मुंबई: सातत्याने फोनवर असणे ही स्मार्टफोनधारकांसाठी चिंतेची बाब आहे. भारतीयांना आपल्या स्मार्टफोनबाबत विशेष प्रेम असून अधिकाधिक वेळ स्मार्टफोनवर घालवत असल्याचे समोर आले आहे. दरवर्षी भारतीय युजर्स सरासरी ७५ दिवस स्मार्टफोनवर सोशल मीडिया किंवा इतर ऑनलाइन सेवांचा वापर करत असल्याचे एका अभ्यासात उघड झाले आहे. सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर)ने चीनमधील मोबाइल कंपनी वीवोसोबत एक अभ्यास अहवाल तयार केला आहे. स्मार्टफोनचा अधिकाधिक वापर युजर्सच्या आरोग्यावर काय परिणाम करतो, यावर हा अभ्यास अहवाल तयार करण्यात आला आहे. अधिक वेळ स्मार्टफोनचा वापर केल्यामुळे लोकांच्या भावना, नातेसंबंध, पंसती-नापसंती यावरही परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. या अभ्यासासाठी रिसर्च फर्मने २००० जणांशी संवाद साधला. यामध्ये ६४ टक्के पुरुष आणि ३६ टक्के महिला होत्या. एक तृतीयांश वेळ स्मार्टफोनवर स्मार्टफोनधारक दररोज आपला एक तृतीयांश वेळ स्मार्टफोनवर घालवत असल्याचे समोर आले. यानुसार, एका युजर्सने दरवर्षी जवळपास १८ हजार तासांचा वेळ स्मार्टफोनच्या वापरासाठी दिला. टीएनजर्स असताना ७५ टक्के युजर्सने पहिल्यांदाच स्मार्टफोनचा वापर केला होता. तर, ४१ टक्के युजर्सना आपले शालेय शिक्षण पूर्ण करण्याआधीच वापरण्यास मिळाला होता. धक्कादायक म्हणजे, स्मार्टफोन पाहिल्याशिवाय कुटुंबीय किंवा मित्रांसोबत पाच मिनिटेदेखील संवाद साधू शकत नसल्याचे तीन युजर्सने सांगितले. आरोग्यावर वाईट परिणाम अभ्यासात सहभागी असलेल्यापैकी ५० टक्केहून अधिकजणांनी स्मार्टफोनवर सोशल मीडिया वापरणे सोडून देणे अथवा विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला नसल्याचे समोर आले. जवळपास सर्वच युजर्सने मान्य केले की त्यांना मित्र आणि कुटुंबीयांसोबत व्हर्चुअल संवाद साधण्यास आवडतो. तर, स्मार्टफोनच्या वापरामुळे रोजच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होत असल्याचे ७० टक्के युजर्सने मान्य केले. स्मार्टफोनच्या वापरामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे युजर्सने मान्य केले.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2tH8yo3
Comments
Post a Comment