सध्या इंटरनेटचा वापर वाढला असून, साहजिकच समाज माध्यमांचाही वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा वेळी व्हिडिओ कॉलिंगचे महत्त्व खूप वाढले आहे. लॉकडाउनमुळे बहुसंख्य लोक घराबाहेर न पडता घरूनच काम करत आहेत. अशा वेळी व्हॉइस कॉलपेक्षा व्हिडिओ कॉलिंगला महत्त्व प्राप्त झाले आहे. देश आता टाळेबंदीतून बाहेर पडत असून, ‘अनलॉक-१ला सुरुवात झाली असली, तरीही अनेक जण घरी राहणे आणि घरूनच काम करणे पसंत करत आहेत. अनेक कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. अशा परिस्थितीत आपले मित्र आणि इतरांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हिडिओ कॉलिंग हा उत्तम पर्याय असून, सध्या तो निवडण्याकडे सर्वांचाच कल आहे. व्हिडिओ कॉलिंगसाठी अनेक ॲप उपलब्ध आहेत. आपल्या गरजेनुसार आपण वेगवेगळ्या ॲपचा वापर करू शकतो. सध्या उपलब्ध असणाऱ्या आणि काही मजेशीर व्हिडिओ कॉलिंग ॲपविषयी...
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
डिसकोर्ड - डिसकोर्ड ॲपद्वारे तुम्ही टेक्स्ट मेसेज, व्हिडिओ कॉल, व्हिडिओ चॅट करू शकता. तसेच मोबाईल गेम खेळताना इतरांशी संवाद साधताना वरील तिन्हीपैकी कोणताही पर्याय वापरू शकता. हे ॲप विशेषतः ऑनलाइन गेमर्ससाठी बनवण्यात आले आहे. यात तुम्ही तुमचे मित्र सोडून अन्य गेमर्सनाही आमंत्रित करू शकता. हे ॲप ‘गुगल’ प्ले-स्टोअरवरही उपलब्ध आहे.
बन्च - मित्रांसोबत लाईव्ह मोबाईल गेम खेळणे नवे नाही. मात्र, बन्च ॲपमुळे तुम्हाला मित्रांसोबत ऑनलाइन मोबाईल गेम खेळताना व्हिडिओ चॅटिंग करणे शक्य होते. या ॲपच्या साह्याने तुम्ही ग्रुप कॉल करू शकता. त्यामुळे मित्रांबरोबर मोबाईल गेम खेळण्याची मजा घेता येते. ग्रुप कॉलमध्ये तुम्ही आठ जणांना आमंत्रित करू शकता.
हाउसपार्टी - हाउसपार्टी ॲपच्या माध्यमातून तुम्हाला आठ जणांशी संवाद साधता येतो. मात्र, हा केवळ व्हिडिओ कॉल ॲप नसून, याद्वारे मित्रांसोबत गेम खेळता येतो. या ॲपच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात एका फासाचे चित्र आहे. यावर क्लिक करून तुम्ही इनबिल्ट असलेले चार मोबाईल गेम खेळू शकता.
फेसबुक मेसेंजर - फेसबुक मेसेंजर हे ॲप तसे सर्वांच्या परिचयाचे आहे. कारण ‘फेसबुक’सारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर सध्या सर्वच जण असतात. फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून आपण एकाचवेळी ५० लोकांशी संपर्क साधू शकतो. तसेच, व्हिडिओ चॅटिंगसाठी वेळेची मर्यादा नाही. त्याबरोबर फेसबुक अकाउंटवरूनही सहभागी होण्याची गरज नाही. तुमची परवानगी असेल तरच अन्य व्यक्ती तुमचे प्रोफाइल पाहू शकते.
स्क्वाड - स्क्वाड ॲपमध्ये तुम्ही नेटफ्लिक्स, यू-ट्यूबवरचा कंटेट शेअर करू शकता. त्यामुळे तुम्ही एकाच वेळी मित्रांसोबत चित्रपट किंवा व्हिडिओ पाहू शकता. मित्रांसोबत व्हिडिओ कॉल सुरू असताना तुम्ही शेअर केलेला कंटेन्ट एकत्र पाहू शकता. तसेच या ॲपद्वारे टेक्स्ट मेसेजही पाठवू शकता.
मार्कोपोलो - हे खरे तर व्हिडिओ चॅट ॲप नाही. यात लाईव्ह वेळेत संवाद साधण्याची गरज नाही. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही स्पेशल इफेक्ट देत व्हिडिओ तयार करू शकता आणि तो मित्रांसोबत शेअर करू शकता. यामुळे तुमचे मित्र त्यांच्या सवडीनुसार हा व्हिडिओ पाहू शकतात आणि त्याला उत्तर देऊ शकतात. विशेषकरून हे ॲप जवळचे नातेवाईक व जवळचे मित्र यांच्यासाठी बनवण्यात आले आहे.
एबीएलओ - या ॲपच्या माध्यमातून तुम्ही जगभरातील व्यक्तींशी बोलू शकता. याच्या साह्याने जगभरातील नवीन मित्र जोडू शकता. तसेच रिअल टाइममध्ये त्यांच्याशी चॅटिंग करू शकता. हे ॲप जगाच्या नकाशावर तुमचे स्थान दाखवेल, तसेच तुम्ही आता कुठे संवाद साधत आहात हेही दाखवेल. भाषेची अडचणही या ॲपने सोडवली आहे. कारण या ॲपमध्ये ऑटो-ट्रान्सलेशनचा पर्याय आहे.
from News Story Feeds https://ift.tt/37IJRrn
Comments
Post a Comment