'या' भारतीय हॅकरने कमवले २.२ कोटी रुपये!

नवी दिल्ली: इंटरनेट म्हटलं की डोक्यात आधी नकारात्मक विचार येतात, पण याची दुसरी सकारात्मक बाजूही आहे, ती म्हणजे एथिकल हॅकिंग. कंपन्या आणि प्रसिद्ध वेबसाइट्सना त्यांचे वर्तमान लूपहोल्स, त्रुटी समजाव्यात यासाठी हे एथिकल हॅकर्स काम करतात. आयटी क्षेत्रात भारताचं नाव आघाडीवर आहे आणि येथील एथिकल हॅकर्सही आता आपलं विशेष स्थान निर्माण करत आहेत. असाच एक चेहरा आहे सिक्युरिटी रिसर्चर आनंद प्रकाश. आनंदने आपल्या हॅकिंगच्या बळावर आतापर्यंत २.२ कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे! आनंदने वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून अभ्यास पूर्ण केला आहे. २०१० पासून त्याने हॅकिंगची सुरुवात केली. एका मित्राच्या सांगण्यावरून त्याने गुगलची पॉप्युलर साइट ऑर्कुट हॅक करण्याचा प्रयत्न केला. कॉलेजच्या दिवसापासूनच तो बग्ज शोधण्यात एक्सपर्ट झाला. २०१३ रोजी त्याला फेसबुकचा एक बग सापडला. त्यासाठी त्याला फेसबुकने ५०० डॉलर्स (सुमारे ३५,००० रुपये) इनाम दिलं. केवळ फेसबुकच नव्हे तर नंतर आनंदने अनेक कंपन्यांचे बग्ज शोधले. फेसबुकचा तर तो फेवरिट बनला. टॉप एथिकल हॅकर्सच्या वार्षिक यादीतही आनंदचं नाव आलं. ट्विटर आणि गुगलचे बग्जही त्याने शोधलेले आहेत. उबर, गिटहब, नोकिया, साउंडक्लाउड, ड्रॉपबॉक्स, पेपाल आणि अशा अन्य प्रसिद्ध साईट्ससाठीही त्याने काम केलं आहे. गेल्या वर्षी त्याला फेसबुकच्या पासवर्ड सिस्टीमची एक त्रुटी शोधल्यानंतर कंपनीने १५ हजार डॉलर्सचं म्हणजेच सुमारे १० लाख ७१ हजार रुपयांचं इनाम दिलं. आनंदला लवकरच आपलं स्वत:चं सिक्युरिटी स्टार्ट अप सुरू करायचं आहे.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SwmM5o

Comments

clue frame