नवी दिल्लीः बँक ऑनलाइन फ्रॉड दिवसेंदिवस वाढत आहेत. नुकतीच पुण्यातील एका ६१ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीच्या खात्यातून हॅकर्सने १ लाख ११ हजार रुपये लंपास केले आहेत. शनिवारी उघडकीस आलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी सांगितले की, हॅकर्सने एसएमएस द्वारे एका फेक नंबरवरून कॉल करुन अपडेट आणि एक्सटेंड करण्याचे खोटे सांगितले. शुक्रवारी सुद्धा अशीच घटना घडली होती. ज्यात एका व्यक्तीच्या खात्यातून १,९६,३९३ रुपये चोरी करण्यात आले होते. वाचाः KYC मुदत संपल्याची वॉर्निंग सायबर क्रिमिनल्स युजर्सला एसएमएस करून ई-वॉलेट सेक्शन साठी KYCची तारीख संपली असल्याचा इशारा दिला. या एसएमएसमध्ये हॅकर्सने एक नंबर देत या नंबरवर कॉल करण्यास सांगितले. केवायसी एक्सटेंड करण्यास सांगितले. या दोन्ही बँक ग्राहकांना हॅकर्संनी मोठ्या चलाखीने आपल्या जाळ्यात फसवले. त्यांच्याकडून बँक डिटेल्सची माहिती काढली आणि पैसे आपल्या अकाऊंटला ट्रान्सफर केले. अॅपवरून होतेय चोरी हॅकर्सने ज्यांची फसवणूक करायची आहे त्यांना 'Quick Support App' नावाचे एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले होते. या अॅपच्या मदतीने सायबर क्रिमिनल्सने दोन्ही ग्राहकांच्या खात्यातून आपल्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. या सारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला या संबंधी काही खास माहिती देत आहोत. हॅकर्सच्या भूलथापांना बळी पडू नका. वाचाः या गोष्टी ध्यानात ठेवा फेक कॉल आणि एसएमएस पासून राहा अलर्ट युजर्संना लक्ष्य करण्यासाठी हॅकर सर्वात आधी कॉल करून वॉलेट किंवा KYC ची मुदत संपली असल्याचे खोटे सांगतात. हॅकर्स युजर्संना विश्वासात घेऊन सांगतात की, ऑनलाइन व्हॅलिडेशनने याला पुन्हा एकदा अॅक्टिव करता येऊ शकते. कोणताही अॅप डाऊनलोड करु नका KYC अपडेट साठी युजर्सला हॅकर्स अॅप डाऊनलोड करण्यास सांगतात. हॅकर्स युजर्संना सांगतात की, त्यांना केवायसी वैधता साठी स्टेप बाय स्टेप गाईडलाईन्स देण्यात येईल. अॅप इन्स्टॉल केल्यानंतर हॅकर्स युजरच्या फोनची स्क्रीन पाहू शकतात. वाचाः पैसे ट्रान्सफरचा खेळ अॅप इन्स्टॉल केल्यानंतर हे अॅप काम करतेय की नाही, हे तपासण्यासाठी हॅकर युजर्सला वॉलेटमध्ये छोटा टोकन अमाउंट ट्रान्सफर करण्यास सांगतात. असे करीत असताना हॅकर्स पासवर्ड आणि अन्य माहीतीची चोरी करतात. मोठी अमाउंड करतात ट्रान्सफर हॅकर्स युजर्संना बँक डिटेल्सचा वापर करून आपल्या अकाऊंट मध्ये पैसे ट्रान्सफर करतात. ट्रान्झॅक्शनआधी युजर्सच्या नंबवरवर जो ओटीपी येतो. तो ओटीपी सायबर क्रिमिनल्स अॅपच्या माध्यमातून पाहू शकतात. तसेच दोन मिनिटात आपल्या नंबरवर पैसे ट्रान्सफर करुन घेतात. त्यामुळे सर्वांनी सावध राहणे गरेजेच आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YYPqOe
Comments
Post a Comment