तांबडा - लाल रंग तुमच्यासाठी असा ठरु शकतो फायदेशीर....

प्रिझममधून प्रकाश किरण जातो तेव्हा त्याचे 7 रंगात (तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, आकाशी, गडद निळा, जांभळा) विभाजन होते त्याला शास्त्रीय भाषेत प्रकाशाचे विक्षेपण (Dispersion of Light) असे म्हणतात. हेच सात रंग इंद्रधनुष्यातही आढळतात. आपल्या शरीरामधून जाणारा प्रकाशही सात रंगात विभागला जातो. प्रत्येक रंग शरीराच्या ज्या भागातून जातो त्या भागातील अवयवांचे आरोग्य आणि विशिष्ट भावना त्या रंगाशी निगडित असतात. प्रत्येक रंगाची स्वतंत्र वैशिष्ट्ये, गुणधर्म समजून घेतली तर त्याचा दैनंदिन जीवनात वापर आरोग्य, ऐश्‍वर्य यश, व्यवसायवृद्धीसाठी नक्कीच करता येईल. जसे की कंपनी लोगोमध्ये नेमके कोणते रंग वापरावयाचे? महत्त्वाच्या मीटिंगसाठी कोणत्या रंगाचा शर्ट / ड्रेस घालावा जेणेकरून deal आपल्याला हवी तशी होईल, मनी पर्स कोणत्या रंगाची असावी? रंग आपल्या आयुष्यात अनेक बदल घडवू शकतात. त्यामुळे जाणून घेऊयात हे रंग काय परिणाम करतात आपल्यावर ते.

तांबडा - लाल रंग

  • हा सर्वात आकर्षक मानला जातो. शौर्य, धैर्य, संघर्ष, उत्तेजना, कामवासना, आवेग आणि उत्साह यांचे दर्शन या रंगाद्वारे होते. फूड इंडस्ट्री, क्रीडा क्षेत्र, लहान मुलांची उत्पादने, अग्निशामक दलामध्ये प्रामुख्याने लाल रंग वापरला जातो.
  • लाल रंगाचे कपडे, बेडशीट, खाण्यामध्ये लाल रंगाच्या भाज्या, फळे गोष्टी वापरून असुरक्षितपणाची भावना, भीती वाटणे, कंबर आणि कंबरेपासून खालील शरीराच्या कोणत्याही अवयवाचा आजार. उदा. गुडघेदुखी, कंबर दुखी, पाय दुखणे, टाच दुखी, सायटिका आदी विकार कमी करू शकतो. (इथे औषध बंद करणे अभिप्रेत नाही)

मोबाईल हा व्यवसाय आणि पब्लिक रिलेशनचा केंद्रबिंदू झालेला आहे. लाल रंग हा ऊर्जा, लक्ष आकर्षित करणारा आहे. त्यामुळे मोबाईल कव्हर लाल रंगाचे अथवा लाल रंगाचे डिझाईनमध्ये असलेले निवडले तर उत्तम.काही लहान मुले hyper active असतात. त्यांना लाल रंगाचा वापर टाळावा अन्यथा ते अधिक ऍक्‍टिव्ह होतात. अगदी शांत मुले असतील तर त्याच्यासाठी लाल रंग अधिक प्रमाणात वापरल्यामुळे मेंदूस उत्तेजना मिळते आणि त्यांची activity , शारीरिक हालचाली वाढतात. विद्यार्थ्यांकडून काही पाठ करवून घ्यायचे आहेत जसे की पाढे, कविता तर त्या लाल रंगात लिहून पाठ करण्यास सांगितल्यास लवकर पाठ होतात. विद्यार्थ्यांसाठी जे तक्ते बनवले जातात त्यामध्ये लाल रंग अधिक वापरावा.

वाचा - अख्ख्या जगाच्या उरात धडकी भरविणारी टोळधाड नक्की आहे तरी काय ?

या रंगातच मुळी एक प्रकारची ऊब असते, रक्तदाब, सर्दी, खोकला या विकारांसाठी हा रंग उपयोगी सिद्ध झाला आहे. लाल रंगाचा वापर करून शारीरिक ताकद, शक्ती, सांपत्तिक स्थिती, स्थैर्य आणि सुरक्षित असण्याची भावना आपण वाढवू शकतो. मुळावरच घाव बसला आहे, पायाखाची जमीन सरकली आहे अशा वेळेस ही लाल रंगाचा वापर त्या परिस्थितून बाहेर पडण्यास मदत करतो. सध्या कोरोना त्यामुळे आणि आलेल्या परिस्थितीमुळे सगळ्यांच्या मनामध्ये असुरक्षितेची, भीती प्रचंड प्रमाणात आहे. तेव्हा अधिकाधिक लाल रंगाचा वापर हा मानसिक स्थितीस उभारी देणारा आहे.

 



from News Story Feeds https://ift.tt/3es9PBt

Comments

clue frame