कोविड -19 मध्ये रक्ताची गुठळी का तयार होते ? संशोधक ही चक्रावले....

कोरोना विषाणू अनेक माध्यमांतून मानवी शरीरात आला की, अनेक लक्षणे दिसू लागतात. जसे की, डोके दुखणे, ताप येणे, सर्दी होणे, घशाला खवखव अशी काही लक्षणे दिसतात. मात्र, जेव्हा मनुष्य मृत होतो, तेव्हा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला की अन्य काही कारणामुळे झाला, हे शोधावे लागते. कोरोना विषाणूमुळे व्यक्ती मृत झाली अशा निष्कर्षापर्यंत तत्परतेने येणे हे अनेकदा अविचारी ठरू शकते, असे संशोधक म्हणतात. अनेकदा आपण कोरोनामुळे जगभरात इतके मृत्यू झाले, अशी आकडेवारी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित करत असतो; मात्र या पलीकडे जाऊनही पाहावे लागते. कोविड-19 च्या बाबतीत संशोधक अनेक अंगांनी शोध घेत आहेत. आता तर एक नवीन समस्या उद्‌भवली आहे. ती म्हणजे, कोविड-19 मुळे मानवी शरीरात रक्ताची गुठळी का तयार होते याचा शोध घेण्यास सुरवात झाली आहे; पण समाधानकारक सत्यापर्यंत अजून तरी संशोधक आलेले नाहीत. अनेक कारणांमुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. प्रश्‍न असा आहे, की कोविड-19 मुळे गुठळी तयार होते का? आणि हे रहस्य शोधण्यात संशोधक गुंतले आहेत. एक शंका अशीही वर्तवली जात आहे, की सार्स सीवोव्ही-2 रक्तवाहिन्यांतील एंडोथेलियल पेशीवर हल्ला करते. एंडोथेलियल पेशी ही एसीई-2 (संवेदी चेतनातंतूचे टोक म्हणजे रिसेप्टर) या (सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य) द्रव्याला आसरा देते. याद्वारेच हा विषाणू फुफ्फुसांच्या पेशीत प्रवेश करतो. तसा पुरावाही संशोधकांना मिळाला आहे. यामुळे एंडोथेलियल पेशीला या विषाणूंचा संसर्ग होतो. यावर स्वित्झर्लंडमधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल इन झुरीच, बर्मिंगहॅम आणि बोस्टनमधील वुमन्स हॉस्पिटल मॅस्साच्युसेटस्‌मधील संशोधकांनी सार्स सीवोव्ही-2 मध्ये प्रत्यक्ष मूत्रपिंडाच्या आतील एंडोथेलियल पेशीमध्ये हा संसर्ग झाल्याचे पाहिले. कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ ओट्टाव्वा हर्टस्‌ इन्स्टिट्यूटमधील मुख्य संशोधन अधिकारी डॉ. पीटर ल्यू म्हणाले, "सुदृढ लोकांमध्ये मात्र ही रक्तवाहिनी सरळ अन्‌ मऊशार असते.''

कोविड -19 मधील प्राणघातक गुंतागुंतीवर संशोधन सुरू

रक्तवाहिनीतील अस्तर क्रियाकलापामुळे गुठळी होण्याची क्रिया थांबते; मात्र विषाणूच्या संसर्गामुळे एंडोथेलियल पेशीचे नुकसान होते. तसेच प्रक्रियेस चालना देणारी प्रथिने मंथन करण्यास प्रवृत्त करते. विषाणूंच्या परिणामांमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. परिणामी, रक्ताच्या गुठळीवरही परिणाम होतो. कोविड-19 मध्ये काही लोकांमधील रोगप्रतिकारक पेशींच्या प्रवाहातील जोरदार रासायनिक संदेशांमुळे जळजळही होते. ही जळजळ गोठणे आणि गुठळी होण्याच्या मार्गावर चालना देते. लॉरेन्स ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19 मुळे फुफ्फुसे आणि त्वचेतील पेशींमध्ये मोठ्या प्रमाणात गुठळ्या आलेल्या दिसतात. वरील छायाचित्र पाहिल्यानंतर तुम्हाला गोठणे आणि गुठळी कशी तयार होते ते समजू शकेल. व्हॅंक्‍युव्हर येथील युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियातील हिमॅटॉलॉजी संशोधन गटातील संचालक ऍग्नेस ली म्हणतात, "जळजळणे आणि गुठळ्या होणे या दोन्ही प्रक्रिया परस्परसंबंधित आहेत.'' हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे.

वाचा - covid-19 वर कोणताही प्रभावी उपचार सापडला नसल्याने सर्व जग हतबल; पण...

कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांनी काही क्‍लिनिकल ट्रायल्स घेतल्या. या ट्रायल्समध्ये गुठळी होण्यास प्रतिबंध करणारे काही डोस दिले. म्हणजे, रक्त पातळ होणारी काही औषधे. जे लोक कोविड-19 मुळे बाधित होते, त्यांना उच्च डोस दिले गेले. अशा ट्रायल्स कॅनडा आणि स्वित्झर्लंड येथेही घेतल्या. अशा वेळी बेथ इस्रायल मेडिकेशन सेंटरमधील संशोधकांनी या क्‍लिनिकल ट्रायल्सची नोंदणी केली तेव्हा त्यांना पेशीतील प्लाझ्मीनोजीन ऍक्‍टिव्हेटर (टीपीए) सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. प्लाझ्मीनोजीन ऍक्‍टिव्हेटर हा ड्रग शक्तिशाली असून रक्तस्राव सर्वाधिक होतो, असे दिसले. अगदी रक्त पातळ होण्याच्या प्रक्रियेपेक्षा ही प्लाझ्मीनोजीन ऍक्‍टिव्हेटर सर्वाधिक शक्तिशाली आहे; मात्र रुग्णांना धोका असतो.
रक्तातील गुठळी कशी दिसते? ही गुठळी जेलीसारखे असते. जेलीचे चॉकलेट कसे असते त्याप्रमाणे. या जेलीचा रंग कसाही असू शकतो. गोठविल्याप्रमाणे सर्व पेशी एकत्रित येतात. एक सूक्ष्म गठ्ठा तयार होतो. या गठ्ठ्यात प्रथिनेही असतात. यामुळे रक्तस्रावाला प्रतिबंध होतो. काही संशोधक म्हणतात की, कोविड-19 मध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे ही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. असे असले तरी स्वत: संशोधक(च) बुचकळ्यात पडले आहेत, हे विशेष. डब्लीनमधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जनमधील डॉ. जेम्स ओ डोनेल म्हणतात, "हे जे काही आहे ते थोडेसे असामान्य आहे.'' कोविड-19 च्या रुग्णांमध्ये रक्ताची गुठळी तयार होते. अगदी ब्लड थिनर्स असले तरीही. जे तरुण नागरिक आहेत, अशांमध्ये "स्ट्रोक'मुळे मेंदूत "ब्लॉकेजीस' तयार होतात. अशामध्ये या नागरिकांचा मृत्यूही होतो. जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये असतात तेव्हा उन्नत पातळीवर "डी-डिमर'मधील प्रथिनांचे तुकडे होऊन गुठळी वितळायला सुरवातही होते. रक्त गोठण्याच्या क्रियेत तयार होणारे अतिद्रव्य प्रथिन म्हणजे फायब्रिन. हे फायब्रिन डी-डिमरमध्ये असते; मात्र कोरोना विषाणू-3 संसर्गामध्ये काही हॉस्पिटलमध्ये रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. न्यूयॉर्कमधील वेल कॉर्नेल मेडिसीनमधील जेफरी लॉरेन्स आणि त्यांचे सहकारी म्हणतात, की फुफ्फुसे आणि त्वचेच्या नमुन्यांमध्ये कोविड-19 च्या तीन रुग्णांचा समावेश होता; पण ली म्हणतात, अन्य घटकही कोविड-19 मध्ये महत्त्वाचे आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. हे सर्व झाले असले तरी खुद्द संशोधक एका मुद्द्यावर ठाम नाहीत. संशोधनातील निष्कर्ष जसे जसे येतील तसे गुठळीची क्रिया कोविड-19 मध्ये कशी होईल हे समजेल; पण यासाठी निश्‍चितच वेळ जाईल. यासाठी जगभरातील संशोधन क्षेत्रात तयार होणारी माहिती एकत्रित गोळा करावी लागेल. नेदरलॅन्ड आणि फ्रान्समधील एका अभ्यासानुसार, अशा गुठळ्यांमुळे कोविड-19 चे रुग्ण गंभीर आजारी असण्याचे प्रमाण वाढले आहे; मात्र खुद्द संशोधक हा घटनाक्रम गांभीर्याने अभ्यासत असून संशोधन करत आहेत. अजूनही कोविड-19 मुळे मृत्यूचा दर कमी झालेला नाही. दररोज तो जगभरात वाढत आहे. तो कधी कमी होईल, नवीन कुठली क्‍लिष्टता तयार होईल, हे आज तरी सांगता येणे कठीण आहे; पण यानिमित्ताने गुठळीवर संशोधन सुरू झाले हे महत्त्वाचे.



from News Story Feeds https://ift.tt/2zz63HI

Comments

clue frame