मोबाइल विकताना तुम्ही पण 'या' चुका करतात?

नवी दिल्लीः आज जवळपास सर्वांच्याच हातात फोन आहे. ज्यावेळी आपला फोन जुना होतो किंवा मार्केटमध्ये आलेला नवीन फोन आपण खरेदी करतो. त्यावेळी आपल्याकडील जुना फोन विकून टाकतो. ऑनलाइन किंवा दुकानात फोन विकून मोकळे होतो. परंतु, यामुळे आपला डेटा लिक होण्याची भीती असते. जर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन विकायचा असेल तर त्याआधी काय काळजी घ्यायला हवी. वाचाः फोनमधील गुगल आयडी लॉग आउट करा विकण्याआधी गुगल आयडी लॉग आउट करायला विसरू नका. कारण, यात तुमचे बँक अकाउंट जोडलेले असते. लॉग आउट करण्याआधी युजर अँड अकाउंट्सच्या ऑप्शनवर जा. त्यानंतर रिमूव्हचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. अकाउंट लॉग आउट होईल. पाहाः डेटा बॅकअप जरुर घ्या स्मार्टफोन विकण्याआधी किंवा चेंज करण्याआधी तुम्हाला आवश्यक असलेला डेटाचा बॅकअप जरुर घ्या. त्यामुळे तुमचा डेटा लिक होणार नाही. बॅकअप घेण्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन बॅकअपच्या ऑप्शनवर क्लिक करा. यात तुम्हाला सर्व फोटो, कागदपत्रे, व्हिडिओ गुगल ड्राईव्ह जावून ते सेव्ह करा. वाचाः स्मार्टफोनचा पासवर्ड बदला स्मार्टफोन विकण्याआधी सेव्ह पासवर्ड काढून टाका. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचा खासगी डेटा चुकीच्या हातात पडू शकतो. त्यामुळे ब्राऊजररच्या प्रोफाईलमध्ये जाऊन सेव पासवर्डचा पर्याय निवडा. या ठिकाणी प्रत्येक वेबसाइटचा पासवर्ड दिसेल. याचा तुम्ही वापर करू शकता. या पासवर्डला डिलीट करण्यासाठी तुम्हाला याच्यापुढे दिलेल्या तीन डॉटवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर रिमूव्हचा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर पासवर्ड डिलिट होईल. वाचाः स्मार्टफोनला फॅक्टरीमधून रिसेट करा स्मार्टफोन विकण्याआधी सर्वात आधी फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम वर जाऊन आयडी लॉग आऊट करा. यासाठी फोनच्या फॅक्ट्री रिसेट करणे गरजेचे आहे. यासाठी सेटिंगमध्ये जाऊन बॅकअप अँड रिसेटचा ऑप्शन पर्याय निवडा. आता तुम्हाला रिसेट फोन दिसेल. त्यावर क्लिक करून डिलिट करा. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2xjpBig

Comments

clue frame