मुंबईः देवनागरी लिपीसाठी हे संगणकावर अक्षरे, अंक आणि चिन्हे संकेतबद्ध करण्याचे विशिष्ट तंत्र आहे. सर्वांना जमेल आणि वापरता येईल, अशा उद्देशाने युनिकोड ही संकेतप्रणाली विकसित करण्यात आली. संगणक, स्मार्टफोन आणि इंटरनेट यांवरील सगळे व्यवहार ० व १ या दुपदरी (बायनरी सिस्टीम) आकड्यांच्या आधारावर चालतात. त्याच पद्धतीने युनिकोड ही प्रणालीसुद्धा केवळ ० व १ने बनलेल्या संख्यांनी साकारली आहे. त्यामुळे तिचा वापर सोपा आणि सहज करता येतो. इंटरनेटवर युनिकोडमधील लेखन सहज शोधता येते. युनिकोडसाठी आखलेल्या कृतिकार्यक्रमातील मुद्दे >> सरकारकडे अधिकार (कॉपीराइट) आहेत, असे सर्व साहित्य, उदा. राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळ, राज्य मराठी विकास संस्था यांच्यातर्फे प्रकाशित ग्रंथ व कोश मराठीप्रेमी जनतेसाठी इंटरनेटवर युनिकोडमध्ये उपलब्ध व्हावे. >> महाराष्ट्र सरकारने २००८ मध्ये युनिकोडच्या वापराबाबत प्रसिद्ध केलेला आदेश अंमलात यावा. >> अधिकार मुक्त असलेले सर्व साहित्य 'मराठी विकीस्रोत'सारख्या प्रणालीद्वारे उपलब्ध व्हावे. >> मराठी लेखकांनी, प्रकाशकांनी, नियतकालिकांनी आपली प्रकाशने काही काळानंतर युनिकोडचा वापर करून, खुलेपणे इंटरनेटवर उपलब्ध करून द्यावीत. भारतीय भाषांतून ज्ञाननिर्मिती व्हावी; म्हणून विकीमीडिया फाउंडेशन निधी देते. विकीमीडिया ही समूह संस्था आणि आमच्या सोसायटीतर्फे राज्यात विकीपीडिया संपादन कार्यशाळा सुरू आहेत. विकीस्रोत येथे साहित्य खुले आहे. कॉपीराइट साहित्य चळवळ सुरू झाली आहे. मोबाइलमध्ये माहिती मिळवताना १० पैकी आठ लोक मराठीचा वापर करतात. आता बोलले ते उमटत असल्याने मराठीचा वापर वाढणार आहे. इंटरनेटवर मराठी शब्दांची संख्या वाढत आहे. इंटरनेटवर मराठी साहित्याचा साठा वाढवला पाहिजे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/396GlHc
Comments
Post a Comment