत. तरी कंपनी ९ टक्के हिस्स्यासह पाचव्या स्थानी आहे.

भारतात टिकटॉक पुन्हा सुरु होणार? हालचाली सुरु
या पाच मोठ्या कंपन्यांशिवाय counterpoint research नुसार  OnePlus ने ३०,००० हजारांपेक्षा अधिक किमतीच्या मोबाईल बाजारात आपले स्थान पुन्हा मिळवले आहे. OnePlus Nord सोबत कंपनी मोबाईल बाजारात आपली पकड बनवण्याची शक्यता आहे. याशिवाय ४५ हजारांपेक्षा अधिकच्या सेगमेंटमध्ये  Apple ने आपले स्थान अबाधित ठेवले आहे. 

counterpoint research च्या विश्लेषक शिल्पी जैन यांनी या अहवालावरुन काही मुद्दे मांडले आहेत. भारतीय बाजारातील चिनी मोबाईल कंपन्यांची भागीदारी पहिल्या तिमाहीत ८१ टक्क्यांवरुन दुसऱ्या तिमाहीत ७२ टक्क्यांवर घसरली आहे. या घसरणीचे कारण Oppo, Vivo आणि Realme यांच्या पुरवठ्यामध्ये येणारी अडचण आणि भारतामध्ये चिनी वस्तूंविरोधात वाढणारी भावना याला कारणीभूत मानलं आहे. भारत सरकारने चीनच्या ५९ अॅपवर बंदी घातल्यानंतर ही भावना अधिक तीव्र झाली आहे. भारत आणि चीनमधील सीमा वादानंतर चिनी ब्रँडच्या शेअरमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

 



from News Story Feeds https://ift.tt/3hvjJUq

Comments

clue frame