मेलबर्न : इंटरनेट स्पीडच्या बाबतीत संशोधकांनी कल्पनातीत वेग साध्य केला असून तब्बल एक हजार एचडी चित्रपट काही सेकंदंमध्ये डाऊनलोड होऊ शकतात. हा स्पीड आहे प्रती सेकंद ४४.२ टेराबाइटस, जो ऑस्ट्रेलियातील मोनाश, स्वीनबर्न आणि आरएमआयटी या विद्यापीठांच्या संशोधकांनी साध्य केला.मोनाशचे डॉ. बील कॉरकॉरन, आरएमआयटीचे प्रा. अर्नान मिचेल व स्वीनबर्नचे प्रा. डेव्हिड मॉस यांनी मेलबर्न शहरात ७६.६ किलोमीटरची डार्क ऑप्टीकल फायब्रस बसवून नेटवर्कची चाचणी (लोड-टेस्ट) घेतली. एका प्रकाश स्त्रोतापासून हा वेग साध्य करण्यात आला.
देशभर संसर्गाचे थैमान; योग्यवेळी लॉकडाउन केल्याचा केंद्राचा दावा
नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यास गटाच्या संशोधनानुसार डाटा ऑप्टीक्स आणि टेलीकम्युनिकेशन्स क्षेत्रात क्रांतिकारी बदल होऊ शकतो. ऑस्ट्रेलियातील टेलीकम्युनिकेशन्स नेटवर्क वेगवान करण्याबरोबरच कमालीची मागणी असते त्या कालावधीत (पिक पिरीयड्स) लाखो घरांमधील हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शनला पाठबळ देण्याची क्षमताही त्यात आहे.
तातडीने पायाभूत सुविधा उभ्या करा; मंत्रालयाच्या अकरा महापालिकांना सूचना
इतका अतुलनीय वेग साध्य करण्यासाठी संशोधकांनी ८० लेसर्सच्या जागी एका वस्तुच्या रुपातील मायक्रो-कॉम्ब हे साहित्य वापरले. सध्याच्या टेलीकम्युनिकेशन्स हार्डवेअर पेक्षा ते बरेच लहान व हलके असते. प्रयोगशाळेबाहेर मायक्रो-कॉम्ब बसविण्यात आले. त्यासाठी सध्याच्याच पायाभुत सुविधांचा वापर करण्यात आला. ऑस्ट्रेलियातील नॅशनल ब्रॉडबँड नेटवर्क याच सुविधांचा वापर करते. विशषथ म्हणजे फिल्ड ट्रायलसाठी मायक्रो-कॉम्बचा प्रथमच वापर झाला. प्रत्येक चॅनेलमधून ४टीएचझेड बँडविड्थ क्षमतेनुसार कमाल इंटरनेट वापर होऊ शकतो हे दिसून आले. सध्या कोरोनामुळे जवळपास जगभर लॉकडाउन असल्याने इंटरनेटवर कमालीचा ताण पडला आहे. अशावेळी हे संशोधन बहुमोल ठरते. २५ वर्षांनंतर कसे चित्र असेल याची झलक यातून मिळते.
आम्ही 'पॅकेज'च्या जाहिरातील करत नाही, आम्ही काम करतोय: मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर घणाघाती टीका
आपण जमिनीत यापूर्वीच ज्या फायबर बसविल्या आहेत, त्याची क्षमता या संशोधनातून प्रदर्शित होते. याबद्दल ऑस्ट्रेलियन वाहिनीचे प्रकल्पाबद्दल आभार मानावे लागतील. सध्याच्या व भविष्यातील कम्युनिकेशन नेटवर्कचा तो कणा असेल. भविष्यातील गरजेची पूर्तता करू शकेल असे काहीतरी आम्ही विकसित केले आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. बील कॉरकॉरन यांनी दिली आहे. मायक्रो-कॉम्बचे संशोधन हा एक प्रचंड महत्त्वाचा पल्ला आहे. बँडवीड्थच्या जगात सतत वाढणाऱ्या ज मागणीची आपण पुर्तता करू शकतो अशी आश्वासक स्थिती त्यामुळे निर्माण झाली आहे, असे प्रा. डेव्हिड मॉस यांनी म्हटलंय.
from News Story Feeds https://ift.tt/3gdWTkt
Comments
Post a Comment