उलगडूया क्यू आर ‘कोडं’

Gopal.paliwal@timesgroup.com Tweet : @GopalpaliwalMT माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कठीण अगदी सोपे आणि सोपे अगदी छोटे होतेय. एखादी भलीमोठी वेबलिंक एका छोट्याशा स्कॅन करता येणे शक्य असणाऱ्या ‘क्विक रिस्पॉन्स कोड’ अर्थात ‘QR Code’ मध्ये रुपांतरित करणे हे त्याचेच द्योतक आहे. मात्र, हा चौकोनी ठोकळा दिसणारा कोड नेमक कुठे वापरतात. त्याची निर्मिती सर्वप्रथम जपानमध्ये करण्यात आली. या अगोदर बारकोडची संकल्पना वापरली जायची. मात्र, जास्त डेटा स्टोर करण्यासाठी पुढे क्यू आर कोडचा पर्याय खुला झाला आणि हे ‘कोडं’ खऱ्या अर्थाने उलगडलंय. आजकाल प्रत्येक गोष्टीला एक छोटे आणि आकर्षक रूप देण्याची प्रथा आहे. ज्यामुळे ती सहजासहजी लोकांपर्यंत पोहचून त्यांना माहिती देत असते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘क्यू आर कोड’ (क्विक रिस्पॉन्स कोड) होय. एखादी वस्तू खरेदी करायची असेल करा कोड स्कॅन, एखादा व्हीडिओ पाहायचा असेल तर करा कोड स्कॅन, एखादी वेबसाइट पाहायची असेल तरी करा कोड स्कॅन. याचबरोबर नवीन अॅप्स, लिंक इन्स्टॉल करायची असल्यास आपण तेथील कोडच स्कॅन करतो. पण, हे सर्व करीत असताना सावधानता तर असावीच मात्र त्यासोबत तुम्हाला हा कोड आला कसा आणि तो त्या लिंकवर आपल्याला नेतो कसा हा प्रश्न पडतोच. या सर्व गोष्टींचे कोडं आज उलगडूया! ‘क्यू आर कोड’ ही संकल्पना ही संकल्पना ट्रेडमार्क असून, तो मॅट्रिक्स बारकोड प्रकारात मोडतो. याला टू डायमेन्शनल कोडही म्हणतात. याची सुरुवात १९९४ मध्ये ‘डेन्सो वेव’ या जपानी कंपनीने केली होती. या कोडचा वापर ही कंपनी वाहने, इन्व्हेन्टरी तसेच वस्तू ट्रॅक करायला करीत असे. सध्याच्या काळात ‘क्यू आर कोड’ परवलीचा शब्द झाला असून, आपले प्रॉडक्टस् विकण्यासाठी, व्यावसायिक वाहने अॅप्लिकेशनसाठी, मोबाइल यूजर्ससाठी, प्रवास तिकीट किंवा मग चित्रपट तिकीटासाठीही याचा वापर होतोय. खासकरून डिजिटल पेमेंटसाठी हा सर्वात सोपा पर्याय ठरत आहे. याचबरोबर केंद्र सरकारने ‘डिजिटल इंडिया’ अंतर्गत बालभारतीच्या पुस्तकाचे सुक्ष्म रुप ‘क्य आर कोड’च्या माध्यमातून आणून शिक्षणातही याचा वापर कसा चांगल्याप्रकारे करता येईल, हे दाखविले आहे. तसेच ऑफलाइन माहिती पोहोचविणे, आपले व्हिजिटिंग कार्ड एका स्कॅनवर ग्राहकांपर्यंत देणे या कोडद्वारे सोपे होते. ---- वापर कुठे होतो... मोठमोठ्या मॉल्समध्ये वस्तू स्कॅनिंगसाठी वाहने ट्रॅक करण्यासाठी प्रवास, चित्रपटाचे तिकिट काढणे एखाद्या संकेतस्थळाच्या थेट लॉगिनवर जाणे डिजिटल पैसे देण्याकरिता लिंकवर थेट पोहोचण्याकरिता वापर ---- फायदे... क्षणात संकेतस्थळावर जाता येते वस्तूचे ऑनलाइन पेमेंटची सुलभता आपल्या व्यवसायाचे जलद ब्रँडिंग सोशल मीडियात व्हिडीओ लिंकसाठी स्मार्टफोनवर पुस्तके वाचण्यासाठी ---- नुकसान... आपल्या माहितीस गैरवापराचा धोका मालवेअर अटॅकमुळे नुकसानदायक ---- अशी होते निर्मिती... यासाठी वेगवेगळे क्यू आर कोड निर्मितीचे अॅप आहेत. मात्र, २०१८ मध्ये काही अॅप्सवर मालवेअर अटॅकच्या धोक्यामुळे बंदी आणण्यात आली होती. सद्य:स्थितीत काही चांगले क्यू आर कोड जनरेटर उपलब्ध असून, त्याद्वारे आपण आपल्या ब्रँडसाठी किंवा मग स्वत:च्या एखाद्या लिंक्सचा क्यू आर कोड तयार करू शकतो. यामध्ये हा कोड जवळपास ३० टक्के खराब होऊनही वापरता येऊ शकतो. विशेष म्हणजे, काही स्मार्टफोनमध्ये आता इनबिल्ट कोड स्कॅनर उपलब्ध असतात. जेणेकरून आपल्या स्मार्टफोनला व्हायरस अटॅकपासून वाचविता येते. हे स्कॅनर बारकोड स्कॅनरचे सुधारीत रुप असून, त्यापेक्षा जास्त कॅरेक्टर हा कोड साठवू शकतो. यामध्ये चौकोनाच्या आकारात तीन बाजूंना ब्लॉक्स असतात तर काळ्या आणि पांढऱ्या रंगात टायमिंग लाइनचाही वापर होतो.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ao5cah

Comments

clue frame