करोना संसर्ग झालाय की नाही फोनवर शिंकल्यास कळणार

नवी दिल्लीः करोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी जगभरात प्रयत्न करण्यात येत आहे. करोनावर लस शोधण्यासाठी सुद्धा वैज्ञानिक प्रयत्न करीत आहेत. परंतु, अद्याप याला यश मिळालेले नाही. परंतु, लवकरच मोबाइलवर शिंकल्यास किंवा खोकलल्यानंतर करोनाचा संसर्ग झाला आहे की नाही, याचे निदान होऊ शकणार आहे, असा दावा अमेरिकेच्या एका संशोधन टीमने केला आहे. वाचाः अमेरिकेची रिसर्च टीम एका सेन्सरवर काम करीत आहे. ज्याला फोनसोबत अटॅच करता येवू शकते. तसेच अवघ्या ६० सेकंदात व्हायरसची माहिती मिळू शकते. हे सेन्सर पुढील ३ महिन्यात मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकेल, असे टीमने म्हटले आहे. हे सेन्सर स्वस्त असणार आहे. या डिव्हाईसची किंमत ५५ डॉलर म्हणजेच ४ हजार १०० रुपये असू शकते. करोना व्हायरसला ट्रॅक करण्यात महत्त्वाची भूमिका या प्रोजेक्टमधील प्राध्यापक मसूद तबीब अजहर यांनी सांगितले की, करोना व्हायरसला ट्र्रॅक करण्यासाठी या सेन्सरची महत्वाची भूमिका असणार आहे. प्राध्यापक मसूद हे अमेरिकेच्या विद्यापीठात युटॉमध्ये इंजिनिअर आहेत. या गॅझेटला सर्वात आधी डासाच्या नायनाटासाठी तयार करण्यात आले होते. आम्ही या प्रोजेक्टला जवळपास १२ महिन्यांपूर्वी सुरु केले होते. आमचा मुख्य हेतू म्हणजे व्हायरस डिटेक्ट करण्यासाठी स्वतः साठी पर्सनल सेन्सर उपलब्ध करणे हा होता. परंतु, आता आम्ही कोविड-१९ चा तपास लावण्यासाठी या प्रोग्रॅमचा वापर करीत आहोत. वाचाः १ मिनिटात मोबाइल स्क्रीनवर रिझल्ट येईल या डिव्हाईसचा प्रोटोटाइप १ इंच रुंद आहे. हे वायरलेस टेक्नोलॉजी ब्लूटूथ द्वारे कोणत्याही स्मार्टफोनसोबत कम्युनिकेट करू शकतो. जर एखाद्या व्यक्तीच्या सेन्सरच्या जवळपास श्वास घेणे, खोकणे, किंवा शिंकल्यास त्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाला आहे की नाही, हे कळू शकणार आहे. युजरला मायक्रोस्कोपिक पार्टिकल टाकण्याआधी फोनच्या चार्जिंग पोर्टमध्ये सेन्सर लावावे लागेल. तसेच आवश्यक अॅप डाऊनलोड करावा लागेल. त्यानंतर अवघ्या एका मिनिटात मोबाइल स्क्रीनवर रिझल्ट दिसेल, असे प्रा. मसूद म्हणाले. सेन्सरचा कलर बदलेल. किंवा व्हिज्युअल्सप्रमाणे कोविड-१९ च्या सध्याचे संकेत मिळेल. या सेन्सरचा मोठ्या सहजतेने पुन्हा एकदा वापर करता येईल. कारण, एका किंचित करंटने आधीच्या नमून्याला नष्ट केले जावू शकते, असेही मसूद यांनी सांगितले. वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36coA8A

Comments

clue frame