इंटरनेट हाती आणि मानवी जीवण...

इंटरनेटच्या पिढ्या आणि स्मार्ट फोनने आपल्या जीवनात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली. आजचा स्मार्ट फोन हा छोटा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच आहे. टायपिंग, फोटो, व्हिडिओ एडिटिंग, मिक्‍सिंग अशा अनेक गोष्टी या पाच-साडेपाच इंचाच्या उपकरणाद्वारे करता येतात. आता स्पीड प्रचंड वाढले आहे. "4 जी' इंटरनेटमुळे आपले दैनंदिन जीवन सुपरफास्ट बनले आहे. डायल अप, आयएसडीनपासून ते "2जी', "3जी' आणि आताच्या "4जी'पर्यंतचा इंटरनेट गतीचा प्रवास पाहिल्यास तंत्रज्ञानात जग बदलण्याची अफाट क्षमता असल्याचे सिद्ध होते.

हे पण वाचा -  कामगार संघटना धडकल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर

जुने फोन आणि त्यावरचे "2जी' इंटरनेट पाहिल्यास एखादी वेबसाईट उघडायची झाली तरी खूप वेळ लागायचा. एखादी फाईल डाऊनलोड करायची म्हटली तरी बाहेर फिरून यावे लागे. त्यानंतर आलेल्या "3जी'मुळे हा त्रास दूर होऊन मोठ्या आकाराच्या फाईल्सची देवाण-घेवाण, व्हिडिओ पाहणे, डाऊनलोड याला गती मिळाली. "व्हॉट्‌स ऍप'मुळे संवाद अधिक सोपा झाला आणि एसएमएसचा वापरही कमी झाला. मात्र, खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला सुपरफास्ट बनवले ते इंटरनेटची चौथी पिढी म्हणजेच "4जी'ने. जुन्या स्मार्ट फोनची जागा या नेटवर्कच्या गतीसोबत धावणाऱ्या नवीन "4जी' फोन्सनी घेतली. "4जी'ने अख्खा टी.व्ही. आणि त्याच्या वाहिन्या स्मार्ट फोनवर आणल्या. लाईव्ह टी.व्ही., व्हिडिओ कॉलिंग, चित्रपट, मोठ्या आकाराचे व्हिडिओ, गाणी, फाईल्सची देवाण-घेवाण या गोष्टी सहज शक्‍य झाल्या. अशिक्षितही ही साधने अगदी सहजपणे हाताळत आहेत. व्हॉट्‌स ऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक या सध्याच्या सर्वांत लोकप्रिय सोशल मीडिया साधनांचे जगही विस्तारले. व्हिडिओ तयार करणे, व्हिडिओ कॉलिंग, फेसबुक लाईव्ह या गोष्टी करता येऊ लागल्या.
याच पिढीच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या अत्याधुनिक भविष्यातील तंत्रज्ञानाचीही सुरुवात झाली आहे. याचाच भाग असणारे ऍमेझॉनचे "ऍलेक्‍सा', "गुगल असिस्टंट' हे अनेकांच्या घरात स्थिरावलेत. सध्या ही साधने इंग्रजी भाषाच समजू शकत असली तरी भविष्यात ती मराठीसह अन्य भाषांतही समजून बोलू शकतील आणि आदेशानुसार काम करतील.

हे पण वाचा - कोल्हापूर-सांगली महामार्गावर चक्का जाम; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

चौथ्या पिढीत बदलांचे अनुभव घेत असताना मोबाईल इंटरनेटची पाचवी पिढी (5जी) उंबरठ्यावर आहे. दक्षिण कोरिया, अमेरिका, ब्रिटन आणि चीन या देशांत "5जी'ची सुरुवात झाली आहे. सध्या "4जी'चे सर्वाधिक स्पीड हे 45 एमबीपीएस (मेगाबिट्‌स पर सेकंद) पर्यंत मिळते. मात्र, "5जी'चे स्पीड हे 10 ते 20 पट अधिक वाढून ते 1000 एमबीपीएसपर्यंत जाऊ शकते. अधिक हायस्पीड इंटरनेटमुळे मोठ्या आकाराच्या फाईल्स, व्हिडिओ, एचडी चित्रपट वेगाने अपलोड आणि डाऊनलोड केले जाऊ शकतील. एवढेच नाही तर एकाच वेळी हे इंटरनेट नेटवर्क अनेक उपकरणांना जोडता येईल. अत्याधुनिक ड्रोन्स कॅमेऱ्यांतून वाहतुकीवर देखरेख, स्वयंचलित कार यंत्रणा, रियल टाईम मॅपद्वारे हव्या असणाऱ्या ठिकाणाची ताजी माहिती, तसेच सद्यःस्थिती क्षणार्धात मिळेल. भारतात "5जी' अवतरण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. असे असले तरी इंटरनेटच्या पाचव्या पिढीचे जग हे कल्पनेच्या पलीकडचे असेल, हे निश्‍चित.

News Item ID: 
599-news_story-1578500662
Mobile Device Headline: 
इंटरनेटने हाती आणि मानवी जीवण...
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
How Internet Changed Human Life
Author Type: 
External Author
प्रफुल्ल सुतार
Search Functional Tags: 
फोन, वन, forest, पूर, Floods, व्हिडिओ, जिल्हाधिकारी कार्यालय, ऍप, व्हिडिओ कॉलिंग, चित्रपट, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक, TikTok, इंटेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गुगल, मराठी, कोल्हापूर, सांगली, Sangli, महामार्ग, राजू शेट्टी, Raju Shetty, मोबाईल, ब्रिटन, चीन, नेटवर्क, भारत
Twitter Publish: 
Meta Keyword: 
How Internet Changed Human Life
Meta Description: 
How Internet Changed Human Life. इंटरनेटच्या पिढ्या आणि स्मार्ट फोनने आपल्या जीवनात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली. आजचा स्मार्ट फोन हा छोटा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच आहे. टायपिंग, फोटो, व्हिडिओ एडिटिंग, मिक्‍सिंग अशा अनेक गोष्टी या पाच-साडेपाच इंचाच्या उपकरणाद्वारे करता येतात. आता स्पीड प्रचंड वाढले आहे. "4 जी' इंटरनेटमुळे आपले दैनंदिन जीवन सुपरफास्ट बनले आहे. डायल अप, आयएसडीनपासून ते "2जी', "3जी' आणि आताच्या "4जी'पर्यंतचा इंटरनेट गतीचा प्रवास पाहिल्यास तंत्रज्ञानात जग बदलण्याची अफाट क्षमता असल्याचे सिद्ध होते.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/2QAKSKT

Comments

clue frame