अलीकडेच डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला ‘गुगल’चे संस्थापक लॅरी पेज व सरगे ब्रिन यांनी एक मोठी घोषणा केली आणि जागतिक तंत्रज्ञान जगतात खळबळ माजवली. लॅरी पेज यांनी आपण ‘अल्फाबेट’ या कंपनीच्या सीईओपदाचा राजीनामा देत आहोत. तसेच सुंदर पिचाई यांच्याकडेच ‘गुगल’व्यतिरिक्त ‘अल्फाबेट’ कंपनीचीही जबाबदारी सोपवत असल्याचे जाहीर केले. यानिमित्त काढलेल्या पत्रकात त्यांनी ‘गुगल’ व ‘अल्फाबेट’ला दोन सीईओ (सुंदर पिचाई व लॅरी पेज) आणि एका प्रेसिडेंटची (सरगे) आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. आपण ‘गुगल’च्या कारभाराशी, संचालक मंडळाचा सदस्य (बोर्ड मेंबर) या नात्याने संबंध ठेवणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. परंतु असे असले तरी जाणकारांच्या मते लॅरी पेज व सरगे ब्रिन या ‘गुगल’च्या जगप्रसिद्ध संस्थापकांनी वयाच्या केवळ ४६ व्या वर्षी एक प्रकारे आपली निवृत्तीच जाहीर केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
हा बदल समजून घेण्यासाठी प्रथम आपल्याला ‘अल्फाबेट’ हा काय प्रकार आहे ते समजून घ्यावे लागेल. १९९८ मध्ये लॅरी पेज आणि सरगे ब्रिन या दोन तरुणांनी ‘गुगल’ची स्थापना केली. अतिशय अल्पावधीतच ‘गुगल’ आपल्या सर्चमुळे जगातील एक अग्रगण्य कंपनी झाली. पुढे त्यांनी ‘युट्यूब’ विकत घेतली व ‘क्रोम ब्राउझर’, ‘अँड्रॉइड’, ‘जीमेल’ अशी अतिशय लोकप्रिय उत्पादने बाजारात आणली. ही सर्वच उत्पादने मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवत होती. परंतु त्याचबरोबर लॅरी पेज आणि सरगे ब्रिन यांनी इतरही अनेक उपक्रम सुरू केले होते. हे उपक्रम वरील लोकप्रिय उत्पादनांपेक्षा खूपच वेगळे होते. त्यातील एक उपक्रम म्हणजे स्वयंचलित कार. वेमो नावाची एक कंपनी स्थापन करून त्याकरवी स्वयंचलित कारचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न लॅरी पेज व सरगे ब्रिन यांनी केला. डिप माइंड नावाची अशीच एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील कंपनीही गुगलने विकत घेतली. ‘नेस्ट’ नावाची स्मार्ट होम उपकरणे तयार करणारी अजून एक कंपनीही ‘गुगल’ने विकत घेतली.
‘गुगल फायबर’ हीही अशीच एक कंपनी. २०१० मध्ये स्थापन केलेली ही कंपनी ‘फायबर ऑप्टिक्स’द्वारे अमेरिकेतील काही शहरांमध्ये अतिशय जलद केबल व इंटरनेट सेवा पुरवते. अशा अनेक कंपन्या विकत घेतल्याने अथवा स्थापन केल्याने त्यांचे व्यवस्थापन करणे ही जटिल समस्या होऊन बसली. तसेच ‘गुगल’ आणि ‘नेस्ट’ सोडले, तर इतर बहुतेक सर्वच कंपन्यांची उत्पादने प्रायोगिक स्वरूपाची होती. त्यामुळे या कंपन्यांमधून लगेचच नफा मिळणे अपेक्षित नव्हते. म्हणून १० ऑगस्ट २०१५ रोजी लॅरी पेज व सरगे ब्रिन यांनी मुख्य गुगल कंपनी व इतर कंपन्यांच्या वर एक होल्डिंग कंपनी तयार केली, त्याचे नाव त्यांनी ‘अल्फाबेट’ असे ठेवले. ‘अल्फाबेट’ हे नाव का ठेवले असे विचारले असता लॅरी पेज यांनी त्याची अनेक कारणे दिली. ज्याप्रमाणे अनेक अक्षरांचे मिळून अल्फाबेट (बाराखडी) बनले आहे, त्याचप्रमाणे अनेक कंपन्यांची मिळून ही कंपनी बनली आहे. तसेच गुगल सर्चचा आणि अक्षरांचा किंवा भाषेचा खूपच मोठा संबंध आहे. त्याव्यतिरिक्त इंग्रजी अल्फाबेट शब्दातील अल्फा व बेट हे दोन शब्द वेगवेगळे केले असता त्याचा अर्थ प्रायोगिक तत्त्वावर (अल्फा) पैसे लावलेली कंपनी (बेट) असाही होतो! या होल्डिंग कंपनीचा सीईओ लॅरी पेज स्वतः झाले. तसेच ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर नफा मिळतो त्या गुगल कंपनीचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी सुंदर पिचाई या पूर्ण वेळ सीईओची नियुक्ती केली. त्यामुळे लॅरी पेज व सरगे ब्रिन यांना आपले लक्ष कंपनीच्या प्रायोगिक तत्त्वावरील विभागांकडे केंद्रित करता येऊ लागले. अशा प्रकारे ‘अल्फाबेट’चा जन्म झाला. ‘अल्फाबेट’च्या जन्मानंतरही अनेक लोकांनी ‘गुगल’ आणि ‘अल्फाबेट’ यात तेवढा फरक केला नाही. आजही सर्वसामान्य अमेरिकन लोकांना ‘अल्फाबेट’विषयी तेवढी माहिती नाही. त्यांना फक्त ‘गुगल’च माहिती आहे. ‘गुगल’ ही ‘अल्फाबेट’मधील मुख्य कंपनी आहे आणि पुढेही ती राहणारच.
अमेरिकन प्रसारमाध्यमांनी सुंदर पिचाई यांची ‘अल्फाबेट’च्या सीईओपदी नियुक्ती झाल्याचे एकंदरीत स्वागतच केले आहे. ‘अल्फाबेट’च्या सर्व कंपन्यांमधील गुगल ही सर्वांत महत्त्वाची आणि सर्वांत मोठी कंपनी आहे. त्यामुळे ज्या माणसाने एवढ्या मोठ्या कंपनीचा कारभार गेल्या चार वर्षांपासून यशस्वीपणे सांभाळला आहे, त्याच्या हातात इतर कंपन्यांचा कारभार देणे संयुक्तिकच आहे असेच प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. माझ्या मतेही गेल्या चार वर्षांत सुंदर पिचाई यांनी गुगलची कमान उत्तमरित्या सांभाळली आहे. २०१९ च्या सुरुवातीला त्यांनी गुगलच्या ‘क्लाउड कंप्युटिंग विभागा’चे प्रमुख म्हणून थॉमस कुरियन (कुरियनही भारतीय आहेत) यांची नियुक्ती केली. या निर्णयाचेही तंत्रज्ञान क्षेत्राने मोठ्या प्रमाणावर स्वागत केले आहे. त्यामुळे भविष्यात ‘गुगल क्लाउड’ची भरभराट होईल व त्याला ‘अॅमेझॉन’ व ‘मायक्रोसॉफ्ट’च्या ‘क्लाउड’बरोबर स्पर्धा करता येईल, असे माझे मत आहे. अनेकांनी सुंदर पिचाई यांची तुलना ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नडेला व ‘अॅपल’च्या टिम कुक यांच्याशी केली आहे. सत्या नडेला यांना मायक्रोसॉफ्ट कंपनीची जबाबदारी बिल गेट्स यांनी दिली. टिम कुक यांना अॅपल कंपनीची जबाबदारी स्टिव्ह जॉब्स यांनी दिली. स्टिव्ह जॉब्स आणि बिल गेट्सप्रमाणेच लॅरी आणि सरगेने प्रथम ‘गुगल’ आणि आता ‘अल्फाबेट’ची जबाबदारी सुंदर पिचाई यांना दिली आहे. सुंदर पिचाई ‘गुगल’चे सीईओ झाल्यापासून गुगलच्या शेअरची किंमत जवळजवळ दुप्पट झाली आहे. एखाद्या सीईओच्या यशाचे मोजमाप करण्यासाठी शेअरची किंमत हे प्रमाण मानले जाते. तसेच ‘अल्फाबेट’च्या घोषणेनंतरही अल्फाबेट कंपनीच्या शेअरची किंमतही जवळजवळ पाच टक्क्यांनी वाढली आहे. म्हणजेच एकंदरीतच शेअर बाजारानेही या निर्णयाचे स्वागतच केले आहे.
सुंदर पिचाई यांचा जन्म १० जून १९७२ रोजी तमिळनाडूतील मदुराईत झाला. त्यांचे बालपण चेन्नईतील अशोकनगर भागात एका मध्यमवर्गीय घरात गेले. त्यांनी खरगपूरच्या आयआयटीतून मेटलर्जी अभियांत्रिकीची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध स्टॅनफर्ड विद्यापीठातून मास्टर्स डिग्री मिळवली आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हिनियाच्या प्रसिद्ध व्हार्टन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए ही पदवी मिळवली. पदवीनंतर त्यांनी अप्लाइड मटेरियल्स आणि मकिंसे कंपनीत काही वर्षे काम केले. त्यानंतर २००४ मध्ये त्यांनी ‘गुगल’मध्ये प्रवेश केला. ‘गुगल’मधील नोकरीसाठी त्यांची मुलाखत १ एप्रिल २००४ रोजी ठेवण्यात आली होती. याच दिवशी ‘गुगल’ने ‘जीमेल’ची घोषणा केली. ‘जीमेल’विषयी जेव्हा त्यांना मुलाखतीत विचारण्यात आले, तेव्हा ‘जीमेल’ प्रत्यक्षात अस्तित्वात नसून, तो एक एप्रिल फूल जोक आहे असे त्यांना वाटले. ‘गुगल’मध्ये घेतल्यानंतर त्यांना सर्वप्रथम क्रोम बाउझरची जबाबदारी देण्यात आली. ब्राउझरनंतर त्यांनी गुगलचे क्रोमबुक (व क्रोम ओएस) या उत्पादनांचीही जबाबदारी सांभाळली. २०१३ मध्ये त्यांना अँड्रॉइडची जबाबदारी देण्यात आली. २०१४ मध्ये लॅरी पेज यांनी त्यांना इतरही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. असे करत करत शेवटी २०१५ मध्ये पिचाई यांच्याकडे संपूर्ण ‘गुगल’चीच जबाबदारी देण्यात आली.
सुंदर पिचाई यांच्या या नेमणुकीमुळे ‘अल्फाबेट’मध्ये काय बदल होतील हाही प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा एक विषय आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ व ‘सीएनबीसी’सारख्या नावाजलेल्या वृत्तसंस्थांनी सुंदर पिचाई यांना आपल्या मनासारखे करायला किती स्वातंत्र्य मिळेल अशी विचारणा केली आहे. सरगे ब्रिन आणि लॅरी पेज यांनी सीईओ व प्रेसिडेंटपदाचा राजीनामा दिला असला, तरीही ते ‘अल्फाबेट’चे सर्वांत मोठे मतदान करण्याचा हक्क असलेले ते भागधारक आहेत. म्हणजेच कुठलाही महत्त्वाचा निर्णय सरगे व लॅरी यांच्या मनाविरुद्ध घेतला जाऊ शकत नाही. परंतु गेल्या चार वर्षांच्या अनुभवावरून यामुळे मोठी समस्या निर्माण होईल असे मला वाटत नाही. सुंदर पिचाई ‘गुगल’मध्ये गेल्या १५ वर्षांपासून काम करत आहेत. त्यांचे आणि सरगे व लॅरीचे संबंध चांगले असल्याशिवाय त्यांना ही जबाबदारी मिळणे शक्यच नाही. सुंदर पिचाई हे मोठा नफा कमावणारा विभाग (गुगल) आतापर्यंत चालवत होते. त्यामुळे पुढे ते लवकर नफा मिळण्याची शक्यता नसणाऱ्या ‘अल्फाबेट’च्या काही कंपन्या बंद करू शकतील असेही काही लोकांनी सुचवले आहे. तसे झाले तर ते ‘गुगल’च्या भागधारकांसाठी चांगलेच ठरेल.
गेल्या काही वर्षांत ‘अल्फाबेट’ व ‘गुगल’समोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यांचा सामना सुंदर पिचाई कसे करतील हाही एक महत्त्वाचा विषय आहे. अमेरिकन सरकार व अमेरिकेतील अनेक राज्य सरकारे सध्या ‘गुगल’ व ‘अल्फाबेट’ची वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चौकशी करत आहेत. ‘गुगल’ अथवा ‘अल्फाबेट’ने आपल्या प्रचंड ताकदीचा वापर करून आपल्या इतर स्पर्धकांना घातक ठरू शकेल असे काही केले आहे की नाही याची ही सरकारे चौकशी करत आहेत. या चौकशीत जर ‘गुगल’ अथवा ‘अल्फाबेट’चा दोष आढळला, तर त्यांना खूप मोठा (अब्जावधी डॉलर्सचा) दंड होऊ शकतो. तसेच ‘गुगल’चे विभाजन करण्याची मागणीही सरकारकडून केली जाऊ शकते.
अशा प्रकारे यापूर्वी काही कंपन्यांना अमेरिकन सरकारांनी व कोर्टाने विभाजन करण्यास भाग पाडले आहे. २०१८ च्या शेवटी खासगी माहितीचा गैरवापर करण्यासंबंधी एक चौकशीसंदर्भातही सुंदर पिचाई यांना अमेरिकन संसदीय समितीसमोर जबाब देण्यासाठी जावे लागले होते. त्या संदर्भात जी आव्हाने फेसबुकसमोर आहेत तीच आव्हाने गुगलसमोर आहेत असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. गुगल लोकांच्या खासगी माहितीचा वापर त्यांना जाहिराती दाखवण्यासाठी करते. या व्यवसायातूनच गुगलला प्रचंड प्रमाणात नफा मिळतो. त्यामुळे हा व्यवसायही सरकारच्या व लोकांच्या टीकेचा विषय ठरला आहे. या व्यतिरिक्त अंदाजे एक वर्षापूर्वी ‘गुगल’च्या ‘माउंटन व्ह्यू’ (गुगलचे सिलिकॉन व्हॅलीतील मुख्यालय) येथील कचेरीतील कर्मचाऱ्यांनी एक दिवस चक्क कामावरून निघून जाऊन निदर्शने केली. ‘गुगल’मधील काही स्त्री-कर्मचाऱ्यांचा विनयभंग झाल्याच्या घटना ‘गुगल’ने बरोबर हाताळल्या नाहीत, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. तसेच ‘गुगल’चे अमेरिकन संरक्षण विभाग - पेंटागॉनबरोबर व चिनी सरकारसाठी सर्च इंजिन बनवण्याच्या प्रकल्पावरही अनेक कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. या कारणाने अलीकडेच युटू्यबही लोकांच्या चर्चेचा विषय झाले होते. त्यावरील मुलांसाठी असलेल्या व्हिडिओमध्ये काही मुलांना अयोग्य अशा गोष्टी सापडल्याने गदारोळ माजला होता.
मात्र, भारतीयांसाठी सुंदर पिचाई यांची ही नेमणूक ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. जगातील सर्वांत मोठ्या दोन तंत्रज्ञान कंपन्यांचे (अल्फाबेट व मायक्रोसॉफ्ट) प्रमुख भारतीय असणे ही काही लहान गोष्ट नव्हे. भारतीय प्रतिभेला मोकळे मैदान दिले तर काय होऊ शकते याचे हे जिवंत उदाहरण आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2M7iNIr
Comments
Post a Comment