मुंबई: तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉक अॅपवर बंदी आणण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला आहे. नियमित तारखेनुसार याचिका सुनावणीला घेतली जाईल, असं हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. टिकटॉक अॅपनं तरुणाईला अक्षरशः वेड लावलं आहे. सोशल मीडियावर हे अॅप सर्वात लोकप्रिय आहेत. या अॅपमुळं मुलांवर वाईट संस्कार होतात, असा दावा करत त्यावर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका हीना दरवेश या गृहिणीनं मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. या अॅपमुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलीन होत आहे, असं त्यांनी याचिकेत नमूद केलं होतं. या अॅपवर बिनदिक्कतपणे अश्लिल व्हिडिओ अपलोड केले जात आहेत आणि हे देशातील युवकांसाठी नुकसानकारक आहे. असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. ११ नोव्हेंबरलाच दरवेश यांनी याचिका दाखल केली होती. या जनहित याचिकेच्या प्रती सोमवारी सादर करण्यात आल्या. टिकटॉकमुळे अनेक गुन्हेगारी घटना घडल्या आहेत, असं त्यात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, दरवेश यांनी गेल्या वर्षी मद्रास हायकोर्टातही अशाच प्रकारची याचिका दाखल करून या अॅपवर बंदी आणण्याची मागणी केली होती. टिकटॉक काय आहे? टिकटॉक हे एक सोशल मीडिया अॅप आहे. या अॅपच्या मदतीनं स्मार्टफोन यूजर्स लहान व्हिडिओ तयार करून ते शेअर करू शकतात. 'बाइट डान्स' नामक कंपनीनं २०१६ साली हे अॅप लाँच केलं आहे. या अॅपची लोकप्रियता झपाट्यानं वाढत असून, ऑक्टोबर २०१८ मध्ये अमेरिकेत हे अॅप सर्वाधिक डाउनलोड होणारं ठरलं होतं. गुगल प्ले स्टोअरचं म्हणणं काय? गुगल प्ले स्टोअरवर टिकटॉकची ओळख Short videos for you अशा शब्दांत करून देण्यात आली आहे. टिकटॉक हे साधंसुधं अॅप नाही. यात कसलंही बनवेगिरी नाही. जे काही असतं ते वास्तव असतं. याला कुठलीही मर्यादा नाही. तुम्ही सकाळी ब्रश करत असाल, नाश्ता करत असाल. काहीही करत असाल. टिकटॉकवर येऊन जगाला याची माहिती देऊ शकता.
- टिकटिक अॅप नेमकं आहे काय?टिकटॉक हे एक सोशल मीडिया अॅप्लिकेशन आहे. या अॅपच्या मदतीनं स्मार्टफोन युजर्स छोटे-छोटे व्हिडिओ बनवून शेअर करू शकतात.
- कोणत्या कंपनीचं आहे हे अॅप?'बाइट डान्स' नामक चिनी कंपनीनं २०१६ साली हे अॅप लाँच केलं आहे. या अॅपची लोकप्रियता झपाट्यानं वाढत असून ऑक्टोबर २०१८ मध्ये अमेरिकेत हे अॅप सर्वाधिक डाउनलोड होणारं अॅप ठरलं आहे.
- सुरक्षित आहे का?सोशल मीडियावरील कोणतंही अॅप वापरणं धोकादायक असू शकतं. लहान मुलांनी मोठ्या माणसांच्या देखरेखीखालीच हे अॅप वापरायला हवं. टिकटॉक अकाउंटसाठी तुम्ही साइन अप केल्यावर आपोआपच तुमची बरीच माहिती जगजाहीर होत असते.
- टिकटॉक अॅप कसं घेता येतं?गुगल प्ले स्टोअरवर जाऊन हे अॅप डाउनलोड करता येतं.
- टिकटॉक वापरण्यासाठी वयाची अट आहे का?१३ वर्षांवरील व्यक्तीनेच टिक-टॉक अॅप वापरावं असं कंपनीचं सांगणं आहे. कॉमन सेन्स मीडियाच्या मते, टिकटॉकवरील कंटेट पाहता १६ वर्षे व त्यावरील वयाच्या व्यक्तीनंच हे अॅप वापरणं योग्य आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2O1dnQT
Comments
Post a Comment