कृष्णवर्णीय महिलेमुळे अमेरिकेच्या अंतराळवीराचे उड्डाण शक्‍य

अमेरिकेचा पहिला नागरिक अंतराळात पोहचू शकला तो एका कृष्णवर्णीय महिलेमुळे! अर्थात मॅरी जॅक्‍सन, जिचे नाव नुकतेच वॉशिंग्टन डी.सी. येथील नासाच्या नव्या मुख्यालयाला देण्यात आले आहे. तिचे मोठेपण किंवा भेद दाखविण्यासाठी इथे तिच्या वर्णाचा उल्लेख केलेला नाही. मुळात तिचे कामच अशा भेदांच्या पलीकडे होते. पण आज तो नमूद करण्याच कारण प्रासंगिक आहे. पहिलं म्हणजे वर्णभेदावरून अमेरिकेत उठलेला वणवा (अर्थात त्याचे दोनही बाजून होणारे गलिच्छ राजकारण होतय), दुसरं म्हणजे भेद किंवा अन्याय मिटविण्यासाठी केवळ आकांडतांडव करण्याची आवश्‍यकता नाही आणि तिसरं म्हणजे विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन अशा अन्यायकारक समजूतींना निश्‍चित मिटवते. अमेरिका असो की भारत समाजातील अनिष्ठ रुढी, परंपरा आणि मानसिकतेवर बोट ठेवून राजकीय आणि सामाजिक गैरफायद्याची पोळी भाजणारे संधिसाधू सगळीकडेच दिसतात. त्यावर दीर्घकाळ उपाय शोधण्याचे आणि प्रत्यक्ष उदाहरण बनण्याचे काम अशा घटनांतून प्रणीत होते. आपण जाणून घेणार आहोत मॅरी जॅक्‍सन बद्दल आणि तिच्या विज्ञानातील योगदानाबद्दल... 

गुरूत्त्वीय लहरींद्वारे पुन्हा 'आइन्स्टाईन'च्या सिद्धांतांची परीक्षा

2016मध्ये आलेल्या "हीडन फिगर' या चित्रपटाने अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था असलेल्या नासामधील वर्णद्वेष आणि त्या तिघींचा लढा जगासमोर आणला! नासाच्या इतिहासातील सर्वांत बुद्धिमान आणि पहिल्या कृष्णवर्णीय महिला एरोस्पेस इंजिनिअर असलेल्या मेरी जॅक्‍सन (9 एप्रिल 1921 ते 11 फेब्रु 2005) यांचा जन्म व्हर्जेनियातील हॅम्पॉन शहरात झाला. हॅम्प्टन विद्यापीठातून गणित आणि भौतिक विज्ञानात त्यांनी बॅचलर डिग्री पूर्ण केली. 1951मध्ये त्यांनी नासात प्रवेश केला. आफ्रिकन अमेरिकन वंशाच्या लोकांसाठी असलेल्या "वेस्ट एरिया' विलगिकरण कॉंप्युटींग डिव्हिजनमध्ये त्यांनी कामाला सुरवात केली. प्रचंड तल्लख बुद्धिमत्तेच्या मेरी यांची 1958 मध्ये नॅशनल ऍडव्हायसरी कमिटी फॉर ऍस्ट्रोनॉट वर नियुक्ती करण्यात आली. 

एका सूर्यग्रहणामुळे आइन्स्टाईन झाले जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ

ही नियुक्तीचा प्रवास साधा आणि सोपा नव्हता. मुळात कृष्णवर्णियांबद्दल असलेली द्वेषाची भावना, तुलनेने कमी संसाधने व सुविधा असतानाही केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगती करणारी मेरी बहुतेकांच्या डोळ्यात खपत होती. कृष्णवर्णियांसाठी वेगळे ऑफिस, चहाचे कप एवढंच काय स्वच्छतागृहही वेगळी ठेवण्यात आली होती. बाहेर वावरताना मिळणारी दुटप्पी पणाची वागणूक, लोकांचा खालावलेला दृष्टिकोन हे सगळं त्यांनी सहन केलं. परंतु राजकारणापेक्षा बुद्धिमत्तेला महत्त्व देणारे प्रशासन एक प्रकारे मेरी यांना बढती देवून सामाजिक भेद मिटवत होते. अवकाशयानाच्या उड्डाणांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे "सुपरसॉनिक प्रेशर टनेल'चे काम मेरी यांनी केले. त्यांना या प्रकल्पावर बढती मिळावी, यासाठी वरिष्ठ इंजिनिअर केझीमिर्झ कॅझ्रानेकी (Kazimierz Czarnecki) प्रयत्नशील होते. त्यासाठी मेरी यांना व्हर्जिनिया विद्यापीठातून गणित आणि भौतिक विज्ञानातील पदव्युत्तर शिक्षण मिळविणे क्रमप्राप्त होते. त्याशिवाय त्यांना ही बढती देता आली नसती. त्यासाठी विद्यापीठात ऍडमिशन मिळविण्यासाठी करावा लागणारा झगडा आणि शिक्षण दोनही आव्हानात्मक होते. अखेरीस त्यांना पदवी मिळाल्यावर त्यांना तातडीने बढती देण्यात आली. 

Apple ची iPhone साठी नवी सिस्टिम, iOS 1 नंतर पहिल्यांदाच केला हा बदल

अमेरिकेच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेत अवकाशयाना संबंधीचे एअर फ्लो आणि थ्रस्ट डिझाईन विकसित करण्याचे काम मेरी यांनी केले. प्रत्यक्षात उड्डाण करणाऱ्या अवकाशयानाचे थॅरॉटिकल मॉडेलचा स्टडी त्यांनी केला होता. त्यांच्या कामातूनच यानाचे अंतिम डिझाईन निश्‍चित करण्यात आले होते. त्यानंतर हाय स्पीड एरोनॉटिकल आणि सुपरसॉनिक एरोनॉटिकल रिसर्च डिव्हिजनमध्ये महत्त्वपूर्ण संशोधन त्यांनी केले. नासाच्या 12 महत्त्वपूर्ण तांत्रिक संशोधनामध्ये त्यांचा सहभाग होता. 1985 पर्यंत त्या नासामध्ये कार्यरत होत्या. त्यांचा सन्मान म्हणून नासाच्या नव्या मुख्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.



from News Story Feeds https://ift.tt/2VvYjxU

Comments

clue frame