सावधान ! तुमचे व्हाट्सऍप चोरीला जाऊ शकते...   

सोशल माध्यमातील व्हाट्सऍप हे अनेकांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहे. व्हाट्सऍप या इन्स्टंट मेसेजिंग ऍप वर सध्या एक नवीन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये व्हाट्सऍपच्या अधिकृत टीमकडून असल्याचे सांगत, आपला व्हेरिफिकेशन कोड मागण्याचा प्रयत्न होत आहे. खोट्या अकाउंटचा वापर करून युजर्सचा व्हेरिफिकेशन कोड शेअर करण्याची विनंती करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीदेखील वेगवेगळ्या प्रकारे सोशल माध्यमांवर फसवणुकीच्या घटना घडल्या होत्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

युजर्सच्या व्हाट्सऍप अकाउंटचा ताबा घेण्यासाठी सध्या व्हाट्सऍपवर एक मेसेज पाठवण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये व्हाट्सऍपच्या कडून मेसेज असल्याचे सांगत युजर्सचा व्हेरिफिकेशन कोड शेअर करण्याची मागणी काही खोट्या अकाउंट करण्यात येत असल्याचे समजते. व्हाट्सऍपच्या अधिकृत टीमकडून हा मेसेज असल्याचे भासवण्यासाठी व्हाट्सऍपच्या लोगोचा प्रोफाइल पिक्चर म्हणून वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु व्हाट्सऍप आपल्या युजर्स सोबत संवाद साधण्यासाठी कधीही मेसेजऍपचा वापर करत नाही. व्हाट्सऍपच्या अधिकृत टीमकडून ट्विटर, सोशल माध्यमातील चॅनेल अथवा आपल्या अधिकृत ब्लॉग वरूनच युजर्स सोबत संवाद साधला जातो.                   

चीनसोबत जे काही सुरू आहे त्यावरून मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत - ट्रम्प

व्हाट्सऍप ट्रॅकर वेबसाइट WABetaInfo ने या प्रकारच्या फसवणुकी संदर्भात माहिती दिली आहे. यानुसार खोट्या अकाउंट वरून युजर्सचा अकाउंट व्हेरिफिकेशन क्रमांक जो सहा अंकी असतो, त्याची पुन्हा व्हेरिफिकेशनसाठी मागणी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. कोणतेही नवीन व्हाट्सऍप अकाउंट चालू करण्यापूर्वी व्हाट्सऍप कडून हा व्हेरिफिकेशन क्रमांक मोबाईल वर युजर्सला एसएमएस च्या माध्यमाद्वारे पाठविण्यात येतो.  

लॉकडाऊन वाढणार; पण...

व्हाट्सऍप युजर्सला हे खोटे अकाउंट अधिकृत दिसावे यासाठी व्हाट्सऍपच्या लोगोचा  प्रोफाइल पिक्चर म्हणून वापर करण्यात येत आहे. व्हाट्सऍपच्या अधिकृत टीमकडून युजर्स सोबत संपर्क साधण्यासाठी कधीच ऍपचा वापर करत नसल्याचे  WABetaInfo या ट्रॅकर वेबसाइटने म्हटले आहे. आणि अपवादात्मक परिस्थितीत व्हाट्सऍपच्या अधिकृत टीमकडून संपर्क साधला गेलाच तर, नावासोबतच पुढे अधिकृत मार्क देखील असेल. जेणेकरून व्हाट्सऍपचे अधिकृत अकाउंट असल्याचे समजेल. शिवाय फेसबुक शी संबंधित असलेली सर्व सोशल माध्यमे युजर्स कडून व्हेरिफिकेशन क्रमांकासहित कोणतीही माहिती कधीच मागत नाहीत. त्यामुळे अशा खोट्या अकाउंटने कोणतीही व्हेरिफिकेशन क्रमांक संबंधित मागणी करण्यात आल्यास पडताळणी केल्याखेरीज आपली माहिती शेअर न करण्याचा सल्ला  WABetaInfo ने दिला आहे.



from News Story Feeds https://ift.tt/3dpp6mg

Comments

clue frame