एका सूर्यग्रहणामुळे आइन्स्टाईन झाले जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ 

पुणे, ता. 23 ः रविवारी आपण सर्वांनीच सूर्यग्रहण पाहण्याचा मनसोक्त आनंद घेतला असेल. राज्यात ते खंडग्रास दिसले तर, उत्तर भारतात ते कंकणाकृती दिसले. पण, तुम्हाला कल्पना आहे का? अशाच एका 101 वर्षांपूर्वीच्या सूर्यग्रहणामुळे "अल्बर्ट आइन्स्टाईन' हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ बनले. पहिल्या महायुद्धानंतर प्रचंड राजकीय उलथापालथीच्या कालखंडातही विज्ञान कसे श्रेष्ठ ठरले, जाणून घेऊयात या जगप्रसिद्ध किस्स्यातून.... 

आइन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत आपण सर्वांनी ऐकला असेल. 1915 साली प्रसिद्ध झालेला हा सिद्धांत "जनरल थिअरी ऑफ रिलेटीव्हीटी' नावाने तो जगप्रसिद्ध आहे. याच्याशीच निगडित "बेंडीग ऑफ स्ट्रेट लाइट' म्हणजेच सरळ रेषेतील प्रकाशकिरणांची वक्रता असा एक सिद्धांत आहे. "अवकाशात प्रचंड वस्तुमान असलेला तारा, ग्रह किंवा कृष्णविवरामुळे सरळ रेषेत जाणारा प्रकाशकिरण गुरुत्वाकर्षणामुळे वक्र (बेंड) होतो', असा हा सिद्धांत सांगतो. थेरॉटीकल कॅल्क्‍यूलेशन करताना आइन्स्टाईन यांनी आपल्या जवळचा सर्वाधिक वस्तुमान असलेला तारा म्हणजेच "सूर्या'ला गृहीत धरले. गणितीय प्रक्रिया करून सूर्याच्या पाठीमागील ताऱ्यामधून येणाऱ्या सरळ रेशेतील प्रकाशकिरण त्याच्या कोनात (अँगल) किती बदल करेल याचे उत्तर शोधले. त्यांच्या म्हणण्यानुसार हा कोण 1.75 आर्क सेकंद एवढा असेल. यासंबंधीचा शोधनिबंधही त्यांनी 1911च्या दरम्यान प्रसिद्ध केला. परंतु कागदावर मांडलेली हे गणित प्रत्यक्षात खरं आहे का? याचे उत्तर मात्र प्रत्यक्ष प्रयोगातून मिळवावे लागेल. त्यासाठी आपल्याला चक्क सूर्य झाकावा लागेल, कारण तो झाकला तरच त्याच्यामागूण येणारा प्रकाशकिरण आपल्याला पाहता येईल. 

No photo description available.

दरम्यान याच कालावधीत इंग्लंडमध्ये सर आर्थर एडिंग्टन नावाचे खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांच्या वाचनात हा सिद्धांत आला. त्यासाठी त्यांनी इंग्लंडच्या रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीकडे वेधशाळा वापरण्याची परवानगीही मागितली होती. परंतु जर्मनीचा आणि त्यात ज्यू असलेल्या आइन्स्टाईनला रॉयल असलेले इंग्लंडचे शास्त्रज्ञ मात्र पाण्यात पाहत. गंमत अशी की त्यांचे लिखाण आणि संशोधनही इंग्लंडच्या लायब्ररीत ठेवण्यात आले नव्हते. सर एडिंग्टन जेव्हा लायब्ररीत आइन्स्टाईन बद्दल वाचायला गेले, तर त्यांच्या हातात एक संशोधन पत्रिका ठेवण्यात आली, जी 2005मधील एक शोधनिबंध होता. ग्रंथपालांनी आइन्स्टाईनबद्दल वाचण्यास एवढंच असल्याचे सांगितले ! तरीही मोठ्या जिद्दीने एडिंग्टन यांनी आइन्स्टाईनच्या संशोधनाबद्दल वाचन केले. अखेरीस त्यांच्या असे लक्षात आले की, खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी निरीक्षणे घेतल्यास सूर्याच्या पाठीमागे असलेल्या ताऱ्यांचा प्रकाश टिपता येईल. कारण त्यावेळी सूर्य पूर्ण झाकला जातो. सुदैवाने एडिंग्टन यांच्या संपूर्ण जीवनात दोन खग्रास सुर्यग्रहणे होणार होती. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही केली. परंतु त्यांचा पहिला प्रयत्न फार सफल झाला नाही. मात्र 29 मे 1919 रोजीचा प्रयत्न मात्र यशस्वी झाला. Image may contain: text that says "Einstein's general theory of relativity suggests that the sun's gravity bends the path light from distant stars. It's 'sa testable prediction, but only during total solar eclipse The eclipse of 1919 fit the bill nicely. Apparent location of star Earth Path of starlight Sun Actual location of star"

सूर्यग्रहणाच्या आधल्या दिवसाच्या रात्री सूर्य ज्या राशीत खग्रासग्रहण करेल त्या राशीतील ताऱ्यांचे फोटोग्राफीक प्लेटवर छाप घेण्यात आली. यामध्ये प्रकाशकिरण सरळ प्लेटवर आदळल्यास तिथे पांढरा डाग मिळतो आणि ताऱ्याची नोंद होते. दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष निरीक्षण घ्यायची होती पण सकाळपासून ढगांनी गर्दी केली होती. एडिंग्टन सह त्यांच्या सहकाऱ्यांनाही हे ही ग्रहण सुटते का काय? अशी भीती होती. पण सुदैवाने काही मिनिटांचा कालावधी त्यांना मिळाला. त्यांनी पटापट 16 प्लेट्‌सवर सूर्य झाकल्यावर त्याच्या पाठीमागून येणाऱ्या ताऱ्यांच्या प्रकाशच किरणांचे ठसे फोटोग्राफिक प्लेटवर नोंदवले गेले आणि प्लेट्‌स सुरक्षितपणे बंद करण्यात आल्या. या प्लेट्‌स बरोबरच एडिंग्टन आणि आइन्स्टाईन यांच्याबरोबरच भौतिकशास्त्रात क्रांती आणणाऱ्या संशोधनाचे पुरावेही कैद झाले होते. इंग्लंडमध्ये रॉयल सोसायटीच्या सभागृहात एडिंग्टन यांनी या प्लेट्‌स सादर केल्या. प्लेटवरील ताऱ्यांच्या ठस्यांमधून असे लक्षात आले की, सूर्य नसताना मिळालेले ठसे हे सूर्य असताना मिळालेल्या ठस्यांपासून थोडे बाजूला सरकलेले होते. याचाच अर्थ त्या ताऱ्यांमधून येणारे सरळ रेशेतील प्रकाशकिरण सूर्याच्या वस्तूमानामुळे वक्र (बेंड) झाले होते. प्रत्यक्ष अंतरही मोजण्यात आले. आणि विशेष म्हणजे आइन्स्टाईनने थेरॉटीकली काढलेल्या कोनाच्या किमतीशी ही किंमत बरोबर जुळली. त्यासभागृहात दोन फोटोग्राफिक प्लेटमुळे एडिंग्टन तर अजरामर झालेच पण त्याचबरोबर जर्मनीचा ज्यू शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ बनला..



from News Story Feeds https://ift.tt/2AY4q75

Comments

clue frame