Vivo Y50 स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी विवोने वाय सीरिज अंतर्गत आपला लेटेस्ट स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला आहे. युजर्संना या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी, ८ जीबी रॅम आणि जबरदस्त प्रोसेसर, एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन भारतासह अन्य देशात कधी लाँच करणार आहे, याविषयी कंपनीने अद्याप काहीही माहिती दिली नाही. Vivo Y50 ची किंमत विवोच्या या फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. या फोनची किंमत २४९ डॉलर म्हणजेच १८ हजार ९५० रुपये आहे. हा फोन ब्लू आणि ब्लॅक या दोन रंगात खरेदी करता येवू शकणार आहे. तसेच या फोनची प्री बुकिंग आजपासून सुरू करण्यात आली आहे. ही बुकिंग ११ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे. Vivo Y50 चे खास वैशिष्ट्ये विवोने या फोनमध्ये ६.३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. यात पंचहोल डिझाईन देण्यात आली आहे. तसेच या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ आणि ८ जीबी रॅमचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. Vivo Y50 चा कॅमेरा या फोनमथ्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये फ्रंटला किती कॅमेरा असणार आहे, याबद्दल कंपनीने अद्याप माहिती सांगितली नाही. Vivo Y50 ची बॅटरी कंपनीने या फोनमध्ये बॅकअपसाठी या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसेच युजर्संना या फोनमध्ये वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, हेडफोन जॅक आणि यूएसबी पोर्ट यासारखी फीचर्स दिली आहेत.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UO3mKi

Comments

Post a Comment

clue frame