प्रदूषण वाढतेय ! 'या' गाड्यांचे आहेत पर्याय

पुणे: जगभरातील वाढते प्रदूषण आणि निसर्गावर होणारे परिणाम चिंताजनक आहेत. जगभरामध्ये प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी अनेक उपायोजना राबविल्या जात असून आणखी नाविन्यपूर्ण उपायोजना करण्यावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून भारत सरकार देखील सौरऊर्जा वापरासाठी प्रयत्नशील आहे.  जगभरात वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण वाढत असून त्याला आळा घालण्यासाठी नवनवीन पर्याय शोधण्यात येत आहेत. वाहन कंपन्यादेखील आता पेट्रोल आणि डिझेल पासून होणारे प्रदूषण कसे कमी करता येईल आणि या इंधनाला कुठले पर्याय शोधता येतील यावर काम करीत आहे. वाहनांसाठी प्रदूषणाचे निकष देखील कडक करण्यात आले असल्याने वाहन कंपन्यांसमोर नवीन तंत्रज्ञान वापरून कमीत कमी प्रदूषण होईल असे पर्याय निर्माण करण्याचे आव्हान आहे. यामुळेच सीएनजी, एलपीजी, हायब्रीड आणि इलेक्ट्रिक असे पर्याय ग्राहकांना उपलब्ध झाले आहेत. 

अनेक वाहन कंपन्यांनी डिझेल वाहने बंद करून इलेक्ट्रिक वाहने विकसित करणे आणि त्याच्या विक्रीकडे मोर्चा वळविला आहे. महिंद्रा, टाटा , एमजी, ह्युंडाई इत्यादी कंपन्यांनी इलेकट्रीक वाहने विकसित करण्याकडे विशेष लक्ष दिले असून अनेक दर्जेदार वाहने बाजारात आणली आहेत. पाहुयात भारतात सध्या बाजारात असलेली इलेकट्रीक वाहने आणि त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी.

1) ह्युंडाई कोना : ही एक एसयूव्ही प्रकारातील कार असून भरपूर फीचर्स देखील यामध्ये देण्यात आले आहेत. 136 एचपी क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर असून 44.5  किलो वॅट क्षमतेची लिथियम आयन बॅटरी या गाडीमध्ये वापरण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर 452 किलोमीटरचा पल्ला ही  गाडी सहजपणे गाठू शकते. अनेक अत्याधुनिक फीचर्स देखील देण्यात आले असून सुरक्षिततेकडे देखील विशेष लक्ष देण्यात आले आहे. मोबाईल ऍपद्वारे देखील अनेक फीचर्स वापरता येतात.

किंमत : रुपये 25.30 लाखांपासून (एक्स - शोरूम दिल्ली)

2) एमजी ईझेडएस :  एमजी हे नाव भारतासाठी नवीन असले तरी वाहन क्षेत्रात अतिशय लोकप्रिय आहे. त्यांनी मागच्या वर्षी ' हेक्टर ' एसयूव्ही बाजारात आणली होती. आता ते ' ईझेडएस ' ही  इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात घेऊन आले आहेत. हि 143 एचपी क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर असून 44.5  किलो वॅट क्षमतेची लिथियम आयन बॅटरी या गाडीमध्ये वापरण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर 340 किलोमीटरचा पल्ला गाठण्यास ही गाडी सक्षम असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. अनेक अत्याधुनिक फीचर्स देखील देण्यात आले असून सुरक्षिततेकडे देखील विशेष लक्ष देण्यात आले आहे. मोबाईल ऍपद्वारे देखील अनेक फीचर्स वापरतात येतात.

किंमत : रुपये 22 लाखांपासून (एक्स - शोरूम दिल्ली)

3) टाटा नेक्सऑन ईव्ही : टाटा देखील या शर्यतीत मागे नसून त्यांनी देखील टाटा नेक्सऑन ईव्ही ही इलेक्ट्रिक गाडी बाजारात आणली आहे. नुकतेच या गाडीचे अनावरण करण्यात आले होते.129 एचपी क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर असून 30.2  किलो वॅट क्षमतेची लिथियम आयन बॅटरी या गाडीमध्ये वापरण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर 312 किलोमीटर अंतर तुम्ही सहज पार करू शकाल. अनेक अत्याधुनिक फीचर्स देखील देण्यात आले असून सुरक्षिततेकडे देखील विशेष लक्ष देण्यात आले आहे. मोबाईल ऍपद्वारे देखील अनेक फीचर्स वापरता येतात.  

किंमत : रुपये 13.99 लाख - 15.99 लाख (एक्स - शोरूम दिल्ली)

4) महिंद्रा ई -व्हेरिटो : महिंद्रा इलेक्ट्रिकची सध्या दोन ईटूओ प्लस आणि ई-व्हेरिटो ही वाहने बाजारात आहेत.  ई-व्हेरिटो ही सेडान प्रकारातील गाडी आहे. 41 एचपी क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर असून 72 वोल्ट बॅटरी या गाडीमध्ये वापरण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर 110 किलोमीटर अंतर ही गाडी पार करू शकते. बेसिक फीचर्स या गाडीत देण्यात आले आहेत. सुरक्षित प्रवासासाठी बेसिक गोष्टी या गाडीत समाविष्ट केल्या आहेत. एक्सयूव्ही 300 ईव्ही, केयूव्ही एव्ही या गाड्या लवकरच महिंद्रा बाजारात आणणार आहे.  

किंमत : रुपये 9.5 लाख - 10 लाख (एक्स - शोरूम दिल्ली)

5) टाटा टिगोर ईव्ही : ही टाटाची इलेक्ट्रिक सेडान असून एकदा चार्ज केल्यावर 140 किलोमीटर अंतर जाण्याची या गाडीची क्षमता आहे. सध्या ही  गाडी फक्त कमर्शिअल ग्राहकांसाठी उपलब्ध असून ती लवकरच सामान्य ग्राहकांसाठी देखील बाजारात आणण्यात येणार आहे. बेसिक फीचर्स या गाडीत देण्यात आले आहेत.

किंमत : रुपये 11.58 लाख - 11.92 लाख (एक्स - शोरूम दिल्ली)

या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये अनेक नवीन इलेक्ट्रिक वाहने बाजारात येणार असून ग्राहकांना उत्तमोत्तम पर्याय मिळणार आहेत. चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याची गरज असून सरकारने आणि वाहन कंपन्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होण्यास आणि पर्यावरणाची हानी कमी होण्यास खूप मदत होईल. याच बरोबर वाहनांच्या किमती सर्वांना परवडतील एवढ्या असायला हव्यात.    तसेच इलेक्ट्रिक गाड्या सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात ठेवण्यासाठी कशे प्रयत्न केले जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भविष्य हे इलेक्ट्रिक असेल यात काहीच वाद नाही पण त्याकरीता लागणाऱ्या पायाभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देणे हि काळाची गरज आहे. आपल्या उज्वल आणि निरोगी भविष्यासाठी इलेक्ट्रिक वाहने हा एक उत्तम पर्याय आह. अनेक देशांनी हा मार्ग स्वीकारला आहे त्यामुळे वाहनांचे भविष्य नक्कीच इलेक्ट्रिक असणार आहे असं दिसतंय.



from News Story Feeds https://ift.tt/2Pv5un1

Comments

clue frame