पुस्तकं हा अनेकांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. काहींना रिकाम्या वेळात, तर काहींना अगदी झोपण्यापूर्वीही पुस्तक वाचायची सवय असते. ज्यांना वाचनाची आवड असते, ते कुठेही आपला छंद जोपासतात. काही जण बाहेर जातानाही पुस्तक बरोबर घेऊन जातात. मात्र, तंत्रज्ञानाचा विकास होत गेला, तशी पुस्तकांची जागा ‘ई-बुक्स’ने घेतली आणि आता ‘ई-बुक्स’च्या जागी ‘ऑडिओ बुक्स’ आले आहेत. आता पुस्तकं ‘वाचण्या’ऐवजी ‘ऐकण्याचा’ ट्रेंड रुजत आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
ऑडिओ बुक म्हणजेच ‘टॉकिंग बुक’. ही एक इंटरेस्टिंग आणि वेगळी संकल्पना व्यवसायाच्या दृष्टीनं १९९४ मध्ये प्रथम परदेशात अस्तित्वात आली व कालांतरानं भारतातही रुजली. एखादं पुस्तक वाचण्यापेक्षा ते हावभावांसह ऐकणं कुणालाही आवडतं, याचाच विचार करून ‘ऑडिओ बुक’ ही संकल्पना सत्यात उतरली. कॅसेटच्या धर्तीवरच तांत्रिकदृष्ट्या पुढारलेली ही संकल्पना ‘ऑडिओ बुक’च्या माध्यमातून वाचकांसमोर आली व वाचक हीच पुस्तकं कुतूहलानं ऐकू लागले. ‘ऑडिओ बुक’चा सगळ्यात मोठा फायदा हा झाला, की वाचकाला कुठंही, कोणत्याही वेळी, कितीही गर्दीत आपल्या स्मार्ट फोनवर ॲपद्वारे किंवा संकेतस्थळावरून पुस्तकं ऐकता येऊ लागली. ऐकण्याबरोबरच पुस्तकातल्या हावभावांमुळं डोळ्यांसमोर त्या कथेचं हुबेहूब वर्णन उभं राहू लागलं. पुस्तकातला पाण्याचा आवाज, लाटांचा आवाज, प्राण्यांचा आवाज, जंगलातल्या गर्द झाडीचा आवाजही ऐकता येऊ लागला. याचं श्रेय जातं ते व्हॉईसओव्हर आर्टिस्टना. त्यांच्या आवाजामुळं दिग्गज साहित्यिकांच्या कादंबऱ्यांना श्राव्यरूप मिळालं. यापूर्वी ज्यांची पुस्तकं प्रकाशित झाली, त्यांनी त्याचं ‘ई-बुक’ व कालांतरानं ‘ऑडिओ बुक’ तयार करून घेतलं, तर काहींनी नव्या कथेसह ‘ऑडिओ बुक’ची निर्मिती केली.
‘ॲप’निंग : घरच्या घरी व्हिडिओ एडिटिंग
‘ई-बुक्स’मुळे कोणतेही पुस्तक बरोबर घेऊन जाण्याची गरज नव्हती. आपल्या हातातील स्मार्ट फोनमध्ये एखाद्या पुस्तकाची ऑनलाइन आवृत्ती सहज उपलब्ध होते. आता ‘ऑडिओ बुक्स’मुळे एका जागी थांबून वाचायचीही गरज पडत नाही. ‘ऑडिओ बुक्स’ ॲपमधून आपण पुस्तकं ऐकू शकतो. हेडफोन्स कानात घालून घरी निवांतपणे, प्रवासात, रिकाम्या वेळी, झोपण्याआधी कधीही मोबाईलवर आपण पुस्तकं ऐकू शकतो. ‘ऑडिओ बुक्स’ची अनेक ॲप्स आहेत, त्यापैकी ‘स्टोरीटेल’ हे ॲप ‘ऑडिओ बुक्स’मध्ये अग्रगण्य आहे. सोशल मीडिया वापरणारे अनेक जण ‘स्टोरीटेल’चे असंख्य चाहते आहेत. वाचकांना आता पुस्तकं वाचण्यापेक्षा ती हावभावांसह ऐकण्यात रस वाटू लागला आहे. ‘स्टोरीटेल’मध्ये मराठीसह अनेक इतर भाषांमधली पुस्तकं, कादंबऱ्या ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत. जुन्या पुस्तकांपासून ते ताज्या पुस्तकांपर्यंत अनेक पर्याय या ॲपवर मिळतात. तसेच ‘ई-बुक’चा पर्यायही या ॲपवर मिळतो. अगदी सहजपणे ‘ई-बुक’ व ‘ऑडिओ बुक’ ‘स्टोरीटेल’ ॲपवर वापरायला मिळते. या ॲपसाठी सबस्क्रीप्शन गरजेचे आहे.
‘ॲप’ची वैशिष्ट्ये
ई-बुक व ऑडिओ बुक ॲपवर उपलब्ध.
पुस्तकं ऐकण्याचा वेग ठरवता येतो.
स्नूज फंक्शन उपलब्ध.
बुकमार्क, नोट तयार करण्यासाठी सोय.
नवीन पुस्तकं सुचवता येतात.
लहान मुलांसाठी ‘किड्स मोड’चा पर्याय
मराठीसह इतर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध.
‘ऑडिओ बुक्स’ची लायब्ररी तयार करता येते.

from News Story Feeds https://ift.tt/37QbfSq
Comments
Post a Comment