सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था 'या' देशात दिसणार

मुंबई: दक्षिण भारतातील काही भागांतून उद्या म्हणजे गुरुवारी (२६ डिसेंबर) कंकणाकृती दिसणार आहे. कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडूवरून जाणारा १६४ किलोमीटर रुंदीच्या पट्ट्यातून अग्निकंकणाचा हा सोहळा अनुभवता येणार आहे. हा प्रदेश वगळता, देशात अन्यत्र हे ग्रहण खंडग्रास अवस्थेत दिसेल. आकाशप्रेमींसाठी हे ग्रहण ही पर्वणी असून, या ग्रहणानंतर सहा महिन्यांनी म्हणजे २१ जूनला उत्तर भारतातून आणखी एक पाहण्याची संधी भारतातील आकाशप्रेमींना मिळेल. भारतीय आकाशनिरीक्षकांना एका दशकाच्या कालावधीनंतर अशी संधी मिळणार आहे. त्यानंतर थेट २१ मे २०३१ रोजी दक्षिण भारताच्या टोकावरून कंकणाकृती सूर्यग्रहण आणि २० मार्च २०३४ रोजी लडाखच्या काही भागांतून खग्रास सूर्यग्रहण दिसेल. त्यामुळेच, आकाशप्रेमींसाठी गुरुवारी दिसणारे हे ग्रहण नजिकच्या काळातील सर्वोत्तम संधी असून, त्यामुळे आकाश निरीक्षकांमध्ये ही पर्वणी साधण्यासाठी उत्साहही दिसून येत आहे. वाचा: जगाच्या विविध भागांमध्ये हे ग्रहण दिसणार असून, सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था सर्वप्रथम सौदी अरेबियाच्या पूर्व भागात बघायला मिळेल. त्यानंतर चंद्राच्या सावलीचा पूर्व दिशेने प्रवास सुरू होईल. कतार, संयुक्त अरब अमिराती, ओमननंतर चंद्राची सावली अरबी समुद्र ओलांडून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दक्षिण कर्नाटक आणि उत्तर केरळच्या भागांत धडकेल. त्यानंतर उटी, कोइम्बतूर मार्गाने तमिळनाडूमधील करैकुडी, कोट्टाईपट्टीनमवरून पुढे सरकत बंगालच्या उपसागरावर प्रवेश करेल. त्यानंतर आग्नेय आशियाई देशांतील मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, उत्तर मारियाना बेटे आणि ग्वामपर्यंत ही सावली असेल. चंद्राची सावली सौदी अरेबिया ते गुआमपर्यंतचा १२ हजार ९०० किलोमीटरचा प्रवास फक्त तीन तास २० मिनिटांमध्ये पूर्ण करेल. गडद सावलीच्या मार्गावर भारतात विविध ठिकाणी साधारणपणे दोन मिनिटांपासून ते साडेतीन मिनिटांपर्यंत कंकणाकृती अवस्था पाहायला मिळेल. ग्रहणाचा मध्य सिंगापूरच्या नैऋत्येला होणार असून, तिथे कंकणाकृती अवस्था सर्वाधिक काळ म्हणजे तीन मिनिटे ४० सेकंदांसाठी बघायला मिळेल. कंकणाकृती ग्रहणाचा मुख्य पट्टा सोडून भारतासह आशिया खंडाच्या बहुतांश भागातून, तसेच ऑस्ट्रेलियाच्या मोठया भागातून सूर्यग्रहण खंडग्रास अवस्थेत दिसेल. वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Msuw4H

Comments

clue frame