जगात फक्त एकच माणूस खरेदी करू शकणार अशी बाइक

नवी दिल्ली, ता. 04 : जगप्रसिद्ध बाइक कंपनी MV Agusta एक अशी बाइक लाँच करत आहे जी फक्त एकच व्यक्ती खरेदी करू शकतो. कारण अशी एकच बाइक कंपनीने तयार केली आहे. कंपनीच्या Brutale 1000 RR सुपर-नेकेड बाइकचे हे अल्ट्रा-लिमिटेड एडिशन व्हर्जन आहे. MV Agusta Brutale 1000 RR ML या नावाने बाइक लाँच करण्यात येणार आहे.

Brutale 1000 RR ML या बाइकचा लूक स्टँडर्ड Brutale 1000 RR सारखाच आहे. अल्ट्रा लिमिटेड एडिशन बाइक ब्लू आणि व्हाइट कॉम्बिनेशनसह ट्रायकलर पेंट स्कीममध्ये आहे. बाइकची फ्रेम, अॅल्युमिनिअर व्हील्स आणि स्वींग आर्मवर गोल्डन पेंट आहे. गाडीच्या नावात असलेल्या अक्षरात ML आहे. याचा संबंध गाडी खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या शॉर्ट नेमशी असल्याचा दावाही करण्यात येत आहे.

नवीन ह्युंदाई i20 लाँचिंग लांबणीवर, आता सप्टेंबरमध्ये होणार लाँच

बाइकचे इंजिन किंवा इतर काही गोष्टी तशाच आहेत. गाडीचे इंजिन स्टँडर्ड  Brutale 1000 RR सारखेच आहे. 998cc च्या इंजिनची क्षमता 205 bhp असून 115 Nm टॉर्क जेनरेट करते. कंपनीने दावा केला आहे की,  अल्ट्रा-एक्सक्लूझिव मॉडेल 300 किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकते.

‘रिमुव्ह चायना ॲप’ गुगल प्ले स्टोअरवरून हटवले

Brutale 1000 RR ML बाइकमध्ये चार रायडिंग मोड आहेत. यामध्ये  रेस, स्पोर्ट्स, रेन आणि कस्टम यांचा समावेश आहे. यात 5-इंचाचा हाय-रिझोल्यूशन कलर TFT डिस्प्ले आहे. या डिस्प्लेमध्ये बाइकची माहिती मिळते. स्टँडर्ड Brutale 1000 RR प्रमाणेच यामध्येही Ohlins सस्पेन्शन आणि Brembo Stylema ब्रेक देण्यात आले आहेत.

मायक्रोसॉफ्टकडून नवा ब्रॉऊझर लाँच; वाचा काय असतील फिचर्स

MV Agusta अद्याप या सुपर एक्सक्लूझिव्ह बाइकची किंमत सांगितलेली नाही. फक्त एकच बाइक तयार होणार असल्यानं किंमत जास्त असण्याची शक्यता आहे. तसंच कंपनी किंमतीबाबत खुलासा करण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जात आहे.

 



from News Story Feeds https://ift.tt/2Bsk2zv

Comments

Post a Comment

clue frame